Site icon InMarathi

कोरोना संकटावर लिहिलेल्या “या” ओळी जणू मनातील भावनांना साद घालत आहेत

stay at home inmarathi 1

imgur

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतो आहे तो म्हणजे ‘कोरोना’! डोळ्यांना न दिसणाऱ्या या विषाणूने अर्ध्या जगाला पछाडलं आहे!

अमेरिकेत तर लाखो लोकांना लागण झाली आहे, हजारो मृत्युमुखी पडले आहे! ग्रेट ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा देशांची तर अवस्था अत्यंत बिकट आहे!

भारतात सुद्धा हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे! शाळा, कॉलेजेस, मॉल्स, थेटर्स, रेल्वे, बस खासगी वाहतूक सेवा सगळं ठप्प आहे!

 

inventiva

 

तरी आपल्याइथे माणुसकीच चित्रण हे बघायला मिळतय, जे बेघर आहेत त्यांना कुणी मोफत जेवण पुरवत आहे, तर पोलिस कर्मचारी हे सुद्धा यात हिरीरीने भाग घेऊन लोकांना फूड पॅकेट वाटताना दिसत आहे!

कुणी स्वस्त दरात किंवा मोफत किराणा सामान वाटप करतंय, भाज्या घरपोच दिल्या जात आहेत, ज्यांच हातावर पोट आहे अशांना सुद्धा मदत केली जात आहे!

कोरोना मुळे देश लॉकडाऊन आहे, पण लोकांमध्ये असलेली माणुसकी लॉकडाऊन मध्ये नाहीये!

 

india today

 

टीव्ही जाहिराती यामधून सतत एक संदेश देण्यात येतोय तो म्हणजे घरी रहा सुरक्षित रहा!

न्यूज चॅनल्स पासून नेते, सेलिब्रिटी तसेच पंतप्रधान सुद्धा जनतेला एकच आवाहन करतायत ते म्हणजे घरी थांबा!

बाहेर पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉयज, दुकानदार, हे सगळे कोरोनाशी झुंज देत आहेत! आपल्याला फक्त घरात राहून यांना सहकार्य करायच आहे!

 

news one

 

यावर आधारीत श्री. आमोद रानडे यांनी ‘घरी बसायचं’ अशी एक सुरेख कविता केली असून त्यातून त्यांनी जनतेला घरी बसाल तर सुरक्षित रहाल असं एक आवाहनच केलं आहे!

तर हीच सुंदर आणि आपल्याला विचार करायला भाग पडणारी कविता इनमराठीच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत!

===

आपल्याच बांधवाना मरताना आपण पाहू शकत नाही,
आलीये अशी वेळ आपण काहीच करू शकत नाही,
एक गोष्ट मात्र नक्की, आपल्याला जमेल तितक्यांना वाचवायचंय,
काहीही झालं तरी आपण घरातच बसायचं

आपल्याच साठी सगळे जण रात्रीचा दिवस करतायत,
आपापल्या कुटुंबांची फोन वरूनच चौकाशी करतायत,
त्यांना नसेल का हो कुटुंबाची काळजी,
त्यांनाही येत असेल आठवण सगळ्यांची,
त्यांच्यासाठी आपण एवढातरी करायचं
काहीही झालं तरी आपण घरातच बसायचं

कोण कोणाचा काय लागतो म्हणून सगळे धावतायत,
दुसऱ्यांच्या जीवासाठी प्राणाची बाजी लावतायत,
पण ते हात झटकत नाहीत,
संकंटांसमोर खचत नाहीत,
त्यांच्या कर्तुत्वाला मनापासून नमन करायचं
काहीही झालं तरी आपण घरातच बसायचं

 

BBC

 

ते इतके करतायत, आपण एवढस करू शकत नाही?
गप गुमान आपण घरात बसू शकत नाही
हे एक युद्ध आहे,
सर्वानी एकत्र सामोरं जायचं
काहीही झालं तरी आपण घरातच बसायचं

लॉक डाउन अजून किती काळ चालणार?
आम्ही घरात अजून किती वेळ थांबणार?
असेल प्रश्न येतील मनात,
पण त्यांना एकच उत्तर द्यायचं,
काहीही झालं तरी आपण घरातच बसायचं

हेही दिवस जातील, एक दिवस विजय नक्की मिळेल,
तेव्हा आपल्या घराची किंमत सर्वांनाच कळेल,
तो पर्यंत मात्र सर्वानी एकच करायचं
काहीही झालं तरीही आपण घरातच बसायचं!

 

amar ujala

===

ही इतकी छान कविता वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!

बाहेर या संकटाशी इतके लोकं दोन हात करतायत,निदान त्यांच्यासाठी आपण इतकं नक्कीच करू शकतो!

आपल्याला आणि संपूर्ण देशाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचय आणि त्यासाठी ही गोष्ट आपण करूच शकतो किंबहुना ती करायलाच हवी!

चला तर मग नुसतं बोलून नाही, तर सगळे ही गोष्ट काटेकोरपणे पाळूया, गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळूया आणि या आपल्या देशाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करूया!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version