Site icon InMarathi

“लेकरा घरात ये!” : कोरोनाच्या गंभीर वातावरणात मानवतेची तेवती ज्योत दाखवणारा लेख

corona delivery inmarathi

deccan herald

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चायना इथल्या वूहान शहरातून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या ‘कोरोना’ व्हायरस बद्दल कुणाला माहीत नाही! डोळ्यांना न दिसणाऱ्या या विषाणूने अर्ध्या जगाला पछाडलं आहे!

भारतात सुद्धा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे! शाळा, कॉलेजेस, मॉल्स, थेटर्स, रेल्वे, बस खासगी वाहतूक सेवा सगळं ठप्प आहे!

अमेरिकेत तर लाखो लोकांना लागण झाली आहे, हजारो मृत्युमुखी पडले आहे! ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली अशा देशांची तर अवस्था अत्यंत बिकट आहे!

 

lifechargingcells

 

कोरोना मुळे देश लॉकडाऊन आहे, पण लोकांमध्ये असलेली माणुसकी लॉकडाऊन मध्ये नाहीये!

आपल्याइथे माणुसकीच चित्रण हे बघायला मिळतय, जे बेघर आहेत त्यांना कुणी मोफत जेवण पुरवत आहे, तर पोलिस कर्मचारी हे सुद्धा यात हिरीरीने भाग घेऊन लोकांना फूड पॅकेट वाटताना दिसत आहे!

कुणी स्वस्त दरात किंवा मोफत किराणा सामान वाटप करतंय, भाज्या घरपोच दिल्या जात आहेत, ज्यांच हातावर पोट आहे अशांना सुद्धा मदत केली जात आहे!

 

india today

 

याच धर्तीवर श्री मंदार जोशींनी एक सुंदर फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ती इनमराठी च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. नक्कीच यातून आपल्या सगळ्यांनाच बोध मिळेल!

चला तर बघूया नेमकं काय आहे या व्हायरल पोस्ट मध्ये!

===

कालचा एक किस्सा सांगतो.

Lockdown सुरु झाल्याझाल्या आम्ही एक message viral केलेला कि सर्व अत्यावश्यक / जीवनावश्यक सेवा वस्तू घरपोच मिळतील.

एका काकूंनी फोन केला. कायकाय मिळेल याची माहिती घेतली.
मी म्हटलं,” आपल्याला काय हवंय ?”

“जेवणाचा डब्बा लागेल,लागला तरच कळवेन,”

त्यांना म्हटल,” मी डब्बा आणून देईन ”

तर म्हणाल्या,” माझे मिस्टर घरात करू शकतील असं वाटतंय,आमच्यापेक्षा ज्यांना जास्त गरज असेल त्यांची गैरसोय नको व्हायला.”

मी विचारात पडलो, यांना गरज असतानाही हे इतकं तारतम्य ठेवतात,सही माणसं आहेत ही.

मग विचार आला, गरज नसतानाही दुकानासमोर उभे राहणारी , वेड्यासारखी गर्दी करून भरमसाठ खरेदी करणारे कोण आहेत ?

दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला,” ह्यांनी प्रयत्न केला, त्यांना कठीण वाटतंय ,आपण द्याल का पोळीभाजी ?”

 

 

म्हटलं,”नक्कीच.”

पत्ता घेतला,रोज डबा चालू झाला.

मी माझ्यामुळे त्यांना लागण नको व्हायला म्हणून कोणाच्याही घरात शिरत नाही, त्यामुळे दरवेळी काका यायचे डबा घ्यायचे,आत या म्हणायचे मी नको, हे करोना प्रकरण होऊ द्या, मग नक्की येईन म्हणून निघून जायचो.

१४ तारखेपर्यंत ज्याला सांगितलं होत त्याने डबा दिला, आणि Lockdown वाढला, आता त्याला डब्बा देणं शक्य नव्हतं, अडचण genuine होती, त्यालाही force करू शकत नव्हतो.

मग काकांना फोन करून अडचण सांगितली, म्हटलं काहीही झालं तरी डबा देणार, फक्त आज उशीर झाल्यास क्षमस्व. देवाच्या कृपेने लगेचच व्यवस्था झाली आणि वेळेत पोहोचलोही.

काकांनी नेहमीप्रमाणे दरवाजा उघडला, डबा घेतला. काकूंचा आतून आवाज आला,”अहो,आत या.”

मी नेहमीच कारण दिल,तशी काका म्हणाले,”Please आत या,हिला बघायचंय तुम्हाला.”

मी थोडासा अवघडल्यासारखाच आत गेलो,मास्क खाली केला , “नमस्कार,मी मंदार जोशी.”

काकू माझ्याकडे बघत म्हणाल्या,

“अहो, मी जागेवरून उठू शकत नाही, म्हणून आवाज देत होते, तुम्ही रोज न चुकता, वेळेवर डबा आणून देता, आम्हाला काय वाटत ते मी शब्दात नाही सांगु शकत आपल्याला.

तुमचा फक्त आवाज ऐकत होते, तुम्हाला बघायचं होत. म्हणून आज यांना म्हटलं काहीही झाल, तरी त्यांना आत बोलवा, मला त्यांना एकदा बघायचंय”.

 

gulf news

 

हे बोलत असताना ज्या मायेने त्यानी माझ्याकडे पाहिलं, ती नजर सगळं सांगून गेली. मी ते शब्दात मांडू शकणार नाही, पण तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल अशी खात्री आहे,प्रत्येक भावनेला भाषेची गरज नसते.

दोस्त हो, आर्थिक आघाड्यांवर आपण काय गमावलं याची आकडेवारी रोज ऐकतोय.

जागतिक मंदी येणार, अर्थव्यवस्था कोसळणार, नोकऱ्या जाणार, धंदे बुडणार हे सांगून news channels वाल्यानी वात आणलाय. काही तथ्यांश असेलही.

पण, मी गुंतवणूक सल्लागार आहे, आपल्याला इतकंच सांगेन,जसं आपण share मार्केट कोसळताना, गुंतवणूक वाढवत जाता.

तसंच, ह्या आपातकाळात, अशा आठवणी, सदिच्छा, आशीर्वाद, परस्पर स्नेह, सहयोग ह्यात गुंतवणूक करूया. हि गुंतवणुक आयुष्याला पुरते. कुठेतरी ऐकलंय, दुआओमें बडी बरकत होती हैं !!

===

 

elle

 

चला या कोरोना मुळे निदान जी माणसं एकमेकांपासून दुरावली गेली आहेत त्यांना पुन्हा जवळ आणायचे काम केले आहे!

मंदार जोशी यांच्यासारखं आपल्या सगळ्यांना जमेलच असं नाही, पण आपण आपल्याकडून होईल तितकी मदत करत राहुया! आर्थिक मदतीपेक्षा ही मदत कायमस्वरूपी लक्षात राहते!

पैशाची परतफेड करून कर्ज उतरतं! पण आठवणी आशिर्वाद स्नेह या गोष्टींची परतफेड कधीच होत नाही, त्या गोष्टी जशा मिळतील तशा साठवत जायच्या असतात!

चला तर मग आपणही या कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी असंच काही करता येतय का ते पाहूया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version