' कंटाळवाण्या रुटीनमध्ये घरबसल्या हे १० ऑनलाइन कोर्स करा; वेळ सत्कारणी लावा – InMarathi

कंटाळवाण्या रुटीनमध्ये घरबसल्या हे १० ऑनलाइन कोर्स करा; वेळ सत्कारणी लावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सध्या सगळंच बंद झालंय! कोरोना व्हायरसने सगळ्यांना घरात बसवलंय.

बरं हे कधीपर्यंत चालेल हे कुणालाच माहित नाही. किती दिवस हे असच चालू राहणार? सगळंच अंधारात आहे! लोकं निराश होऊ लागली आहेत. पण, ह्यातून आपणच मार्ग काढायचा आहे.

 

total lockdown inmarathi
india today

 

आपला जीव आपणच रमवायचा. ह्यासाठी बर्याच जणांनी आपले विस्मृतीत गेलेले छंद पुन्हा नव्याने जोपासायला सुरुवात केली आहे.

चित्रकला, संगीत, वाद्य वादन कला इतर काही कला असे काही छंद जोपासले जाऊ लागलेत पुन्हा!

निराश होण्यापेक्षा कलेला, सुप्त गुणांना वाव द्यायची ही आयतीच संधी मिळाली आहे आपल्याला.

आपणही असेच काही तरी करायला हवे असे ज्यांना वाटते पण नेमके काय करावे हे त्यांना समजत नाही त्यांच्यासाठी आज आपण काही ऑनलाइन कोर्सेस बघुया!

तसंही दिवसभर टि.वी बघणे, कंटाळा आला की मोबाइलमध्ये काही तरी सोशल मिडिया वर वेळ वाया घालवणे किंवा वेब सिरीज पाहणे किंवा सरतेशेवटी गेम खेळणे हेच काम आहे सध्या.

 

people watching tv inmarathi
livemint

 

मग हा वेळ वाया घालवण्यापेक्षा काही तरी शिकण्यात सत्कारणी लावला तर आयुष्यभर आपल्याच उपयोगी पडेल ना!

कोणतीही विद्या कधीच वाया जात नाही असे म्हणतात. परदेशात ज्ञान हेच आपला खरा मित्र असं म्हणतात ना!

आपल्याला ही आयतीच संधी चालून आली आहे काही तरी नवीन शिकायची किंवा आपल्या छंदाला नीट दिशा देण्याची, कलेला वाव देण्याची! चला तर मग ह्या ऑनलाइन कोर्सेसची  माहिती घेऊया!

 

१) फोटोग्राफी (छायाचित्रण) :

 

mukta barve inmarathi
charmboard

 

आज काल सगळ्यांनाच फोटोग्राफीचं वेड लागलंय! पूर्वी सणा सुदीला, समारंभाना फोटो काढले जायचे पण आता तर ‘स्पेशल ऑकेजन’ नाही लागत, सगळ्यांनाच आपले छान फोटो कढून घ्यायला आवडतं.

फोटोग्राफी शिकून घेण्यासाठी अनेक ऑनलाइन कोर्सेस आहेत.

त्यातले काही कोर्सेस् छोट्या स्वरूपाचे आहेत तर Shaw Academy’s Online Photography Course सारखे असेही काही कोर्सेस आहेत जे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस आहेत!

असे ऑनलाइन कोर्सेस म्हणजे निष्णात फोटोग्राफर बनण्यास मदत करतात.

 

२) इतर भाषा शिकणे :

 

language inmarathi
meticulous blog

 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना दुसरी कोणती तरी भाषा शिकावी असे वाटत असते, पण काही ना काही कारणांनी ते राहून जाते. आता आपली इच्छा पूर्ण करण्याची मस्त संधी मिळाली आहे.

निरनिराळ्या प्रादेशिक आणि अगदी आंतरराष्ट्रीय भाषा देखील आपण ऑनलाइन शिकू शकतो. प्रत्येक भाषेचे ऑनलाइन डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत.

ज्यामुळे आपण आपल्याला हवी ती भाषा शिकू शकतो आणि न अडखळता बोलूही शकतो, कारण ऑनलाइन व्हॉइस कोर्सेस पण आहेत.

 

३) फायनान्स :

 

finance inmarathi
small business first

 

वित्त म्हणजेच फायनान्स आपल्या आयुष्यात फारच महत्त्वाचे असते. यशासाठी, आयुष्यात स्थिरता मिळण्यासाठी फायनान्स अविभाज्य भाग असते.

फायनान्स संबधित ऑनलाइन कोर्सेस मुळे पैसा कसा काम करतो हे आपल्याला समजते, त्यामुळे भाडेकरारापासून अगदी सेवानिवृत्तीपर्यंत पैशाचे कसे विभाजन करायचे हे आपल्याला समजते.

पैशांसंबधात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे आपण या ऑनलाइन कोर्स मधून शिकू शकतो. फायनान्स विविध प्रकारची माहिती मिळते आपल्याला.

 

४) आरोग्य आणि निरोगी शरीर (Health and Wellness) :

 

online fitness inmarathi
the statesman

 

आज-काल सगळेच जण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी जिम मध्ये किंवा योगासनांच्या वर्गाला जातात. स्वतःचे शरीर निरोगी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी सगळेच धडपडत असतात.

पण ह्या टोटल लॉकडाऊनमुळे जिम आणि योगासनांचे वर्गही बंद आहेत.

मग आपल्याला मदत हे ऑनलाइन कोर्सेस करतील, ज्यामुळे आपण स्वतः तर व्यायाम करून, त्यांचे सल्ले निरोगी राहूच पण त्याबरोबरच डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केल्यामुळे आपणही फिटनेस ट्रेनर म्हणून काम करु शकतो!

 

५) मार्केटिंग :

 

online marketing inmarathi
IIADM

 

आपण दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात कार्यरत असाल आणि आपल्याला आपल्यातले कौशल्य सुधारायचे असेल किंवा नवीन काहीतरी शिकायचे असेल तर त्यासाठी मार्केटिंग उत्तम पर्याय आहे.

मार्केटिंग ही अशी मॅनेजमेंट प्रक्रिया आहे जी संभाव्य ग्राहकापर्यंत सेवा किंवा उत्पादन पोहोचवते.

ह्यासाठी आपल्यामध्ये मार्केटिंग साठी लागणारी जी कौशल्ये आहेत त्यांचा विकास किंवा ज्या कौशल्यांची आवश्यकता आहे त्यांचा अभ्यास शिकवणारे ऑनलाइन वर्ग आहेत!

ज्यामध्ये आपण डिजीटल मार्केटिंग ते सोशल मिडिया मार्केटिंग पर्यंतचे सगळे कोर्सेस पाहू शकतो आणि हवा तो कोर्स निवडून त्यात निष्णात होऊ शकतो.

 

६) तंत्रज्ञान अर्थात् टॆक्नॉलॉजी अभ्यासक्रम :

 

online technology inmarathi
Inc.com

 

आज-काल माहिती आणि तंत्रज्ञान अविभाज्य घटक बनले आहेत मनुष्याचा. त्यामुळे हे शिकणे अनिवार्य आहे असे तुम्हाला नेहेमीच वाटले असेल.

पण, वेळेचा अभाव आणि इतर काही कारणांमुळे आपण हे शिकू शकत नाही अशांसाठी आता वेळही आहे आणि संधीही आहे. त्यामुळे ह्याचा पुरेपुर फायदा आपण घेतलाच पाहिजे.

तंत्रज्ञानाचे ऑनलाइन विनामूल्य कोर्सेस तसेच सर्टिफिकेट कोर्सेस् उपलब्ध आहेत. ज्यासाठी विज्ञान शाखेची पदवी असणे गरजेचे नाही.

ज्यांना स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेब डिझायनिंग किंवा व्यवसाय विकास करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे ऑनलाइन कोर्सेस् खूपच उपयोगी पडतात.

 

७) डिझाइनिंग :

 

graphic inmarathi

 

आताच्या विज्युअल जगात डिझाइनिंग ला खूपच महत्त्व आहे.

हे असे कौशल्य आहे ज्याला मरण नाही कारण, कलाकारांपासून ते वित्तीय क्षेत्र, निरनिराळी मासिके, त्याची मुखपृष्ठे, त्यात लागणारी चित्रे, ग्राफिक डिझाइनिंग, फोटोशॉप ह्या अशा गोष्टी आहेत!

ज्या कायम कौतुकास पात्र ठरतात आणि ज्यांची ठळकपणे नोंद केली जाते. बरं, हे डिझाइनिंग शिकण्यासाठी आपल्याला ह्या लॉकडाऊनमध्ये बाहेर जावे लागणार नाहीये.

आपण ह्या गोष्टी सहजपणे, घरच्या घरी ऑनलाइन शिकू शकतो.

 

८) ब्युटी क्लासेस् (सौंदर्यासंबंधीचे वर्ग) :

 

online beauty courses inmarathi
YouTube

 

आपले सौंदर्य आपल्याच हातात! ह्या लॉकडाऊनमुळे सर्व ब्युटी सलोन देखील बंद आहेत. त्यामुळे आपणच आपल्या त्वचेची, चेहेर्याची, केसांची काळजी घरच्या घरी घ्यायची आहे!

त्यासाठी ऑनलाइन क्लासेस आहेत ना ब्यूटी संदर्भात! हे क्लासेस् व्यावसायिक मार्गदर्शन करत नाहीत पण आपल्याला घरच्या घरी आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यास किंवा वाढवण्यास मदत करतात.

 

९) संगीत :

 

online music inmarathi
vidya subrmanian

 

संगीत आपल्याला अवर्णनीय आनंद देते आणि अर्थातच निराशेतून बाहेर काढण्यास ते खूपच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते (जे आत्ता आपल्याला जास्त गरजेचे आहे).

त्यामुळे एखादे वाद्य आपण ऑनलाइन शिकू शकतो किंवा गायन, नृत्य ह्यासारखी संगीत कला देखील आपण ऑनलाइन शिकू शकतो. ह्याचे थिअरी आणि प्रॅक्टिकल असे दोन प्रकार असतात.

आपण आपल्याला हवी ती पद्धत शिकून आपले कौशल्य विकसित करू शकतो.

 

१०) व्यवसायातील कौशल्ये :

 

business related courses inmarathi
businessstudent.com

 

व्यवसायातील कौशल्ये शिकणे हे वेळ आणि संसाधनाच्या बाबतीत अत्यंत मागणी असणारा कोर्स आहे.

हे कोर्स ह्या लॉकडाऊन नंतर आपला व्यवसाय स्थिर करण्यास आणि प्रगती पथावर नेण्यास नक्कीच मदत करणार!

या कोर्सेसमुळे आपला आत्मविश्वास तर वाढतोच त्याच बरोबर आपल्या सहकार्यांची, कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला हवे त्यासाठीही योग्य मार्गदर्शन करते.

ऑनलाइन कोर्सेस् आपण आपल्या वेळेनुसार, आपल्या आकलन शक्तीनुसार करू शकतो आणि स्व-प्रेरणादायक आहेत.

ह्या लॉकडाऊनमध्ये आपण ह्यातला एक तरी कोर्स करून हा अचानक मिळालेला वेळ सत्कारणी लावूया!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?