' घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा – InMarathi

घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या “झालं का जेवण?” या भारतीयांच्या आवडत्या प्रश्नाला बरच उधाण आलंय!

कोरोना मुळे हा प्रश्न परत एकदा वारंवार विचारला जात आहे. त्याचं कारण हे की आपले सर्वांचे बदललेले schedule. ऑफिस असताना कसं सगळं रूटीन एकदम सेट असतं.

सकाळी साडे पाच ला उठायचं, फिरून यायचं, व्यायाम, आंघोळ आणि मग ब्रेकफास्ट. आता हा सगळा सिक्वेन्स बदलला कारण आता आपल्यावर वेळेचं बंधन नाहीये.

पण आता लगेच त्याचं टेन्शन घेऊन बसू नका. सध्या वातावरण असं आहे की सुरक्षित राहणं जास्त गरजेचं आहे.

पण मग, काय खावं ? कधी खावं ? आणि किती खावं ? हे आम्ही या लेखात सांगत आहोत.

 

lockdown inmarathi

 

तुम्हाला जर का तीन वेळेस खायची सवय असेल तर त्या सवयीला घरी आहोत म्हणून बदलण्याची गरज नाहीये.

कोणीही आपल्याला जितकी भूक आहे तितकंच खात असतो आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीराला ती खाण्याची पद्धत मांनवलेली आहे. तेव्हा त्या पद्धतीला या दिवसात बदलू नका.

त्याला पूरक काही घरातील कामं करता आली तर ते बघा. तुम्हाला आपण फक्त खात आहोत की काय ? हा विचार सुद्धा येणार नाही. कारण हे सिद्ध झालंय की माणूस स्ट्रेस मध्ये असला की जास्त खातो. आपल्याला ते टाळायचं आहे.

 

meal in india
healthifyme

 

सध्या आहार नियमित ठेवण्यासाठी बरेच काही उपाय लोक करत आहेत. जसं की दोन वेळेसच जेवणे, कमीत कमी खाणे इत्यादी.

मेडिकल एक्स्पर्टचं जर का म्हणणं ऐकलं तर ते सांगत आहेत की या लॉकडाउनच्या दिवसात कोणतीही नवीन डायट पद्धत शरीरावर लादू नका.

तुमचं शरीर कदाचित इतर बदलांसोबत हा एक नवीन बदल सहन करण्यास असमर्थ असू शकतं. त्यापेक्षा तुमचा नियमित आहार सुरू ठेवा. कमीत कमी दोन वेळेस भरपेट जेवण करा.

त्याने तुमचं मनसुद्धा शांत असेल आणि तुमच्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल.

सतत घरातच असल्याने कदाचित तुम्हाला आपण परत परत तेच तेच खात आहोत असं वाटू शकतं. तेव्हा या दिवसात स्वतः एखादी नवीन डिश करण्याचा प्रयत्न करा.

 

guy in kitchen inmarathi
gulf news

 

स्वयपाक शिकणं राहून गेलं असेल तर ही अगदी योग्य वेळ आहे, निदान आवश्यक गोष्टी जश्या की कुकर लावणे, भाजी करणे, गोल पोळी करणे इत्यादी.

कारण, पुन्हा इतका निवांत वेळ परत कधी मिळेल हे काही कोणी सांगू शकत नाही.

खाण्या पिण्याच्या बाबतीत काही पथ्य पाळणं हे या दिवसात अत्यंत गरजेचं आहे. जसं की भरपूर पाणी प्यावं, खाताना शांतपणे खावं.

आजकालच्या सवयीप्रमाणे टीव्ही समोर बसून खाणं निदान या दिवसात टाळावं.

त्याचं कारण हे की, आपल्याकडे टीव्ही पाहण्यासाठी इतर भरपूर वेळ आहे आणि सध्या टीव्ही वर, बातम्यांमध्ये फक्त एकच विषय सुरू आहे तो म्हणजे कोरोना.

 

indian guy eating inmarathi
healthline

 

निदान तुम्ही जेवण करत असताना तुमचं मन हे स्ट्रेस मध्ये नसावं जेणेकरून खाल्लेलं व्यवस्थित अंगी लागेल. अन्न ही जशी शरीराची गरज आहे तशी ती आपली मानसिक गरज सुद्धा आहे.

त्याला महत्व द्या. आपल्या शास्त्रात म्हणूनच अन्नाचा उल्लेख ‘पूर्णब्रम्ह’ असा केला आहे जो की आपण दिवसेंदिवस विसरत चाललो आहोत.

ऑनलाईन अन्न ऑर्डर करणं सुरू झाल्या पासून एक सवय आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागली आहे ती म्हणजे डायरेक्ट बॉक्स मधून खाणे.

त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण गरजेपेक्षा जास्त खातो.

जेव्हा आपण आपल्या ताटात वाढून एखादा पदार्थ खात असतो तेव्हा वाढून घेतानाच आपण आपल्या पोटाचा अंदाज घेऊन वाढून घेत असतो आणि तितकंच खात असतो.

 

food in thali inmarathi
softonic

 

ही सवय तुमचं खाणं नियंत्रणात ठेवण्यासाठी कधीही चांगली आहे. कारण या दिवसात धावपळ कमी असल्याने अति खाणं टाळणं हा स्वतःला फिट ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे.

फिट राहण्यासाथी अजून एक गोष्ट केली जाऊ शकते ती म्हणजे ही की घरात जास्तीत जास्त पौष्टिक गोष्टींचा स्टॉक करून ठेवणे.

आता असं नाहीये की आपण एकेक वस्तू बाहेर जाऊन विकत घेऊन येऊ शकतो जसं की फळांचा ज्यूस, लिंबू पाणी.

या गोष्टींचा जितका साठा आपल्या घरात असेल तितकं आपण त्यांचं योग्य वेळी सेवन करू आणि स्वतःला या परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करू.

पौष्टिक पदार्थ खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्ही ते पदार्थ मनात कोणतीही अपराधी भावना न येऊ देता खाऊ शकतात.

 

vitamin c inmarathi

 

कधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे.

स्ट्रेस कशाने येऊ शकतो याचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.

काहींना जॉब मुळे स्ट्रेस येऊ शकतो तर काहींना घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तर काहींना एखाद्या गोष्टीमुळे आलेल्या सोशल प्रेशर मुळे सुद्धा स्ट्रेस येतो.

स्ट्रेसचं कारण काहीही असलं तरीही त्याचा परिणाम एकच होतो तो म्हणजे जास्त खाणं. व्यायाम करणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी.

आजकाल झुंबा ऑनलाईन क्लास देखील चालवले जातात. ते सुद्धा तुमचा स्ट्रेस घालवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

स्ट्रेस असला की दारू पिण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढत चाललं आहे दिवसेंदिवस. हे टाळण्यासाठी गरज आहे ती स्वतःला एखाद्या नवीन प्रोजेक्ट मध्ये गुंतवण्याची, वेळेचा सदुपयोग करण्याची.

 

stressful guy drinking inmarathi

 

जे काही तुमचे छंद कामाच्या व्यापामुळे मागे पडले असतील त्यांना परत जोपासण्याची.

उद्यासाठी To-Do List आजच तयार करून ठेवण्याची जेणेकरून तुम्ही खाण्या पिण्या सोबतच स्वतःच्या प्रगतीकडे सुद्धा लक्ष द्याल.

आपण बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो. आहार, खाण्याची पद्धत, स्ट्रेस मॅनेजमेंट. हे सगळं आपण आमलात आणू शकतो जेव्हा आपण प्रसन्न आहोत तेव्हा.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता असं होऊ शकतं की सगळं माहीत आहे पण स्वतःच्या शरीरासाठी काहीच करण्याची इच्छा होत नाहीये.

त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी स्वतःच्या मनावर सुद्धा सोडाव्या लागतील. मन हे सध्या एखाद्या लहान मुलासारखं चंचल असेल. तेव्हा त्याला थोडा वेळ द्या.

रोज एक बदल याप्रमाणे तुमची जीवन शैली बदला. सकारात्मक गोष्टी आपोआप घडू लागतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?