' कोरोनाशी लढताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ मुळे `इमोशनल डिस्टन्स’ही आलाय? मग हे वाचाच – InMarathi

कोरोनाशी लढताना ‘सोशल डिस्टन्सिंग’ मुळे `इमोशनल डिस्टन्स’ही आलाय? मग हे वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गेल्या दोन तीन महिन्यात ह्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकुळ घातला आहे. इतकी दहशत पसरवली आहे ह्या कोविद-१९ ने की सगळ्यांना “कंपल्सरी” घरात बसवले आहे.

चीनमध्ये वूहान येथे सर्वप्रथम आढळलेला हा विषाणू संपूर्ण जगात आणि कोणाला काही कळायच्या आत सर्वदूर झपाट्याने पसरला.

हा अती भयंकर रोग आणि हा रोग तरी असा आहे की अद्यापही त्याच्यावर काही ठोस उपाय, रामबाण इलाज सापडला नाही. मग काय करायचे?

 

corona virus fight inmarathi
market watch

 

तर संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे कोण्याही परिस्थितीत ह्याचा आपल्याला संसर्ग होऊ द्यायचा नाही.

ह्यामुळे “सामजिक अंतर”, “सेल्फ क्वारंटाइन”, “टोटल लॉकडाऊन” असे शब्द वारंवार ऐकायला येऊ लागले आहेत. काय अर्थ आहे ह्या शब्दांचा? हे सगळं करायचं म्हणजे नक्की काय?

आपल्या पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी एक दिवसाचा कर्फ्यू जाहिर केला आणि नंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आणि लॉकडाऊनचा हा कालावधी वाढतच राहिला, आताही अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असली तरी ह्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळायचे. म्हणजे नेमकं काय?

आज आपण हे बघूया की, कोरोना ह्या जीवघेण्या व्हायरसमुळे आज ही जी वेळ आली आहे, की सगळं ठप्प झालंय!

सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

 

total lockdown inmarathi
the financial express

 

 

जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.

ह्या अचानक आलेल्या संकटामुळे आधी गडबडून गेलेले सगळे सावरण्याच्या आतच हा टोटल लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वजण पुन्हा गडबडून गेले.

चला तर मग पाहूया सोशल डिस्टन्स पाळायचा म्हणजे नक्की काय करायचं!

सोशल डिस्टन्स म्हणजेच सामाजिक अंतर पद्धत, ह्यामध्ये आपण विषाणूच्या संक्रमणाचा प्रसार थांबवायचा असतो. म्हणजेच आपण आपले सामाजिक संपर्क, समाजातला वावर थांबवायचा असतो.

कोणाला संसर्ग झालाय हे कळणे कठिण असते कारण त्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही किंवा सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती सारखीच नसते.

 

social distance inmarathi
outlook india

 

त्यामुळेच बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात शक्यतो यायचं नाही.

सोशल डिस्टन्स म्हणजेच एका ठिकाणी ४ किंवा ५ पेक्षा जास्त माणसे जमा होऊ नयेत, त्यातही ह्या ४, ५ माणसांनी किमान एक हाताचं अंतर ठेवायचं.

त्यामुळे सर्व क्रीडा कार्यक्रम, जलपर्यटन, उत्सव आणि इतर मेळावे रद्द करणे अनिवार्य ठरले. त्यामुळे क्रिकेट, फुटबॉल ह्या लोकप्रिय खेळाच्या चाहत्यांची खूप मोठी, घोर निराशा झाली.

पण हे लोकप्रिय खेळ गर्दी खेचणारे आहेत त्यामुळे रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी हे खेळ रद्द करणे गरजेचे होते.

त्यात भरीस भर म्हणजे एप्रिल आणि मे दोन्ही महिने सुट्टीचे! त्यामुळे बरेच घरगुती, छोटे किंवा मोठे समारंभ आगोदर पासूनच म्हणजे जवळ जवळ ६ महिने आगोदर पासूनच सगळं काही ठरलेलं असतं.

 

ipl 2020 inmarathi
bloglizm

 

लग्नं, साखरपुडा, मुंज असे अनेक समारंभ ठरलेले असतात. ते सगळे सगळे रद्द करावे लागतात. आताच्या ह्या लॉकडाऊनमध्ये हेच झालंय सगळं!

सगळे समारंभ, स्वागतयात्रा, उत्सव सगळं सगळं रद्द करण्यात आलंय!

* सामाजिक अंतर ठेवण्यासाठी कार्यालयात जाण्यापेक्षा घरूनच काम करण्याची मुभा देण्यात येते.

* शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात येतात किंवा ऑनलाईन वर्ग घेण्यात येतात.

* नातलग, मित्र-मैत्रिणी ह्यांना वैयक्तिकरित्या भेटण्यापेक्षा फोनवर बोलून ख्याली खुशाली विचारणे किंवा व्हिडिओ कॉल करणे.

* मोठ्या मीटिंग्ज्, भेटीगाठी रद्द करणे किंवा पुढे ढकलणे.

 

 

social distancing inmarathi
business insider india

 

सेल्फ क्वारंटाईन किंवा स्वतःला वेगळे ठेवणे म्हणजे काय?

जी लोकं परदेशतून आली आहेत किंवा परमुलुखातून आली आहेत, त्यांना कोविद -१९ ची लागण झाल्याची शक्यता असते!

त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना १४ दिवस वेगळे ठेवायचे अगदी घरातल्या घरात देखील त्यांनी वेगळ्या खोलीत राहायचे. घरातल्यांमध्ये देखील मिसळायचे नाही.

त्यांना संसर्ग आहे की नाही, ते आजारी पडू शकतात का, त्यांच्यापासून इतरांना धोका आहे की नाही हे समजून घ्यायला १४ ते १५ दिवस लागतात.

त्यामुळे तेव्हढे दिवस त्यांनी स्वतःला इतरांपासून अलग ठेवायचे म्हणजेच “सेल्फ क्वारंटाईन”.

 

self quarantine inmarathi
the federal

 

 

ह्या सेल्फ क्वारंटाईन मध्ये संसर्ग झाला नसला तरी स्वतःची काळजी घ्यायची हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला संसर्ग होणार नाही अशी काळजी घ्यायची असते!

म्हणजे अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी आपण बाहेर जाणारच, थोडा-फार संसर्ग तर होणारच, दूध, भाजी, फळं इत्यादी वस्तू आणण्यासाठी बाहेर जावंच लागतं ना!

त्यामुळे स्वतःची काळजी हेही सेल्फ क्वारंटाईन मध्येच आलं. बघूया आता काय काय करायचं सेल्फ क्वारंटाईन मध्ये!

* हात वारंवार आणि कमीत कमी २० सेकंद धुवावेत, शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छता पाळावी.

* इतरांचे टॉवेल्स, कपडे आणि पाणी प्यायचे पेले, ताटल्या किंवा इतर भांडी वापरू नयेत. स्वतःच्याच वस्तू वापराव्यात.

* शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.

* कोणाही पाहुण्याला बोलावू नका किंवा तुम्हीही कोणाकडे जाऊ नका.

* घरातल्या माणसांपासूनही १ हात दूर रहा.

 

social distance inmarathi 2
news18.com

 

टि.व्ही., रेडिओ किंवा सोशल मिडिया वर सरकारकडून जे जे काही काळजी घेण्याबाबत जागरूकता घेण्याचे संदेश फिरतात ते ते संदेश अमलात आणण्यासाठी शक्यतो प्रयत्न करा.

कारण ही विषाणूची पसरती साखळी आपणच तोडायला हवी, त्यासाठी हे सोशल डिस्टन्स ठेवणे खूपच गरजेचे आणि फायद्याचे आहे. त्याने एकाकडून दुसर्याकडे ह्या विषाणूचा संसर्ग होणे थांबेल.

ज्याप्रमाणे आपण साधा सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्याचे इतरांना किंवा इतरांकडून आपल्याला “इन्फेक्शन” होऊ नये म्हणून काळजी घेतो!

दूर राहतो सर्दी झालेल्या माणसापासून, त्याप्रमाणेच ह्या कोविद-१९ चा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्स गरजेचं आहे.

 

distancing inmarathi
guwahati plus

 

हे सोशल डिस्टन्सिंग वाढवताना एक गोष्ट मात्र आपल्याला कसोशीने पाळायला हवी, ती म्हणजे आपण मानसिक अंतर पडू द्यायचं नाही.

आपणच आपल्या माणसांना सपोर्ट करायचा, आपण सगळेच सक्तीने घरात बसलेलो आहोत, अशी संधी दुर्मिळ आहे, हे क्षण क्वचितच येतात.

सोशल डिस्टन्स ठेवताना इमोशनल डिस्टन्स वाढू द्यायचा नाही हे लक्षात घेऊन तसे वागायला हवे. म्हणजेच,

* लॉकडाऊनमुळे अस्वस्थता, चिडचिड होऊ शकते एखाद्याची, तेव्हा त्याला घरातल्यांनीच समजून घ्यायचं

 

soical inmarathi
livemint

 

* हा मिळालेला वेळ संधी म्हणून वापरून आपापल्या नात्यांना ताजेतवाने करण्यास वापरा.

* आपली नाती नव्याने समजून घेण्यासाठी वापरा हा वेळ.

* हे थोडे दिवस परिक्षेचे आहेत, कठिण आहेत, ह्या काळातच एकमेकांना धीर द्या. समजूतीने घ्या.

ह्या सगळ्या गोष्टी कसोशीने पाळल्या तर कोरोना विरूद्धची ही लढाई आपण जिंकूच पण आपण आपली नाती देखील मजबूत करू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?