' घरबसल्या व्यायाम कसा करावा हे सुचत नसेल तर या ८ टिप्स नक्की फॉलो करा – InMarathi

घरबसल्या व्यायाम कसा करावा हे सुचत नसेल तर या ८ टिप्स नक्की फॉलो करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावात लॉकडाऊन झालेल्या लोकांपैकी कित्येक लोक आपली जिम मिस करत असतील. रोजच्या व्यायामाला चुकल्याने हळहळत असतील.

अनलॉक केल्यानंतर जीम सुरु होण्याची आशा निर्माण झाली होती, पण कोरोना रुग्णांची वाढीव संख्या लक्षात घेता पुन्हा ही आशा मावळली.

अर्थात काही लोक उत्साहाने जिमला जाणारे असतात. तर काही लोक नाईलाजाने. दोघांनाही फिटनेसचे महत्त्व ठाऊक असते, तरीही काही जण रोज जीवावर आल्यासारखेच जिमला जायला निघतात आणि तिथे थोडंफार वर्कआऊट करून येतात.

 

john abraham inmarathi
YouTube

 

लॉकडाऊनच्या या काळात उत्साहाने जिमला जाणारे जिमला मिस करून हळहळले, तर नाईलाजाने मारूनमुटकून जिमला जाणारे मात्र चला काही दिवस तरी जिमला सुट्टी मिळाली म्हणून हुश्शही केले असेल कदाचित.

पण लॉकडाऊन होऊन घरी बसल्याने फिटनेसला पर्याय उरत नाही. किंबहुना आताच्या विषाणु-प्रादुर्भाव काळात तर शरीराला अधिक फिटनेसची गरज आहे.

घरी बसून मानसिक नैराश्यही या काळात येण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायामाला पर्याय नाही हेच खरे. परंतु जिमची साधने घरात नसतील तर व्यायाम करणार कसा? आणि घर लहान असेल तर अजूनच पंचाईत.

परंतु काळजी करू नका. जरा डोकं चालवलंत, तर घरबसल्याही व्यायामाचे आणि फिटनेसचे अनेक प्रकार तुम्ही रोज आजमावून बघू शकता.

त्यासाठी जिमलाच जायला हवं असं नाही. उपलब्ध साधनांमध्ये तुम्ही आपला वर्कआऊट चालू ठेवू शकता. नव्हे तसा तो चालू ठेवाच. कारण सध्या शारीरिक फिटनेसची गरज सर्वात अधिक आहे.

व्यायाम तुमची शारिरीकच नव्हे, तर मानसिक ताकदही वाढवतो. उत्साह देतो. त्याचप्रमाणे वेळही सत्कारणी लागतो. घरी बसून वेळ कसा घालवायचा यावर व्यायाम हे एक महत्त्वाचे उत्तर आहे.

 

yoga inmarathi
cosmoplitan india

 

घराबाहेर तुम्ही पडू शकत नसाल, तरी जर तुमच्या घराला अंगण असेल, सोसायटीतल्या सोसायटीत चालण्याइतकी जागा असेल, तर तुम्ही थोडी शतपावली करू शकता.

अर्थात जर तुम्हाला होम क्वारंटाईन केलेलं असेल, तुमच्यात कोरोनाबाधेची शक्यता असेल, तुम्ही परदेशातून आला असाल, तर मात्र घराबाहेर पडूच नका. अंगणातही नको. घरातल्या घरात व्यायाम करा.

धावणे किंवा चालणे –

घरातल्या घरात शक्य असेल तितक्या फेऱ्या मारून तुम्ही चालू शकता. त्यासाठी घड्याळ लावून वेळ ठरवू शकता.

 

home exercise inmarathi 2
CGTN

 

आजकाल स्मार्ट वॉचेस मिळतात ते तुमच्याजवळ असेल, तर त्यावरही तुम्ही दिवसाला किती चालायचं ते ठरवून चालू शकता.

जागच्या जागी धावणे, जागच्या जागी चालणे हे व्यायामातल्या वार्म-अपचे प्रकार देखील तुम्ही करु शकता.

फिटनेस डिव्हीडी किंवा यु ट्यूब –

आजकाल एक्सरसाईजसाठी पर्सनल कोचच्या स्वरुपात डीव्हीडी देखील मिळतात. तुमच्यापाशी ती असेल, तर त्यावर बघून तुम्ही तुम्हाला सूट होणार व्यायामाचे प्रकार ठरवून घरच्या घरी करू शकता.

किंवा यु ट्यूबवर मोफत मार्गदर्शनाचे अनेक व्हिडिओ या संदर्भात मिळू शकतील. त्यांना फॉलो करू शकता.

 

home exercise inmarathi

 

डंबेल्स, व्यायामाची साधनं नसली तरी घरातल्या वस्तुंचा वापर करू शकता.

उदा. डंबेल्सच्या जागी पाण्याच्या किंवा कोल्ड्रींक्सच्या बॉटल्स पाण्याने भरून त्यांचा वापर डंबेल्ससारखा करू शकता. पुश-अप्स काढू शकता. उठाबशा काढू शकता. सूर्यनमस्कार घालू शकता.

योग –

योगसाठी जागाही फार लागत नाही. एका चटईशिवाय दुसरी साधनेही लागत नाहीत. त्यामुळे व्यायामाला सर्वोत्तम पर्याय योगचा आहे. योग आणि प्राणायाम हे तुम्हाला शारिरीकच नव्हे, तर मानसिक आरोग्य देखील प्रदान करतात.

तुम्ही जर योग शिकला नसलात, तरी यु ट्यूबवर बघून योगातली प्राथमिक, सोपी आसने नक्की करू शकाल. योगने मानसिक शांती देखील मिळते.

 

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात प्रत्येक जण मानसिक दृष्ट्या देखील निराश झालेला आहे. घरात बसून कंटाळलेला आहे. चिडचिडलेला आहे.

या सर्वावर योग आणि प्राणायाम हा सर्वात चांगला उपाय आहे. हा नक्की ट्राय करून पाहा.

जोडीला ओमकार साधना, मेडीटेशन यांचीही मदत घेतली तर या लॉकडाऊन काळातही तुम्ही प्रसन्न आणि धीराने वागू शकाल.

डान्स –

डान्स किंवा नृत्य हा एक असा प्रकार आहे, जो शरीराला भरपूर व्यायाम प्रदान करतो आणि मनोरंजनही. डान्सचे अनेक प्रकार आहेत.

तुम्ही युट्यूबवर हिंदी सिनेमाची किंवा इतर गाणी लावून त्यावर नृत्य करू शकता.

 

dancing inmarathi
persangkaraoke.com

 

व्यायामाच्या ऍरोबिक्स तालावर व्यायाम करून एकाच वेळी व्यायाम आणि नृत्याचा आनंदही घेऊ शकता.

जर तुम्ही थोडंफार शास्त्रीय नृत्य शिकला असाल, तर त्याची प्रॅक्टीस करू शकता. काहीच डान्स येत नसेल, तर कमीत कमी गरब्याची धून लावून त्यावर तरी नक्कीच मनसोक्त नाचू शकता.

अॅप्स –

आजकाल मोबाईल्सवर एक्सरसाईजचे अनेक अॅप्स उपलब्ध असतात. ते डाऊनलोड करून तुम्ही त्यांच्या सुचनेप्रमाणे तुम्हाला हवा तसा व्यायाम रोज करू शकता.

हे अॅप्स विविध प्रकारचे असतात. खाली काही नावे दिली आहेत.
8 Fit
Tone up
Seven
Keelo
Nevou
Shreddy
SWEAT – Kyla Itsines fitness
Six packs in 30 days
Butt work out by 7 AM
Yoga wake up
Daily Yoga

साफसफाई –

काम का काम और व्यायाम का व्यायाम.

घरातच आहात तर घराची साफसफाई करून बघा. सफाईमध्ये शारिरीक श्रम होतात, पर्यायाने व्यायाम होतो. केरवारे करून लादी पुसणे हा उत्तम व्यायाम आहे.

 

house clean inmarathi
YouTube

 

उंचावरची जळमटं काढणे, स्टुलावर चढून पंखे, भिंती पुसणे, बाथरूममध्ये हाताने कपडे धुणे हे सगळे शरीराला भरपूर व्यायाम देणारे सफाईचे प्रकार आहेत.

करून बघा. भरपूर घाम काढणारे हे व्यायाम जिमपेक्षाही भारी वर्कआउटचे समाधान देतील

बागकाम –

शरीराला व्यायाम आणि हालचाल देणारा अजून एक प्रकार म्हणजे गार्डनिंग किंवा बागकाम. जर तुमचं स्वतंत्र घर असेल, तर अंगणात झाडं नक्की असतील. नसतील तर आता लावू शकता.

त्यासाठी बाहेरून झाडं आणण्याची गरज नाही. भाजीपाल्याच्या बियांची लागवड करू शकता.

 

tree-plantation-inmarathi
wildrangers.in

 

झाडांना खतपाणी करणे, माती उकरून सारखी करणे, बागेतला पालापाचोळा उचलून, झाडून त्याची विल्हेवाट लावणे, घरातील भाज्यांच्या कचऱ्यापासून खत प्रकल्प करणे इत्यादी अनेक कामांत वेळही कसा जातो ते समजत नाही.

शरीरालाही व्यायाम मिळून कामाचे समाधानही मिळते.

अंगण नसले, तरी घरातल्या गॅलरीतही छोट्या छोट्या कुंड्यामध्ये झाडं लावून हेच काम करू शकता. लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाता येत नसेल आणि कुंड्या नसतील तर जुन्या बालद्या, प्लास्टीकची भांडी, डबे, खोके यातूनही तुम्ही तुमची ही हौस पुरवू शकता.

 

लहान मुलांसोबत खेळणे –

घरात लहान मुलं असतील, तर त्यांच्यासोबत घरातल्या घरात पकडापकडी, लपाछपी, उड्या मारणे, दोरीवरच्या उड्या मारणे इत्यादीसारखे खेळ खेळून त्यांचंही मन रमवू शकता.

 

home exercise inmarathi 3
cosmopolitian

 

त्याचवेळी तुमच्या शरीरालाही व्यायाम, हालचाल देऊ शकता. त्यात दोघांचा वेळही छान जाईल आणि मनोरंजनही होईल.

तर अशाप्रकारे तुम्ही ठरवलंत तर घरातल्या घरातही घाम गाळण्याचे अनेक प्रकार आहेत. सध्या ते करणे गरजेचेही आहे. कारण सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचे काही असेल, तर शारिरीक आणि मानसिक आरोग्य जपणे.

तर घरातच राहा आणि सर्व काही करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?