कोरोनाच्या संकटात तुमच्या पाळीव प्राण्यांना वाचवायचं असेल तर ही काळजी घ्याच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आताच्या घडीला कोरोना व्हायरस हा एकच विषय सर्वत्र बोलला जातोय. टि.व्ही, रेडिओ, मिडिया, न्युज चॅनल सगळी सगळी कडे हाच एक विषय आहे.
जाहिरातींमधुनही ह्या व्हायरस विरूद्ध लढण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस ने सर्वत्र पसरवलेला हाहाकार आणि लागण झालेल्यांची, बळींची दिवसें दिवस वाढती संख्या ह्याबद्दलच सर्वत्र चर्चा आहे.
देशात अनलॉकची सुरुवात झाल्याने सोशल डिस्टन्स पाळणं अनिवार्य आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे, सरकारी वाहने, खाजगी वाहने सर्व बंद! चित्रपट, मालिका इत्यादींचे चित्रीकरणही पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आले आहे.
त्यामुळे घरात जणू काही नजरकैदेत असलेल्या लोकांना तेच तेच चित्रपट किंवा त्याच जुन्या मालिका बघाव्या लागत आहेत.
एका ठिकाणी ४ किंवा ५ माणसांनी एकत्र येऊ नये यासाठी लहान- मोठ्या, महत्त्वाच्या मिटिंग्ज रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातून ऑफिसेस देखील बंद!
काही काही खाजगी कंपनीचे कर्मचारी घरून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. भारत शासनाने ह्या जीवघेण्या कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी खूप कठोर पावले उचलली आहेत.
टोटल लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि ती २२ मार्च पासून ती अंमलातही आणण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार खूपच वेगाने झाला. फ़ेब्रुवारी, मार्च मध्ये उद्भवलेल्या ह्या व्हायरसने जवळ जवळ एक महिन्यातच १८० देशांमध्ये पसरला.
हजारो लोकं बळी पडलीत ह्या कोरोनामुळे! सर्व बलाढ्य, प्रगत देश हतबल झाले. भयंकर रोगाशी लढण्यासाठी लस-औषध मिळण्याआधी लोकं मृत्युमुखी पडू लागले.
हे भारतात होऊ नये, म्हणून ह्या व्हायरसला रोखून धरण्यासाठी शासनाने अतिशय जलद गतीने आणि कठोर असा टोटल लॉकडाऊनचा निर्णय घेऊन त्वरित अंमलात आणला.
परिस्थिती हळूहळू अटोक्यात येत असतानाच आता नवीन बातम्या हाती येऊ लागल्या आहेत. इतके दिवस फक्त माणसांनाच हा व्हायरस गिळंकृत करत होता, ह्याच्या संक्रमणाने माणसेच मृत्युमुखी पडत होती.
पण, आता नवीन बातम्या अशा येऊ लागल्या आहेत की, प्राण्यांनाही हा रोग होऊ शकतो. ह्या बातम्या कितपत खऱ्या आहेत, काय तथ्य आहे ह्यात, हे सगळं खरं आहे का?
चला तर आज आपण हे बघूया की कोरोना व्हायरस प्राण्यांना होतो का? आपण आपल्या पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यावी!
WHO (World health Organization) ने असं जाहिर केलंय की, हा रोग माणसांकडून माणसांकडे संक्रमित होतोय, कुत्रे किंवा मांजरी ह्यामुळे आजारी किंवा मृत्युमुखी पडल्याची कोणतीच उदाहरणे अद्याप पर्यंत नाहीत!
आता हा रोग कोणाकडून आला, कसा आला ह्यावर बरेच विचार-विमर्श झाले आहेत. खूप काही चर्चा झाल्यात ह्यावर! काही निष्कर्ष काढले गेले आहेत!
कोणाकडून कसा झाला ह्यावर खूप चर्चा झालीये. चीनमध्ये वूहान येथे उद्भवलेला हा रोग हजारो माणसांना गिळंकृत करूनही शांत झालेला नाही. त्यामुळे आता पाळीव प्राण्यांकडून हा रोग होईल का ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन सुरु केले आहे.
जसे- स्वाइन फ्लु सारखे रोग प्राण्यांकडून संक्रमित होतात, मनुष्याला प्राण्याकडून हे रोग होतात, कोरोना व्हायरस हा प्राण्यांना संक्रमित करतो किंवा प्राण्यांकडून मनुष्याला होतो असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही.
मनुष्याकडूनच मनुष्याला होतो हा रोग! पण,मनुष्याकडून पाळीव प्राण्यांना होतो का हा रोग?
तर आत्तापर्यंत झालेल्या संशोधनात अशा २ ते ३ केसेस् सापडल्यात ज्यामध्ये पाळीव कुत्र्याला हा रोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण तो कुत्रा हॉंगकॉंग मधील होता आणि त्याचे वय होते १७!
त्यामुळे तो खूपच वयस्कर असल्याने असे झाले असावे असे शास्त्रज्ञांनी मत मांडले आहे. त्यातही हे संक्रमण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह माणसाकडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुसरी एक केस बेल्जियम मधील एका पाळीव मांजरीची होती! तिलाही कोरोना पॉझिटिव्ह मनुष्याकडूनच संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, तिचे पुढे काय झाले त्याची अद्याप माहिती नाहीये.
पण ह्यामुळे एक गोष्ट तर नक्की झालीये की हा रोग मनुष्याकडून मनुष्याला किंवा मनुष्याकडून प्राण्यांना होतो. पण पाळीव प्राण्यांकडून मनुष्याला होत नाही.
तरीही आपण आपल्याकडे पाळीव प्राणी असल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी. कारण अर्थातच prevention is better than cure! म्हणजेच उपचारांपेक्षा सावधगिरी केव्हाही चंगलीच असते.
* आपण आपल्या पाळीव प्राण्यांना वारंवार हात लावतो, त्यांचे लाड करतो. आता तर आपण २४ तास घरात आहोत त्यामुळे हे साहजिकच आहे की आपण वारंवार आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना हात लावणार. त्यांना कुरवळणार.
पण, त्यांना हात लावल्यावर ताबडतोब हात धुवावे (ज्याप्रमाणे जाहिरातीत दाखवतात सॅनिटायझर किंवा हॅंड वॉशनी हात वारंवार धुवा). आपणच ही खबरदारी घ्यायाची आहे.
जेव्हा आपण त्यांचे जेवण तयार करून त्यांना देऊ तेव्हा तेव्हा देखील हात धुण्याची खबरदारी घ्यायची आहे. त्यांच्या प्लेटला किंवा पाण्याच्या भांड्याला हात लावला की लगेच हात धुवावे.
जास्तीत जास्त स्वच्छता बाळगणे हे लक्षात ठेवावे.
* आपत्कालीन परिस्थितीत पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ह्याकरिता ज्याप्रमाणे आपला प्रथमोपचार संच आपल्याकडे तयार असतो त्याप्रमाणेच, आपल्या पाळीव प्राण्यांसाठी देखील एक असाच प्रथमोपचार संच तयार ठेवावा.
ज्यात त्यांच्या औषधांच्या गोळ्या, मलम वगैरे असावं! त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्या-पिण्याचा देखील साठा करून ठेवावा.
* आपण पाळीव प्राण्यांना आपण घरच्या घरी इलाज करू शकत नाही किंवा काही कारणास्तव आपण आपल्या कुत्रा किंवा मांजरीकडे आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यामुळे लक्ष देऊ शकत नाही.
त्यासाठी जनावरांच्या डॉक्टरांची माहिती, प्राण्य़ांच्या सवयी, त्यांच्या आवडीचे अन्न, वैद्यकीय अटी औषधे ह्यांची माहिती एकाच ठिकाणी व्यवस्थित संग्रहित करून ठेवावी.
कोरोना व्हायरसच्या ह्या जीवघेण्या संकटाला आपण तोंड देण्यास सज्ज होऊया आणि आपल्या लाडक्या कुत्र्याला किंवा मांजरीला देखील ह्या संकटात नीट जपूया!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.