करोडो रुपयांची उलाढाल करणारा ‘हा’ उद्योजक चक्क ‘लुंगी’ घालून अटेंड करतोय व्हिडिओ मीटिंग!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या सर्वत्र आपल्याला एकच शब्द ऐकायला मिळतोय कोरोना! डोळ्यांनासुद्धा न दिसणाऱ्या इवल्याशा विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे!
या आजारामुळे कित्येक बलाढ्य देशांची आर्थिक सामाजिक घडी विस्कटलेली आहे, आणि यात भारताचा देखील समावेश आहे! युरोपियन देश अमेरिका इथे तर हा कोरोना चक्क तांडव करतोय!
आपल्या देशावर इटली स्पेन सारखी परिस्थिति ओढवू नये म्हणून आपल्या सरकारने वेळीच संपूर्ण देश लॉकडाऊन ची घोषणा केली आणि त्याला तसा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे!
आपल्याइथे अजूनही हा आजार आटोक्यात येत नसला तरी त्याचा फैलाव हा इतर देशांच्या मानाने कमीच आहे, आणि ही खूप पॉझिटिव्ह बातमी आहे!
आज संपूर्ण देश, राज्यांतर्गत तसेच जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा बंद केल्या आहेत! रेल्वे विमान वाहतूक सगळं ठप्प आहे, फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी वाहतूक चालू आहे!
या देशाने किंवा इथल्या लोकांनी असे चित्र कधीच बघितले नसेल इतका शुकशुकाट रस्त्यांवर बघायला मिळतोय!
या सगळ्या परिस्थितीत बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली असून खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची सोय करून दीलेली आहे!
बऱ्याच खासगी कंपन्या, एमएनसी ज्यांना त्यांचा उद्योग बंद ठेवणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची सोय करून घरून काम करायला सांगितले आहे!
आता घरून काम म्हणजे बऱ्याच लोकांना खूप आनंद होतो तर काहींना त्याच वाईट वाटतं!
ज्याच्या घरी एक दोन व्यक्तीच आहेत त्यांना काही अडचण होत नाही, पण ज्यांच्या घरी एकत्र कुटुंब राहतं किंवा घरात एखादं लहान बाळ असेल त्या व्यक्तीला शांतपणे घरून काम करणं शक्य होत नाही!
पण एकंदर या सगळ्या वातावरणात घरूनच काम करणं योग्य आहे कारण या रोगाचा सामाजिक संक्रमण झालं तर आपण विचार सुद्धा करू शकणार नाही इतका विनाश होईल!
पण हे झालं तुमच्या आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांची गोष्ट!
पण हे टाटा, बिरला, अंबानी सारखे मोठे मोठे उद्योजक घरी बसून काय करत असतील? किंवा ते ऑफिस ला जातच असतील ना?
असे प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे, बरं ही सगळी मोठी माणसं जरी घरून काम करत असतील तर ते तुमच्या आमच्यासारख्याच पद्धतीने काम करत असतील का?
मध्येच उठून थोडा टाइमपास केला, टीव्हीवर काय चाललंय पाहिलं, मस्त जेवण केलं, अर्धा पाऊण तास मस्त डुलकी काढली, स्वतः आज काहीतरी बनवून खाल्लं,
अशा गोष्टी ही लोकं सुद्धा करत असतील का हो?
तर यावर आत्ताच महिंद्रा ग्रुप च्या चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक मजेशीर गोष्ट ट्विट करून एका गोष्टीचा खुलासा केला आहे!
आनंद महिंद्रा यांनी नुकतच त्यांच्या ट्विटर हँडल वरुन ते घरून व्हीडियो कॉन्फरन्स करताना शर्ट च्या खाली लुंगी घालतात अशी कबुली दिली!
हे ट्विट करताना त्यांनी रीयॅलिटी विरुद्ध एक्सपेक्टेशन्स या वरचा एक विनोदी जोक आणि त्याचा फोटो शेयर करत त्यांनी हे ट्वीट केले!
ते म्हणतात की –
“मला एका गोष्ट कबूल करायची आहे, की मी बऱ्याचदा घरून व्हीडियो कॉन्फरन्स करताना लुंगी घालतो, पण आता हा फोटो बघून माझे सहकारी मला कॉलच्या दरम्यान उठायला सांगू शकतात, म्हणूनच मी हे आत्ताच स्पष्ट करत आहे!”
त्यांनी तो फोटो आणि ट्विट इतकं मजेशीर अंदाजात मांडलं की या ट्विटवर त्यांच्या फॅन्स आणि फॉलोअर्स यांनी सुद्धा तशाच उत्तम प्रतिक्रिया दिल्या!
काही लोकांना यावर विश्वास देखील बसेना की इतका मोठा बिझनेसमन घरी काम करताना सामान्य माणसासारखाच वागतो!
आणि हे पाहून आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्या व्यक्तीला सुंदर उत्तर दिलं!
गेल्याच आठवड्यात महिंद्रा ग्रुप चे मॅनेजिंग डायरेक्टर पवन गोएंका यांनी कांदिवली येथील फॅक्टरी मध्ये सर्जिकल फेस मास्क बनवण्याच्या प्रोसेस च्या उद्घाटनाचा व्हीडियो सोशल मीडिया वर शेयर केला!
त्यात महिंद्रा कंपनीचे बरेच मोठे मोठे लोकं व्हीडियो कॉन्फरन्स मध्ये होते, त्यात आनंद महिंद्रा यांचा सुद्धा चेहेरा दिसत आहे, गेल्या आठवड्यातच ही पोस्ट ट्विटर वर होती!
आणि आज आनंद महिंद्रा यांचा हा मजेशीर कबूल जवाब ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काच बसला असणार!
पण हे सगळे मोठे उद्योजक सुद्धा त्यांच्या घरी किती साधं आयुष्य जगतात याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे हे आनंद महिंद्रा!
आपल्याला वाटतं की कोटींवधी रुपयांची उलाढाल करणारे एकदम राजा सारखे राहात असणार, पण सरतेशेवटी ती सुद्धा तुमच्या आमच्या सारखी हाडा-मांसाची माणसंच आहेत!
टाटा असो नाहीतर महिंद्रा असो, यांच्या डोक्यावर विविध प्रकारची टेन्शन असतात, खूप मोठ्या जवाबदऱ्या असतात, इतक्या मोठ्या व्यापाराचा डोलारा सांभाळायचा असतो!
पण तरीही ते त्यांची सामान्य जीवनशैली कधीच सोडत नाही, आणि त्यांच्या या वागणुकीतूनच आपल्यासारख्या कित्येकांना प्रेरणा मिळते!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.