Site icon InMarathi

नेटफ्लिक्सच्या ‘या’ वेब सिरिजने २०१८ मध्येच केली होती कोरोनाची ‘भविष्यवाणी’!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगभरात सध्या कोरोना ने हाहाकार मांडलाय. आपल्या सगळ्यांवरच घरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

पण सबंध जगाला एक व्हायरस या प्रकारे खिळवून ठेवेल याची आपण कधी कल्पना सुद्धा केली नसेल.

पूर्वी सुद्धा प्लेग ,इन्फ्लुएन्झा सारख्या साथीने भारतात, जगात उच्छाद मांडला होता पण त्याला आता जवळपास शतक उलटून गेलंय आणि गेल्या तीन-चार पिढ्यांसाठी ही परिस्थिती अभूतपूर्व अशीच आहे.

 

kalinga tv

 

पण या विषाणू ची भविष्यवाणी एका कोरियन मालिकेतून वर्षभरापूर्वीच झाली होती!

कोरियन मालिका My Secret Terrius २०१८ ला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाली. या मालिकेच्या १० व्या भागात जे दाखवलं होतं ते पाहून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल!

सध्या ट्विटर आणि फेसबुक वर या मालिकेचे सीन्स गाजत आहेत त्यात कोरोना विषाणू बद्दल उल्लेख आलेला दिसतो.

 

mashable pakistan

 

बऱ्याच लोकांना वाटत की ही अफवा किंवा नंतर चित्रित केलेला व्हिडिओ असावा चला तर मग जाणून घेऊया नक्की सत्य काय आहे ते.

ट्वीटर आणि फेसबुक वरील बऱ्याच लोकांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिप्स मधे एक रुग्ण डॉक्टरांना कोरोना विषाणू बद्दल विचारताना दिसून येतो.

डॉक्टर त्याला हा एक श्वसन संस्थेच्या मार्गासंबंधी आजार असल्याचं सांगतात. डॉक्टर पुढे सांगतात की हा मर्स आणि सार्स सारख्याच विषाणू च्या गुणसूत्रांनी बनलेला आहे!

मात्र त्यातला मोठा फरक म्हणजे सार्स च्या विषाणूमुळे मृत्यू चे प्रमाण २०% होते तर या विषाणूत ते ८०%आहे!

 

the sun

 

My Secret Terrius मालिकेतील १० व्या भागात हा उल्लेख आहे हे अगदी खरं आहे.

आणि आश्चर्य म्हणजे, चीन मध्ये कोविद-१९ विषाणू ची सुरवात होण्यापूर्वी बरोबर एका वर्षा अगोदर म्हणजे २०१८ ला हा भाग प्रदर्शित झाला होता. या मालिकेत कोरोना विषाणू चा उल्लेख आहे.

वास्तवात कोरोना विषाणू चे बरेच प्रकार आहेत त्या पैकी केवळ ७ प्रकारचे विषाणू मानवाला अपायकारक मानले जातात. या मालिकेत उल्लेखलेला विषाणू मात्र काल्पनिक असून त्यात कोठेही कोविद-१९ असा उल्लेख आढळत नाही.

५३ मिनिटांच्या या मालिकेतील भागात पात्राला कळतं की कोरोना चा विषाणू एका विघातक विचारांच्या समूहाने जाणून- बुजून सगळ्या माणसांना अपाय करण्यासाठी तयार केला आहे.

 

market watch

 

या सगळ्या षडयंत्राला The Cors Project हे नावं देण्यात आलेलं असतं. पात्र पुढे सांगतो की कश्या प्रकारे या विषाणूहत्याराचा वापर दहशती साठी वेगवेगळ्या देशात केला जातोय.

मालिकेत जो कोरोना विषाणू सांगितला आहे तो पूर्णतः काल्पनिक आणि मनुष्यनिर्मित आहे. या विषाणू ची सुप्तावस्था २ ते १४ दिवसांपर्यंत असते आणि त्या नंतर ह्याची लक्षण दिसू लागतात.

काल्पनिक विषाणू माणसाच्या सान्निध्यात आल्यावर केवळ ५ मिनिटांत फुफ्फुसाना दुष्परिणाम करतो तसेच या विषाणू ने ९०% मृत्युदर गाठल्याचे दाखवले आहे.

या विषाणू वर कुठलाही उपाय किंवा लस उपलब्ध नसते. हात कसे स्वच्छ धुवावेत हे या मालिकेत आवर्जून दाखवलं आहे.

 

national geographic

 

सर्वच देशांना या संबंधी संशोधन करण्याची गरज आहे असंही या मालिकेत दाखवलं आहे.

या मालिकेत दाखवलेल्या परिस्थितीशी सध्याच बरंच साम्य जरी असलं तरी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की कोविद-१९ हा नैसर्गिकरित्या तयार झालेला विषाणू असल्याचं तपासा अंती सिद्ध झालं आहे.

तसेच या विषाणूचा विषाणू हत्यार असा काही उपयोग केलेला नाही.

मालिकेत जरी या विषाणू पासून ९०% मृत्यू दर सांगितला असला तरी ब्रिटिश पब्लिकेशन च्या एका प्रसिद्ध संशोधनानुसार कोविद-१९ मुळे होणारे मृत्यू हे १% किंवा त्याहूनही कमी असल्याचे सांगितले आहे.

 

YouTube

 

अर्थात या मालिकेत कोविद-१९ या विषाणू चा उल्लेख नाहीच!

पण तरीही कोरोना विषाणू चा प्रकार आणि श्वसन संस्थे संबंधी आजार यात साधर्म्य असल्याने जगभरातील नेटकरी सध्या या मालिकेच्या शोधार्थ गुगल धुंडाळताना दिसतात.

 

GMA network

 

गुगल ट्रेंड्स नुसार या मालिकेची माहीती संबंधी शोध घेण्याची मागणी २४ मार्च सकाळी ९:३० नंतर अचानक मोठ्याप्रमाणात वाढली.

या प्रकारच्या सिरीयल,सिनेमा विषयी माहिती घेणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली.

कोरोना विषाणू संबंधी अजून सुप्रसिद्ध सिनेमा २०११ ला प्रदर्शित झाला होता तो म्हणजे वॉर्नर ब्रदर्स चा Contagion.

 

kickstarter

 

या सिनेमात संपूर्ण जगभरात एका संसर्गजन्य रोगाने लाखो लोक मृत्यमुखी पडल्याचं दाखवलं आहे.

हा संसर्ग श्वसन मार्गाने होत असल्याचं तसेच मानवी स्पर्शाने विषाणू पसरत असल्याचं दाखण्यात आलं आहे.योगायोग म्हणजे संशोधनानंतर हा विषाणू वटवाघळापासून पसरल्याचे त्यात सांगितलं आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version