फेसबुकवरील जुन्या फोटोंवर कमेन्टचा ‘ट्रेंड’, खुद्द मार्क झुकरबर्गच्या डीपीवर – वाचा भन्नाट कमेंट्स
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आजचा लॉकडाऊनचा ७ वा दिवस आहे, संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस ने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे!
भारत, इटली, दुबई, अमेरिका, इंग्लंड अशा कित्येक देशांमध्ये या कोरोनाने थैमान घातलं असून या देशांना संपूर्ण लॉकडाऊन करायची वेळ आली आहे!
वाहतूक व्यवस्था, रेल्वे, बस सेवा, शाळा, कॉलेज, नाट्यगृह, सिनेमागृह, इतर फिरण्याची ठिकाणं, सगळी ऑफिसेस पूर्णपणे बंद आहेत, देशात संचारबंदी लागू केली असून, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे!
बऱ्याच ऑफिसेस नी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे! त्यामुळे सगळेच सध्या घरी राहून घरच्यांसोबत वेळ घालवत आहेत!
आता घरून काम म्हंटल की ते ऑफीस सारखे काम होत नाही, थोडी टंगळ-मंगळ, गप्पा-गोष्टी होतातच! त्यामुळे सध्या यासाठी सगळेच सोशल मिडियाचा पुरेपूर वापर करून घेत आहेत!
सध्या सोशल मीडिया आणि टीव्ही या दोनच गोष्टी लोकांची करमणूक करत आहेत, त्यातूनही टीव्ही वरच्या न्यूज चॅनल्स वर सुद्धा सारखं कोरोना विषयी ऐकून सुद्धा लोकं खूप वैतागले आहेत!
मग आता अशावेळी काय करायचं? हा प्रश्न पडतोच इतक्यात Whatsapp, Facebook, Instagram या सोशल मीडिया वर चालू झाले अत्यंत वेगवेगळे ट्रेंड!
“जर तुम्ही मला अमुक अमुक स्मायली किंवा हार्ट पाठवले तर तुमचा एक चांगला फोटो माझ्या स्टेटस वर ठेवला जाईल!”
अशा प्रकारचे टाइम पास टास्क सोशल मीडिया वर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आणि बघता बघता लाखो करोडो लोकं ते ट्रेंड फॉलो करू लागले!
खरंतर या अशा ट्रेंडस ना काहीच अर्थ नाही, निव्वळ टाइम पास आणि ह्या लॉकडाऊन मध्ये लोकांची जराशी करमणूक व्हावी हाच काय तो उद्देश!
याचबरोबर इंस्टाग्राम वर तर ‘Until Tomorrow’ या हॅशटॅग च्या नावाखाली स्वतःचे अत्यंत वाईट आणि विचित्र फोटो टाकायचा सुद्धा टट्रेंड खूप व्हायरल झाला!
या ट्रेंडच्या नावाखाली तर लोकांनी इतके भयानक फोटोज टाकले की काही विचारु नका!
पण अगदीच कालपासून ‘फेसबुक’ वर एक वेगळाच ट्रेंड चालू झाला आहे तो म्हणजे तुमच्या फ्रेंडलिस्ट मधले काही मित्र तुमचे जुने फोटो शोधून त्यावर अतिशय हास्यास्पद अशा २ ओळींच्या कविता करत आहेत!
या चरोळ्यांना काहीच अर्थ नाही, फक्त त्यात समोरच्याची अशा पद्धतीने कौतुक करायचं की ते कौतुक आहे की थट्टा या विचारात ती व्यक्ति पडली पाहिजे!
बरं या चरोळ्यांचे खरे कवि कोण आहेत हे अजून लोकांसमोर आलेल नाही, पण एकंदरच या अशा अतिशय बाळबोध पण तरीही तितकंच मनोरंजन करणाऱ्या कवितांचा सुळसुळाट तुम्ही पाहिला असेलच!
तुमच्यापैकी कित्येकांच्या किंवा सगळ्यांच्याच कुणीतरी खोचक मित्राने एखादीतरी अशी थुकरट चारोळी पोस्ट केली असणारच, ज्यावर इकीकडे तुम्हाला आनंद सुद्धा होतो आणि त्यावर हसू सुद्धा येतं!
त्या चरोळ्यांपैकी काही चरोळ्या म्हणजे अत्यंत भयंकरच आहेत, वाचून नक्कीच तुम्ही पोट धरून हसाल!
१. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा.. भाऊला पाहून आमच्या पोरी घालतात गजरा!
२. सगळ्या पोरी भाऊचे लाडाने ओढतात गाल..भाऊ म्हणतो कसा..काचरावाला आया घर से कचरा निकाल!
३. गावरान अंडी तळली तुपात.. काहीतरी खास आहे भाऊच्या रूपात!
आता बघायला गेलं तर यात काव्य नक्कीच आहे, कारण यमक जुळवण काही सोपं काम नाही, पण ह्या अशा चरोळ्या वाचून तो समोरचा माणूस हसावे की रडावे या संभ्रमात पडतो!
तरीही फेसबुक वर बरीचशी पब्लिक या सगळ्या गोष्टी स्पोर्टिंगली घेत आहेत, आणि हा ट्रेंड एंजॉय करत आहेत, या लॉकडाउन मध्ये एक विरंगुळाच जणू!
पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्यातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फेसबुक चे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग सुद्धा वाचलेले नाहीत!
हो, त्याच्या सुद्धा फेसबुक च्या प्रोफाइल पिक्चर वर या अशा कवितांचा पाऊस पडलेला पाहायला मिळेल, हो आणि ही सगळी अकाऊंट भरतातीलच आहे, काही खरी असतील तर काही खोटी!
चला तर बघूया चक्क मार्क झुकरबर्ग च्या फोटोवर नेमक्या काय कॉमेंट आलेल्या आहेत, ह्या सुद्धा वाचून तुम्हाला प्रचंड हसू येईल!
आता ह्या चारोळ्यामध्ये मार्क यांना अगदी बाबुराव आपटे यांच्यापासून ते थेट आसाराम बापू पर्यंत जोडलं, काहीनी तर असंही सांगितल की जर हा माणूस जोडीदार असेल तर आयुष्यभर लॉकडाऊन मध्येच राहू!
आता खरं पाहायला गेलं तर ही प्रोफाइल काय मार्क झुकरबर्ग स्वतः वापरत नसणार हे बहुतेक सगळ्यांनाच ठाऊक असावं, ही प्रोफाइल हँडल करणारी पीआर टीम वेगळी असते!
आणि जरी ही प्रोफाइल मार्क याचीच असेल तरी त्याला कुठे मराठी समजतय त्यामुळे.. कसली भीती टाका अजून कविता!
आपल्या लोकांना टाइमपास कसा करायचा किंवा एखाद्या फुटकळ गोष्टीला सुद्धा ट्रेंडिंग कसं करायचं हे अगदी परफेक्ट जमतं! आता अर्थात ह्या कविता ना मार्क स्वतः वाचणार ना त्यांची टीम!
पण तरीही विरंगुळा म्हणून कुठवर जावं हे या उदाहरणावरून स्पष्ट होते!
अर्थात याला ही लोकं तरी काय करणार म्हणा, घरात बसून गप्पा-गोष्टी, भांडणं, काम सगळं आटोपून मन नाही भरलं की आहेच बाकीचा वेळ मनोरंजन करायला सोशल मीडिया नावाचं खेळणं!
अजून काय काय ट्रेंड बघायचे आहेत देवच जाणे, असो जोवर लॉकडाऊन आहे तोवर मजा करून घेऊया, तुम्ही सुद्धा असले कुठले अजब ट्रेंड फॉलो करत असाल किंवा माहीत असल्यास कॉमेंट मध्ये जरूर कळवा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.