Site icon InMarathi

कोरोनाच्या भितीने घरात बसून ‘बोअर’ झालेल्या ‘बच्चे कंपनीला’ बिझी ठेवायचे हे फंडे वाचाच

taare zameen par featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

लॉकडाऊनच्या या काळात घरातली मोठी मंडळी देखील बोअर झाली आहेत. रोजचे रुटीन गायब होऊन घरात स्वतःला कोंडून घेण्याचे दिवस आलेत. त्यामुळे मोठी माणसेही अस्वस्थ होताना दिसतात.

त्यांनाही नैराश्य येतेय. सगळं समजत असूनही या भावना येतात. अशावेळी घरात जी छोटी मंडळी, छोटी मुलं आहेत त्यांना तर बोअर वाटणं साहजिक आहे.

अशा वेळी मुलं आपल्या डोक्याशी भुणभुण करत राहतात. ‘कंटाळा आला’ हे पालुपद सतत गिरवत राहतात. त्यांच्या या भुणभुणीने मोठी माणसे अजून वैतागतात.

सध्या काही विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा सुरु झाली असली तरी, उरलेल्या दिवसभरात काय करायचं हा प्रश्न आहेच.

 

the economic time

 

या छोट्यांना कशात आणि कसं रमवून ठेवायचं असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मोबाईल गेममध्ये छोटी मंडळी रमते. परंतु दिवसभर मोबाईल गेम खेळत राहणे ही देखील चांगली गोष्ट नाहीच ना.

अशावेळी त्यांना कंटाळाही येणार नाही आणि त्यांचा वेळ काही तरी सर्जनशील ऍक्टीव्हीटीजमध्ये गुंतून राहील, शिवाय आपल्यामागची त्यांची भुणभुणही थांबेल असे काही तरी आपल्याला नक्की करता येईल.

खाली त्यांना अशाप्रकारे गुंतवून ठेवण्याचे काही फंडे देत आहोत. ते तुम्हाला आणि तुमच्या घरातील छोट्या मंडळींनाही नक्की आवडतील आणि त्यातले काही तुम्ही आजमावून देखील पाहू शकाल.

तीन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी –

१. स्वयंपाकघरात काम

२. फुगे उडवणे

 

the Indian express

३. पेन्टींग

४. अडथळ्याची शर्यत

५. उड्या मारणे

साधारण बालवाडीतल्या वयातल्या मुलांना रमवणं हे सगळ्यात कठीण काम असतं. अशावेळी त्यांना इतर खेळात गुंतवून आपण आपली कामं करत राहणं हे सोपं नसतं.

त्यापेक्षा आपण जी कामं करतो त्या कामात त्यांनाही सामील करून घेणं हे अधिक चांगलं असतं. म्हणजे आपलं त्यांच्यावर लक्षही राहतं आणि त्यांचं मनही रमतं.

उदा. जर तुम्ही सैपाक करत असाल तर अशावेळी या छोट्य मंडळींना सैपाकघरात आपल्या सोबत ठेवा आणि त्यांना काही तरी छोट्या मोठ्या कामात गुंतवून ठेवा.

उदा. काही भाज्या निवडायला देणं, उकडलेला बटाटा, केळी स्मॅश करायला देणं, ताक घुसळायला देणं इत्यादी.

किंवा साबणाचे बुडबुडे (बबल्स) किंवा फुगे उडवणं हा खेळ या वयातील मुलांना अतिशय आवडतो. त्यासाठी बाजारातून त्यासाठी लागणारे सामान आणून घरात ठेवा.

 

the hindu

 

किंवा सैपाकघरातील स्ट्रॉ वगैरेच्या साहाय्याने त्यांना हा खेळ तयार करून द्या. या वयातील मुलांना रंगकाम करायलाही आवडते. क्राफ्टवर्क, पेन्टींग इत्यादीचे सामान घरात राहू द्या.

कागदाच्या होड्या इत्यादी बनवणे शिकवा. गाद्या उशांचा मनोरा रचून त्यावर उड्या मारण्याचा खेळही अशी मुलं खेळू शकतात.

छोट्या उंचीच्या टेबलावरून, खुर्चीवरून उड्या मारणे, कोलांटउड्या मारायला शिकवणे इत्यादी खेळात मुलं खूप आनंदाने रमतात आणि त्यांचा शारिरीक व्यायामही होतो.

५ ते ७ वर्षांची मुलं –

१. लपवून ठेवलेल्या वस्तू शोधणे

२. ठोकळ्यांपासून वस्तू बनवणे

 

visualsstock.com

 

३. घरकामात मदत करणे

४. क्राफ्ट, पेन्टींग इत्यादी

५. आपली कामं आपण करणे

घरात काही वस्तू लपवून त्यांना शोधायला लावणे या खेळात या वयातली मुलं रमतात. फार अवघड जागी काही लपवण्याची गरज असते असे नाही.

किंवा अमुक एका रंगाच्या वस्तू शोधून आणणे, मऊ वस्तु गोळा करणे असे बदलही यात सांगू शकतो.

बाजारात वेगवेगळे ठोकळ्यांचे खेळ मिळतात. ज्यांच्या रचनेतून वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात.

या वयातील मुलांनाही स्वयंपाकघरात छोटी मोठी कामं, भाज्या धुणं, काही मटारसारख्या सोप्या भाज्या सोलणं, झाडून घेणं, पुसून घेणं, लॉन्ड्रीचे कपडे वेगळे काढणे अशी कामं सोपवू शकतो.

 

the Indian express

 

त्याने त्यांच्या हाताचे कौशल्यही वाढते आणि त्यांना अशी कामं करायला आवडतातही. क्राफ्ट, पेन्टींग, चित्र काढणं, स्केचेस काढणं, चित्र रंगवणं इत्यादी टास्क त्यांना देऊ शकतो.

आपली स्वतःची कामं उदा. आंघोळीला जाताना आपले कपडे काढून ठेवणे, आपला ब्रश आपण शोधून त्यावर पेस्ट घेणे, आपले केस आपण विंचरायला शिकणे,

आपल्या अंथरूणाची घडी करायला शिकवणे इत्यादी कामे त्यांना देऊन त्यांना त्यात गुंतवूही शकतो आणि त्या निमित्ताने त्यांना स्वावलंबनाची शिस्तही लागू शकते.

८ ते १० वर्षांची मुले –

१. पत्र लिहिणे

२. पुस्तकं वाचणे

 

ICSE board

 

३. निसर्गात फिरवून आणणे

४. विज्ञान प्रयोग

५. व्यायाम, डान्स इत्यादी

या वयातील मुलांना पत्रं लिहायला शिकवून त्यांना त्यात गुंतवू शकतो. यामुळे त्यांचे लेखनकौशल्य वाढीस लागते. भाषा सुधारते.

त्यांच्या वयाला साजेशी कॉमिक्स पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं त्यांना वाचायला देऊ शकतो. त्यांच्यासोबत लहान मुलांचे सिनेमे, नाटकं इत्यादी टिव्ही किंवा मोबाईल, लॅपटॉप इत्यादीवर बघू शकतो.

 

campusplanet.net

 

फेरफटका मारायला नेऊ शकतो. यासाठी दूर कुठली बाग शोधतच जावं लागतं असं नाही.

आपल्या घरातल्या अंगणात, शेजारी वगैरे नेऊन उपलब्ध झाडांची ओळख करून देणे, अंगणात येणाऱ्या पक्ष्यांची ओळख करून देणे, रात्री आभाळातल्या ताऱ्यांची ओळख करून देणे,

दिशांची ओळख करून देणे फुलं, फुलपाखरं, चतूर यांचे निरीक्षण करायला शिकवणे अशा गोष्टी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो.

वेगवेगळे खेळ, पळापळी, पकडापकडी सूर्यनमस्कार इत्यादींमधून त्यांच्या शरीराला व्यायाम मिळेल असे खेळ देऊ शकतो. संगीताच्या तालावर डान्स करण्यास सांगू शकतो.

अशा तऱ्हेने सर्व वयातील लहान मुलं, कुमारवयीन मुलं यांना विविध प्रकारे घरात रमण्यास उद्युक्त करू शकतो.

 

saanwe dance

 

वरील वेगवेगळ्या प्रकारांशिवाय अजून पुस्तकं वाचणे, कोडी सोडवणे, त्यांच्या वयाला साजेसे सिनेमे दाखवणे या गोष्टी देखील करता येतील.

सर्व वयातील मुलांना पालक आपल्या नातेवाईकांची ओळख घर बसल्या करून देऊ शकतात. त्यासाठी स्काईपची मदत घेऊ शकतात. ऑनलाईन माध्यमांची मदत घेऊ शकतात.

अशाने दूर दूर राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांची ओळख ते करून घेऊ शकतात. त्यांच्याशी संवाद साधू शकतात. एक आपुलकीचे नाते यातून तयार होऊ शकते.

पालक या मुलांना आपल्या काळातली खेळांची ओळख करून देऊ शकतात. उदा. पत्ते, कॅरम, चेस इत्यादी खेळ शिकवू शकतात.

 

the hindu

 

घरं मोठी असतील तर घरात छोटीशी घसरगुंडी ठेवली तर अगदी लहान मुलं त्यावर दिवसभर खेळत रमतात.

इकडे तिकडे पडलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवणे, कचरा पडलेला दिसला की त्वरीत उचलून घेणे, मोजांच्या जोड्या करून नीट जागी ठेवणे अशी अनेक कामे मुलांना करायला आवडतात.

फक्त त्यांना ती नीट समजावून सांगता यायला हवी.

मोठ्या मुलांना छोटे छोटे विज्ञानाचे प्रयोग करायला शिकवू शकतो. त्यासाठी त्यांच्या विज्ञान पुस्तकांची मदत घेऊ शकतो. या मुलांना काही छोट्या छोट्या रेसिपीही शिकवू शकतो.

बटाटे उकडणे, कूकर लावणे, भांडी जागी लावून ठेवणे अशी कामेही सोपवू शकतो.

व्यायाम करणे, योगाच्या छोट्या छोट्या हालचाली शिकवणे, ओमकार शिकवणे, गाणं शिकवणे अशा गोष्टीही करता येतील.

 

now playing utah

 

आपण पाहिले की विविध वयाच्या मुलांना घरातच थांबून ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. पण या सगळ्या गोष्टी मुलांकडून करून घ्यायच्या तर त्यासाठी आधी पालकांची तयारी हवी.

आपल्या घरातील मुलांना खेळासाठी किंवा टास्कसाठी लागणाऱ्या वस्तु नेहमी घरात राहतील याची काळजी घेणे हे. शिवाय मुलांना वेळेची शिस्त लावणे हे देखील पालकांना करावे लागेल.

त्यासाठी पालकांना आधी स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागेल. त्यासाठी घरात सर्वांसाठी टाईम-टेबल तयार करावे लागेल. त्यावर अंमलबजावणी करावी लागेल.

 

getmeroof

 

जेवणाच्या, झोपण्याच्या, खेळण्याच्या, आंघोळ इत्यादींच्या वेळा नक्की करून मुलांना त्याचे पालन करण्यास उद्युक्त करावे लागेल. त्यासाठी त्यांना काही बक्षिसांचे आमिषही दाखवता येईल.

एकाहून अधिक मुलं असतील तर अमुक एक काम कोण आधी करतं अशी स्पर्धाही त्यांच्यात लावता येईल.

तर मंडळी, जर नेमकी आखणी केली तर सर्व वयातील मुलांना घरात अडकवून ठेवणं हे फार कठीण काम नाही हे तर तुमच्या लक्षात येईलच.

शिवाय मुलांना रमवता रमवता नकळत आपणही या सर्व गोष्टीत रमून जाऊ आणि हा कठीण काळ आपल्यालाही कंटाळवाणा ठरणार नाही….

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version