' अभिमानास्पद : या कंपनीने विक्रमी वेळात कोरोनासंबंधी भारताची मोठी समस्या सोडवलीये… – InMarathi

अभिमानास्पद : या कंपनीने विक्रमी वेळात कोरोनासंबंधी भारताची मोठी समस्या सोडवलीये…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगभरात कोरोनाने थैमान घातलंय. चीन मध्ये सुरु झालेल्या या विषाणूचा प्रसार फेब्रुवारी अखेरीस संपूर्ण जगभरात झाला.

इटली, ब्रिटन, फ्रान्स जर्मनी, अमेरिकेसारख्या अनेक विकसित आणि बलाढ्य देशांना या विषाणूने गुडघे टेकायला लावले आहेत. प्रिन्स चार्ल्स  ब्रिटनचे पंतप्रधान हे देखील ह्या विळख्यात सापडले आहेत.

भारतात ह्या साथीचा पहिला रुग्ण आढळला जानेवारीला शेवटी आणि तेव्हापासून हा आकडा सातत्याने वाढतोच आहे. भारत सरकार तो आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सुरवातीला बाहेरील देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करणे इथपासून ते १५ एप्रिल पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे बंद करणे इथपर्यंत सगळे उपाय करण्यात आले आहेत.

 

janta curfew inmarathi
CineJosh

 

२१ दिवसांचा लोकडाऊन घोषित करण्यात आला आहे. येणारे काही दिवस हे अत्यंत कठीण आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सरकारला मदत करणे आवश्यक आहे.

लॉकडाउनच्या काळात घरी बसून सरकारला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. 

भारतात जसा कोरोनाचा धोका वाढत आहे तसा आरोग्य यंत्रणेवर ही ताण येत आहे. भारतात आरोग्यविषयक उपकरणांचीही कमी आहे.

कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या किट्स देखील जास्त नाहीत. जसे रुग्ण वाढत जातील तस-तशी या किट्स ची आवश्यकता प्रचंड भासेल.

आपल्याकडे साधे किट्स नाहीत, तर उपचार कसे होतील? याच्या चर्चा सगळीकडे होत होत्या.

 

corona vaccine inmarathi 1
nbc news

 

खबरदारीचे अनेक उपाय सरकारकडून केले जात असताना आपल्यातीलच काही नागरिक विविध प्रकारे सरकारची मदत करण्यासाठी धडपडत आहेत.

त्यापैकीच एक आहे पुण्यातील स्टार्टअप मायलॅब.

मायलॅबने केवळ दीड महिन्याच्या कमी कालावधी मध्ये करोना चाचणी करणारे किट तयार केले आहेत. सध्या भारताला हे किट दुसऱ्या देशातून मागवावे लागत आहेत.

अर्थात विमान उड्डाणे बंद असल्याने ह्यात ही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परंतु भारतातच ह्या किट चे उत्पादन चालू झाल्याने एक मोठी समस्या दूर होऊ शकते.

मायलॅबचे मेडिकल डायरेक्टर डॉ वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्याकडे २०००० किट्स दर दिवशी बनवण्याची क्षमता आहे. परंतु गरज पडल्यास ते दर दिवशी ५०००० किट्स बनवू शकतात.

क्षमता वाढवण्यासाठी त्यांना ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो. एका किट मध्ये जवळपास १०० चाचण्या होऊ शकतात.

इतर किट्स च्या तुलनेत, ज्यांना चाचणीसाठी ७-८ तास लागतात, मायलॅब किट्स केवळ २.५ तासात चाचणी करू शकतात . ह्याचाच अर्थ असा की, कोणतीही प्रयोगशाळा दुप्पट वेगाने चाचण्या करू शकेल.

 

corona virus kit inmarathi
loksatta

 

भारतात कुठल्या ही विषाणू संसर्गाची चाचणी करण्यासाठी प्रथम इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्याकडून मान्यता मिळवावी लागते.

ही संस्था केवळ १००% यशस्वी चाचणी करणाऱ्या किट्स नाच मान्यता देते. देशात अशा अनेक संशोधन प्रयोगशाळा आहेत ज्या विविध प्रकारचे किट्स बनवत असतात, परंतु  यशाची टक्केवारी साधारण ७०% असते.

मायलॅब चे किट १००% यशस्वी चाचणी करत असल्याने ह्या किट ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ची मान्यता मिळाली आहे.

तसंच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी हे किट तयार करण्याची परवानगी मायलॅबला दिली आहे. भारतीय बनावटीचे हे किट आयात केलेल्या किटपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आहेत.

फार्मा कंपनीत काम करणाऱ्या सातजणांनी एकत्र येऊन ही कंपनी सहा ते सात वर्षांपूर्वी स्थापन केली. स्वतःसाठी आणि समाजासाठी उपयोगी होईल असे काहीतरी करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी काम सुरू केले.

 

my lab test kit inmarathi
business today

 

येथे बायलॉजिकल किट्सचं संशोधन होते. NAC हे त्यांच पहिलं उत्पादन होते.

रक्तदानादरम्यान पसरणाऱ्या रोगांची संख्या भारतात मोठी आहे. त्यावर त्यांनी एक किट तयार केलं होतं, त्यामुळे अशा प्रकारच्या किट तयार करण्याचा अनुभव ह्या कंपनीला होता.

युरोप मध्ये ही साथ पसरल्यावर कोविड १९ चे चाचणी किट तयार करायचे त्यांनी ठरवले.

ह्या किट वर संशोधन करण्याचे काम ज्या पथकाने केले त्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे एका मराठमोळ्या शास्त्रज्ञ महिलेने. त्यांचं नाव आहे डॉ. मीनल दाखवे भोसले.

त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा ह्यावर काम सुरु केले तेव्हा त्यांची स्वतः ची तब्येत गरोदरपणामुळे नाजूक होती, तरीही अथक परिश्रम घेऊन त्यांच्या पथकाने हे काम ६ आठवड्यात पूर्ण केले ज्याला इतर वेळी कमीत कमी ६ महिने लागू शकतात.

 

corona minal inmarathi
India Tv

 

त्यांच्या म्हणण्यानुसार,” हे एक चॅलेंज होतं. कारण भारतात कोरोनाचे रुग्ण वाढणार, ही शक्यता होती.  आणीबाणीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे

पण मी हे चॅलेंज स्वीकारायचं ठरवलं. मला माझ्या देशासाठी असं काहीतरी करायला मिळालं याचा मला आनंद आहे. देशासाठी काहीतरी चांगलं करायचं ही माझी इच्छा होती”.

त्यांच्यासह या प्रोजेक्टमध्ये अजून दहा जण सामील होते. या सगळ्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले.

 

my lab team inmarathi
times of india

 

त्यांनी देशसेवेचे हे आव्हान स्वीकारून ते यशस्वी ही करून दाखवले आणि त्यानंतर तयार किट १८ मार्च रोजी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजि येथे देऊन मगच त्या थांबल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी डिलिव्हरी केली.

मायलॅब च्या संपूर्ण टीमने अथक मेहनत करून भारतीय बनावटीचे किट तयार करून वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे.

पुण्यातल्या मायलॅब या फर्ममध्ये विकसित केलेल्या या किट मध्ये एकाच वेळेस १०० तपासण्या करता येतात. हे किट तयार करण्याची पूर्ण परवानगी सरकार कडून मायलॅबला देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बेंगलोर याठिकाणी पहिल्यांदा तयार झालेल्या १५० किटचे वाटप करण्यात आले आहे.

सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?