Site icon InMarathi

इन्फोसिस कर्मचारी म्हणवणाऱ्याचा “कोरोना जिहाद”! “शिंकून कोरोना प्रचार करा” म्हणणारा अटकेत

mujeeb mohammad featured inmarathi

asianet newsable

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कोरोना, कोरोना, कोरोना हेच शब्द आपल्याला ऐकायला मिळत आहेत. संपूर्ण जगभरात त्याची दहशत आहे. चीनमध्ये तर कित्येक लोकांनी जीव गमावला!

आता इटलीने चीनला मागे टाकलं, कोरोना मुळे इटलीमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत.

भारतातील कोरोनाग्रस्त यांचा आकडा हा ६०० पेक्षा जास्त झाला असून १३ लोकांनी त्यांचा जीव देखील गमावला आहे! एक,दोन देश नव्हे तर जगभरात या रोगाने आपली दहशत पसरवली आहे.

 

times of india

 

या साथीच्या रोगाबरोबरच अफवा, दिशाभूल करणाऱ्या बातम्या, दावे, सल्ले यालाही उधाण आले आहे.

फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, स्पेन, इराण आणि अमेरिका सगळीकडे कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. आता भारतातही त्याचा परिणाम दिसून येत आहे.

भारतात आता सगळीकडे संचारबंदी लागू होऊन लॉक डाउन झाले आहे.

जगभरातील विमान सेवा बर्‍यापैकी खंडित झाली आहे. लॉक डाऊन मुळे रस्ते ओस पडले आहेत, रस्त्यावरची वाहने कमी झाली आहेत रेल्वे बंद आहेत, वाहन विक्री देखील मंदावली आहे.

गाड्या आहेत पण चालवायला मिळत नाहीये.

आणि ह्या अशा वातावरणात प्रत्येक न्यूज चॅनल, आपल्या देशाचे नेते, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री लोकांना एकच आव्हान करताना दिसत आहेत ते म्हणजे ‘घरी रहा.. सुरक्षित रहा’!

 

Pgurus

 

मीच माझा रक्षक असे स्लोगन्स सुद्धा सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे!

पण या अशा वातावरणात जर कुणी तुम्हाला सांगितलं आणि उकसवले की “बाहेर जाऊन श्वास घ्या म्हणजे तुम्हाला कोरोना ची लागण होईल” असे सांगणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कशी वागणूक द्याल?

होय, आजच बेंगलोर येथे एका व्यक्तीला असंच चिथवणारे भाष्य केल्या बद्दल अटक करण्यात आले आहे, तर हा नेमका प्रकार काय आहे तेच आपण जाणून घेऊ!

स्वतःला इन्फोसिस या कंपनीचा सीनियर टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट म्हणवणाऱ्या मुजीब मोहम्मद या माणसाने नुकतीच एक लोकांना चिथवणारी फेसबुक पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले आहे,

“सगळ्यांनी मुक्तपणे बाहेर हिंडून श्वास घ्या आणि कोरोना व्हायरस पसरवण्यास हातभार लावा.”  आणि यातले व्हायरस पसरवा हे शब्द ठळक केले होते!

 

twitter

 

ही पोस्ट जशी व्हायरल झाली तसं बेंगलोर च्या जॉइन्ट कमिशनर संदीप पाटील यांनी ताबडतोब त्या मुजीब ला अटक केली आणि त्याच्यावर एफआयआर दाखल केलीआहे!

पुढे मिडियाशी संवाद साधताना ते म्हणाले,

“अशी विकृत पोस्ट करणाऱ्या मुजीब मोहम्मद याला आम्ही अटक केली असून त्याच्यावर प्राथमिक तक्रार नोंदवली आहे, हा माणूस स्वतःला एका सॉफ्टवेअर कंपनीचा कर्मचारी सांगत असून तो २५ वर्षांपासून बेंगलोर इथला रहिवाशी आहे.”

 

new indian express

 

या व्हायरल पोस्ट नंतर ट्विटर आणि इतर सोशल मीडिया पेजेस वर इन्फोसिस कंपनीला खूप लोकांचा रोष पत्करावा लागला आहे!

या प्रकरणार इन्फोसिस च्या ऑफिशियल पेज वरून सुद्धा खुलासा करण्यात आला तो असा,

“ज्या कुणी कर्मचाऱ्याने ही पोस्ट केली असेल त्याच्या विरुद्ध लगेचच कडक कारवाई केली जाईल, अजून या सगळ्या प्रकरणाची चौकशी चालू आहे!”

 

twitter

 

इन्फोसिस ही कंपनी नारायण मूर्ती आणि सुद्धा मूर्ती या प्रतिष्ठित दाम्पत्याची आहे, त्यांची कामं, त्यांचे विचार, त्यांची सामाजिक संवेदनशीलता याविषयी कुणालाच तीळमात्रही शंका नाही!

त्यामुळे त्यांच्याच कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याने अशी पोस्ट करणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप अपमानास्पद गोष्ट आहे!

पण यावर ते नक्कीच कडक कारवाई करतील अशी खात्री देखील आहे!  

 

the news minute

 

खरंतर ह्या अशा गंभीर वातावरणात कुणालाच काही समजत नाहीये, सगळेच लोकं अत्यंत चिंतेत आहेत, आणि कोरोना पेशंट चे वाढत जाणारे आकडे ही चिंता आणखीनच गडद करत आहेत!

दिवसागणिक किमान ५ ते १० नवीन पेशंट समोर येत आहेत!

आणि या अशा परिस्थितीत इतकं भयानक आणि उग्र भाष्य सोशल मीडिया वर करणे हे साऱ्या माणुसकीलाच काळिमा फासणारं आहे, भले ते भाष्य कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने करो!

असे भाष्य करणे अनैतिक आहे, बेकायदेशीर आहे आणि माणुसकीच्या विरुद्ध आहे! असे विकृत विचार वेळीच थांबवले पाहिजेत!

 

deccan herald

 

नाहीतर १३० करोडच्या या देशात अराजकता पसरायला वेळ लागणार नाही!

या सगळ्या मधून आपण एकच बोध घेऊ शकतो, की या अशा परिस्थितीत सोशल मिडियाचा वापर हा केवळ योग्य माहिती देण्यासाठी करू शकतो!

आधीच सगळीकडे भीषण वातावरण आहे, त्यात या अशा भडकाऊ पोस्ट किंवा अफवा न पसरवता आपण सगळे मिळून या संकटाला सामोरे जाऊया, आणि २ हात करून त्या कोरोना ला हद्दपार करूया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version