Site icon InMarathi

२६/११ च्या भीषण हल्ल्यात हे ठिकाण सुद्धा होतं ‘टार्गेट’ – जिथे ४ इस्रायली ज्यू मारले गेले

26 11 fetaured inmarathi

DNA india

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२६/११/२००८ हा दिवस भारतातील कोणीही व्यक्ती विसरू शकणार नाही. विशेषतः मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. कारण त्यादिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता.

पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याने मुंबईकरांचं जनजीवन ढवळून निघालं होतं.

समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणांवर हल्ले केले. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, सीएसटी ही ठिकाणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत.

 

YouTube

 

त्याच बरोबर ‘छबाड हाऊस’ इथे देखील दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. पण तो हल्ला करण्यामागे एक विशिष्ट हेतू होता असं म्हणायला हरकत नाही.

दक्षिण मुंबईतील कुलाब्यात छबाड हाऊस ही बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग आधी नरिमन हाऊस या नावाने ओळखली जायची.

ही सहा मजली इमारत होती एका इस्रायली कुटुंबाची. ज्यू समाजातील लोकांना मदत करणारी किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचणारी त्यांना हवी असणारी मदत करणारे केंद्र त्या इमारतीमध्ये होते.

गॅवरीयल आणि रिविका होल्टझबर्ग हे दांपत्य ते केंद्र २००६ पासून चालवायचे.

 

india times

 

इमरान बाबर आणि नासिर या दोन दहशतवाद्यांनी छबाड हाऊस या बिल्डिंग वर हल्ला केला आणि त्यात त्यांनी गॅव्रियल आणि रीविका हॉल्टझबर्ग या दाम्पत्याचा वध केला.

आणि त्या इमारतीचा ताबा घेतला. जवळ-जवळ तीन दिवस ते तिथे लपून बसले होते. शेवटी सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) च्या कमांडोंनी ऑपरेशन टोर्नाडो अंतर्गत या इमारतीवर हल्ला केला!

आणि त्यात त्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. त्यामध्ये एक कमांडो देखील शहीद झाला.

इमरान बाबर आणि नसीर हे समुद्रामार्गे मुंबईत आले. त्या दहशतवाद्यांचं ट्रेनिंग हे पाकिस्तान मध्ये झालं होतं. लष्कर-ए-तय्यबा ने त्यांना प्रशिक्षण दिलं होतं.

 

vos iz neias

 

२६  ते २८ नोव्हेंबरच्या दरम्यान सगळे आतंकवादी समुद्रामार्गे मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत शस्त्रसाठा, दारुगोळा, ग्रेनेड, AK 47 बंदुका इत्यादी स्फोटक गोष्टी होत्या.

हे दोघेही आतंकवादी पाकिस्तानातील पंजाब मधील रहिवासी होते. इमरान हा मुलतान मधला तर नासिर हा फैसलाबाद मधला होता.

मुंबईतील फिशेरमन कॉलनीतून त्यांनी पाचशे मीटर अंतरावर असलेल्या छबाड हाऊस मध्ये प्रवेश केला.

इमारतीत प्रवेश करण्याच्या आधी एका दहशतवाद्याने आठ ते दहा किलोचा आरडीएक्स इमारतीच्या समोर ठेवलं. आणि इमारतीत आल्यानंतर जिन्याजवळ दुसऱ्या दहशतवाद्याने आठ ते दहा किलोचा आरडीएक्स ठेवलं.

ठरलेल्या वेळेनुसार त्याचा स्फोट झाला आणि हे लोक इमारतीत घुसले. बिल्डिंगचा त्यांनी ताबा घेतला. तिथल्या काही ज्यू नागरिकांना त्यांनी बंधक बनवलं.

 

crownheights.info

 

त्यातल्या एका माणसाला इस्त्रायली दूतावासाशी बोलायला सांगितलं. आणि ते आतंकवादी त्यांच्या पाकिस्तानातल्या वरिष्ठांना बरोबर संपर्क साधून होते.

आणि तिकडून त्यांना जे आदेश मिळत होते त्याचं ते पालन करत होते.

गॅव्रियल आणि रीविका यात मारले गेले. रीविका त्यावेळेस गरोदर होती. त्या हल्ल्यात छबाड हाऊस मधील सात बंधकांची हत्या झाली. तसेच एक कमांडो, एक हवालदार हे ऑपरेशन दरम्यान मारले गेले.

यामध्ये होल्ट्सबर्ग या दाम्पत्याचा दोन वर्षांचा मुलगा मोशे आणि त्याला सांभाळणारी भारतीय आया सँड्रा सॅम्युअल हे दोघे आश्चर्यकारकरीत्या वाचले.

 

jerusalem post

 

सँड्राने मोशेला लपवून ठेवले होते. नंतर इस्राईल सरकारने सँड्राला इस्त्राईलचे मानद नागरिकत्व दिलं.

भारतामध्ये येणाऱ्या ज्यू इस्त्रायली नागरिकांना कोणतीही मदत मिळवणं सोपं जावं, याकरिता गेव्रियल आणि रिवीका होल्ट्सबर्ग या दाम्पत्याने हे केंद्र २००३ मध्ये चालू केलं.

बिजनेस साठी येणारे, टुरिस्ट म्हणून येणारे असे नागरिक त्यांच्या मदतीसाठी हे केंद्र होतं.

२९ वर्षांचा गॅब्रियल हा अत्यंत हुशार होता वयाच्या नवव्या वर्षी तो त्याच्या आई-वडिलांसह अमेरिकेत राहत होता. त्याचं शिक्षण तिकडेच झालं होते. तो दर शुक्रवारी सिनेगॉग मध्ये आपली सेवा द्यायचा.

 

the times

 

मुंबई हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर इस्त्राईलचे कौन्सिल जनरल याकाव फिंकलस्टेन असं म्हणाले,

“की दहशतवाद्यांनी भारत आणि इस्त्राईल संबंध बिघडावेत म्हणून प्रयत्न केले आणि २६/११ घडवून आणलं. परंतु त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत उलट भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील संबंध अधिक दृढ झाले आहेत.

इस्त्रायली नागरिकांना भारतात कधीच धोका वाटत नाही. उलट हा एकदम सुरक्षित देश आहे अशी त्यांची भावना असते.”

अनेक इस्त्रायली लोक भारतात टूरिझम साठी येतात. राजकीय बाबतीतही सध्या अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध या दोन्ही देशांमध्ये आहेत.

अजूनही इस्रायली लोक छबाड हाऊसला भेट देतात आणि त्यांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. इथे त्यांना अजिबात असुरक्षित वाटत नाही.

 

livemint

 

आता त्या छबाड हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. भारतातल्या सुरक्षा-व्यवस्था अधिकाऱ्यांनी या सोयी तिथे केल्या आहेत.

तिथे अनेक दुकाने आहेत आणि एक देऊळ देखील बांधण्यात आलेलं आहे. तरीही २००८ मधील तिथलं हेअर कटिंग सलून आणि रेक्स बेकरी अजूनही तशीच आहे.

छबाड हाऊसवर जो गोळीबार आतंकवाद्यांनी केला त्याच्या खुणा अजूनही तशाच आहेत. उलट या गोळ्या जिथे लागल्या त्याच्याभोवती लाल वर्तुळ काढून ठळक करण्यात आलं आहे!

जेणेकरून तिथे आतंकवादी हल्ला झाला होता आणि आम्ही तो परतवून लावला याच ते प्रतीक म्हणून ठेवलं आहे. त्याच बरोबर मुंबई शहराचे स्पिरिट देखील त्यातून दिसून येतं.

 

rediff.com

 

फिंकेलस्टन असं जे म्हणाले, की भारत इस्राईल संबंध बिघडवण्याचा प्रयत्न आतंकवाद्यांनी केला, त्याचा मागे कारण आहे.

जर इतिहास पाहिला तर असं दिसेल की भारत आणि इस्राईल हे साधारणपणे एकाच वेळेस स्वतंत्र झाले. तरीही भारताने सुरुवातीला कधीही इस्त्रायलला पाठिंबा दिला नाही.

इस्त्राईलला आधीपासून अमेरिकेची मदत मिळायची. तर सोवियत रशिया इस्राएलच्या विरोधात होता. आणि भारताचे सोवियत रशियाबरोबर चांगले संबंध होते.

पण तरीही इस्त्राइल ने भारताची कायम मदत केली. प्रत्येक युद्धाच्या वेळेस भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीन या युद्धाच्या वेळेस इस्राईलची मदत भारताला झाली.

 

the Jerusalem post

 

तरीदेखील भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अरफत यांच्याबरोबर चांगले संबंध होते त्यामुळे भारत नेहमीच पॅलेस्टाईनच्या बाजूने झुकलेले असायचं.

परंतु १९९० नंतर सोवियत रशियाच विघटन झालं. त्यानंतर उदयाला आलेली सीरिया, जॉर्डन यासारखी राष्ट्रे पाहून भारताचे परराष्ट्र विषयक धोरण बदलायला लागले.

आणि इस्त्राईल बरोबर संबंध सुधारण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले. दोन्ही राष्ट्रांमध्ये मग अनेक करार झाले.

इस्त्रायल हे छोटसं राष्ट्र असून देखील, पाऊस कमी असून देखील तिथली प्रगत शेती, तिथली मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा पाहून भारताला त्या गोष्टी आपल्याकडे आणणे महत्त्वाचे वाटायला लागले.

 

YouTube

 

कारण देशाची लोकसंख्या जास्त असून शेती उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. तसेच पाकिस्तान सारखे शेजारी असल्यामुळे मोसाद सारख्या गुप्तचर यंत्रणेची गरज ही भारताला जाणवायला लागली.

त्यामुळेच या दोन्ही राष्ट्रांमध्ये वितुष्ट येण्यासाठी पाकिस्तान आणि अतिरेक्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबईतील छबाड हाऊस मधील हल्ला हा त्याचाच भाग. त्या भ्याड हल्ल्यानंतर देखील भारत इस्त्रायल संबंध अधिक दृढ होत आहेत.

फिंकेलस्टेन त्यांच्या म्हणण्यानुसार आपण सगळेच दहशतवादाचे पीडित आहोत. अशा वेळेस आपण एकत्र येऊन दहशतवादाचा सामना करणे गरजेचे आहे.

भारत आणि इस्त्राईल त्यासाठी बांधील आहेत.

 

YouTube

 

या घटनेवर सिनेमा ववेबसिरीज सुद्धा झाल्या, पण नुकतीच झी ५ या प्लॅटफॉर्म वर Stage Of Siege 26/11 नावाची वेबसिरिज रिलीज झाली आहे ज्यात ह्या छबाड हाऊस च्या हल्ल्याबद्दल बरीच माहिती दिली गेली आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version