Site icon InMarathi

‘कॉरन्टाईन’मधली अस्वस्थता ठरतेय मानसिक आजाराचं लक्षण, यातून वाचण्यासाठी हे उपाय कराच

home arrest inmarathi

the tribune india

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

 

जगभरात सध्या करोनाने थैमान घातलेलं आहे. जगभरातील प्रत्येक प्रमुख देशामध्ये कोरोनाचा अनेक रुग्ण आढळत आहेत.

चीन, इटली, स्पेन आमी अमेरिका या सारखे देश देखील लॉकडाऊन करून सतर्कता पाळण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जगभरामध्ये एक अनामिक भीतीचे वातावरण पसरलेलं आहे.

 

the news

 

भारतात देखील यापासून बचाव करण्यासाठी अनेक राज्य लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र, पंजाब, केरळ यासारख्या प्रमुख राज्यांमध्ये कोरोणाचे अनेक पेशंट सापडत आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस मोठा होताना दिसून येत आहे!

आणि त्यासोबतच करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे.

या सर्वांपासून बचाव म्हणून जगभरामध्ये घरात राहण्याचा सल्ला दिला जात आहे, म्हणजेच होम कॉरन्टाईन.

आपल्याकडे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचे सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

 

the tribune india

 

अनेक दिवसांपासून घरी असल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे, आपण दैनंदिन आयुष्यात कुटुंबीयांसोबत वेळ खूपच कमी व्यतीत करत होतो!

पण सध्या घरी असल्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ शिल्लक आहे. मग यातच रोज कामात व्यग्र राहायची सवय असलेल्यांना दिवसभरामध्ये खूपच अस्वस्थपणे दिवस घालवायला लागतो.

आपण अनेक गोष्टी करतो आहोत ज्यामुळे आपण मानसिक आजाराकडे वळतो आहोत किंवा नकारात्मकतेकडे जात आहोत अशा सर्व समस्यांवर उपाय जाणून घ्यायचा असेल तर हा लेख नक्कीच वाचा

काही दिवसांपूर्वी आपल्यासाठी घरी राहणे एक स्वप्न होते पण आजच्या परिस्थितीत अर्ध्यापेक्षा जास्त जग घरी आहे, बरेच जण घरी बसून काम देखील करत आहेत.

 

Malayala Manorama

 

जगभरातील जवळपास सर्व देशांनी प्रतिबंधात्मक उपाय आणि सतर्कता म्हणून आपल्या सर्वांना सक्तीचं घरी बसवलेलं आहे.

करोनावर सध्या कुठलंही औषध उपलब्ध नाही त्यामुळे या साथीची साखळी तोडणे हाच एकमेव उपाय सध्या संपूर्ण जगासमोर आहे.

मग या सर्वांमध्ये सारखं घरी बसून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत, खूप दिवसांपासून घरी असल्यामुळे कदाचित अस्वस्थता जाणवत असू शकते.

अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या मानसिक स्वास्थ्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

एका प्रसिद्ध मेडिकल जर्नलच्या माहितीनुसार अशाप्रकारे अनेक दिवस घरी राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम नक्कीच दिसून येतील.

राग येणे, चिडचिड करणे, प्रचंड अस्वस्थ होणे ही सर्व लक्षणे मानसिक अस्वास्थाचीच आहेत हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं.

याआधी जेव्हा “सार्स व्हायरस” जगभरामध्ये पसरला होता तेव्हा देखील अशा प्रकारची मानसिक आजाराची लक्षणे दिसून आली होती.

 

NPR

 

अशा प्रकारची लक्षणे मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहेत अशा व्यक्तींमध्ये देखील दिसून येत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मानसिक अस्वास्थ्याची लक्षण

१. प्रचंड भीती वाटणे आणि आपल्या शारीरिक स्वास्थ्य बद्दल चिंताग्रस्त असणे

२. झोप न येणे

३. जेवण न करणे

४. मन एकाग्र करताना त्रास होणे किंवा झोपताना त्रास होणे

५. दारू,तंबाखू यासारख्या इतर मादक पदार्थांच्या सेवनाने मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणे.

मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या आठवड्यामध्ये एक मार्गदर्शक पुस्तिका जारी केलेली आहे. त्याच्या मदतीने आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेऊ शकतो.

 

the Indian express

 

मार्गदर्शक माहीती :-

मनुष्य हा एक समाजप्रिय  प्राणी आहे त्यामुळे जर समाजासोबत राहिला नाही तर काही दिवसांनी सामाजिक स्वास्थच नव्हे तर माणसाचा विकास देखील खुंटण्याची दाट शक्यता असते!

त्यामुळे कसल्याही परिस्थितीत इतरांशी कुठल्याही माध्यमातून संपर्क ठेवावा हा देखील एक पर्याय असू शकतो. परंतु, संपर्क ठेवताना तो अत्यंत संरक्षित पद्धतीने करावा हे लक्षात असावे!

म्हणजेच इतरांशी व्हिडिओ कॉल करावा, फोनवर गप्पा माराव्यात. आपण इतरांशी व्यक्त झाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते. अमेरिकेत सध्या अशा प्रकारच्या उपाययोजनांना सुरुवात झालेली आहे.

 

masterfile

 

चाकरमान्यांनी अशा परिस्थितीमध्ये काय करावं

तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जरी नोकरी करत असाल तरी तुम्ही जमेल तेवढं तुमच्या सहकार्‍यांच्या संपर्कात राहायला हवं आणि परिस्थिती नियंत्रणात कधी येईल याचा अंदाज बांधायला हवा.

गरजेपेक्षा जास्त अस्वस्थ वाटत असेल तर व्यायाम, योगा इत्यादी गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य जपु शकता.

जर तुम्ही सध्या कुठेतरी एकटेच अडकून पडला आहात किंवा एकटेच राहत असाल तर….

अनेक आठवडे चालणाऱ्या या सक्तिच्या आरामा दरम्यान तुम्ही नवीन पद्धतीने मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

घरीच राहून इतरांशी फोनवर किंवा इतर माध्यमातून संपर्क ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

 

freepik

 

तुम्ही स्वतःचं एक रुटीन तयार करून घ्या, त्या नवीन वेळापत्रकानुसार तुम्ही तुमचा वेळ वापरू शकता. नवीन नवीन काम शोधून त्यामध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर घरी ऑफिस सारखं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करा.

त्यासोबतच रोज सकाळी योगा केल्यानेही तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.

कधीकधी मानसिक गरज ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. म्हणजे जर तुमच्याकडे औषधं असतील तर तुम्ही एकटे असल्यावर जास्त करून आजारी पडण्याचा विचार करू शकता.

त्यामुळे औषध गोळ्या सर्व प्रकारच्या तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही आजाराबद्दल जास्त विचार करणार नाही.

अशाच प्रकारे तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत याची खात्री करून घ्या म्हणजे तुम्ही समस्यांबाबत चिंता करणार नाही.

जर तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही टीव्ही बघू शकता, अनेक प्रकारची पुस्तकं वाचू शकता,

 

Pinterest

 

त्या अनेक गोष्टी करू शकता ज्या गोष्टी इतर वेळी वेळेच्या अभावी तुम्ही करू शकला नाहीत आणि लक्षात ठेवा जर तुम्ही अशा प्रकारे स्वतःला व्यस्त ठेवलात तर तुम्हाला कसलाही मानसिक आजार होणार नाही.

आज संपूर्ण जग या संकटाशी लढा देत आहे आपणही तोच लढा चालू ठेवू यात आणि आपलं मानसिक स्वास्थ्य जपायला मदत करु!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version