Site icon InMarathi

करोनाशी स्वतः २ हात केलेल्या रोहितचा अनुभव प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवा!

rohit dutta featured inmarathi

newstrend

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज करोना सर्व जगात चिंतेचे कारण बनला आहे. दररोज करोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत. लोकांमध्ये भीती पसरली आहे. घरातून बाहेर पडणे धोकादायक बनले आहे. लोकं साध्या सर्दी-तापा-खोकला ह्यानेही घाबरत आहेत.

ह्या विषाणूची इतकी भीती आहे की सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर, जमावर बंदी घातली आहेत. बरेचसे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सार्वजनिक जागा जसे सिनेमागृहे, नाट्यगृहे, बाग-बगीचे, कार्यालये इतकेच नव्हे तर शाळा-कॉलेजेस् पण बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा-सुविधा सुरू आहेत.

 

business standard

 

करोना विषाणू सर्व जगभर पसरलेला आहे. भारतात १६ मार्चपर्यंत कोरोनाचे ११२ रूग्ण असल्याचे कळले आहे. बर्याच जणांची तपासणी सुरू आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका रूग्णाची कहाणी सांगत आहोत, जो कोरोना व्हायरसने ग्रस्त होता पण आता पूर्णपणे बरा झाला आहे.

रोहित दत्ता असे या रुग्णाचे नाव आहे, जो मयूर विहार फेज -२, दिल्ली येथील रहिवासी आहे.

नवभारत टाईम्सशी खास बातचीत करताना रोहित दत्ता म्हणाले की,

“मी आता स्वस्थ आहे, करोनाचा संसर्ग आता माझ्या शरीरात नाही. माझ्यासाठी हा खूप आनंद आणि समाधान आहे. रोहितने लोकांना सांगितले की करोनाला घाबरू नका, उलट त्यास विरोध करण्याची गरज आहे.

करोनाशी लढण्यासाठी आपण स्वच्छतेची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे.”

 

news24hindi

 

या आजाराबद्दल आणि घाबरणारी लोकं, डॉक्टर्स ह्याची चिंता असलेल्यांना रोहितने सांगितले की असे काहीही नाही जे त्यांना घाबरवतील.

तिथे साधे जेवण होते, कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची सोय होती आणि तो चित्रपटही पाहू शकला तिकडे. दररोज पुस्तक देखील वाचत होता तिकडे तो. सोशल मिडिया वर पण ऍक्टिव्ह होता तो!

रोहित आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत व्हिडिओ कॉलवरून बोलत होता.

आरोग्यमंत्र्यांशी देखील त्याचे व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले, ज्यामुळे त्याला खूपच धीर मिळाला.

या संभाषणामुळे बरेच प्रोत्साहन मिळाले. तथापि, सुरुवातीच्या दिवसांत रोहित खूप नैराश्यग्रस्त होता आणि आपल्या घरातील सदस्यांचेही त्याला खूप आठवण येत असे. पण आता तो ठीक आहे आणि तो घरी परतला आहे.

रोहितच्या प्रकृतीनंतर त्याची दोनदा करोना चाचणी घेण्यात आली, जेव्हा दोन्ही अहवाल नकारात्मक आल्यावर त्याला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

 

 

मात्र, रोहितला घरी १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उपचारादरम्यान रोहित सकारात्मक प्रतिसाद देत होता आणि त्यालाही याची जाणीव होत होती.

अशाप्रकारे “आजतक” च्या टीमने दिल्लीतील करोना विषाणूपासून बरे झालेल्या रोहित दत्ताबद्दल सांगितले. त्याची मुलाखत घेण्यात आली.

संभाषणात रोहित दत्त म्हणाला की करोना व्हायरसने घाबरून जाण्यासारखे काही नाही. काळजी घ्या आणि आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. संभाषणात, त्याने सांगितले-

“मी इटलीला गेलो तेथून २१ फेब्रुवारी रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे गेलो. २५ रोजी भारतात परत आलो. त्याच रात्री दाजे ९९.५ ताप आला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांना भेटलो.

त्यांनी तीन दिवसांचा औषधांचा डोस दिला. २८ तारखेला पुन्हा ताप आला. मी २८ तारखेला पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेलो. त्यांना सांगितले की नुकताच मी इटलीला गेलो होतो.

करोना सर्वत्र पसरत असल्यास कृपया कोरोना चाचणी करुन घ्या. त्यांनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे नाव सुचविले.”

 

patrika

 

आरएमएलमध्ये काय झाले?

तीव्र तापानंतर रोहितला डॉक्टरांकडे जावे लागले, अहवालात त्यांनी रोहितला तपासणी अंती कोरोना रिपोर्ट्स् सकारात्मक असल्याचे सांगितले.

१४ दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यांचे म्हणणे आहे की २-३ दिवसांची खबरदारी संपल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली.

त्याच्यासाठी तो बरा व्हावा म्हणून नवस मागितला. त्याने पहिला फॉर्म भरला. त्यात त्याने लक्षणे लिहिली. मग त्यांनी रोहितला भरती करून घेतले.

१ मार्च रोजी डॉक्टारांना त्याच्या रिपोर्ट्स् मधून माहिती मिळाली की तो कोरोना ग्रस्त आहे. यानंतर त्याची सफदरगंजच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये बदली झाली.

 

 

आता इटलीहून आल्यानंतर त्याला भेटलेल्या लोकांचे काय?

इटलीहून आल्यानंतर रोहित अनेक लोकांना भेटला होता. करोना हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याच्या घरातील सदस्यांची तपासणी केली गेली.

“२८ फेब्रुवारी हा माझ्या मुलाचा वाढदिवस होता. बरेच लोक घरी आले होते. त्या सर्वांची तपासणी आवश्यक होती. त्या सगळ्यांना बोलवण्यात आले आणि त्यांची तपासणी केली गेली.

सर्वांचे अहवाल नकारात्मक होते. माझ्या ऑफिसमधील लोकांचीही चौकशी केली गेली. पण त्यांच्याही रिपोर्टस् मधे काहीही आढळले नाही.” रोहित सांगतो.

तू आता तंदुरुस्त आहेस हे तुला कसे कळले?

रोहितला विचारले की, तू ठिक झालास हे कसे कळले त्यावर तो उत्तरला मझ्यावर योग्य उपचार चालू होते. २/३ दिवसांत ताप निघून गेला. एका आठवड्यात अहवाल नकारात्मक येऊ लागले.

दोन नकारात्मक अहवाल आल्यानंतर मला विषाणूमुक्त झाल्याचे डॉक्टरनी सांगितले.” यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

 

the economic times

 

करोनाबद्दल घाबरलेल्यांसाठी रोहित म्हणाला-

यात घाबरण्यासारखे काहीच नाही. धीर सोडायचा नाही कधीच. आपल्यास कोरोनासारखे लक्षण आहे असे वाटत असल्यास, दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. तुम्हाला मदत मिळेल.

आपण जितक्या लवकर उपचारास सुरुवात कराल तितक्या लवकर आपण बरे व्हाल. आपल्याला तेथे सर्व सुविधा मिळतात.

आजच्या काळात कोरोना विषाणू जगभरातील चिंतेचे कारण बनले आहे.

अशा परिस्थितीत जर एखाद्याने या आजाराशी लढा देऊन बरे केले तर या आजाराने संसर्ग झालेल्या आणि घाबरलेल्यांसाठी तो एक दिलासा आहे. धीराचे एक उदाहरण आहे.

 

 

भारतात आतापर्यंत दहापेक्षा जास्त लोक या आजाराने बरे झाले असून जवळ जवळ ११२ लोकांना संसर्ग झाला आहे.

नवभारत टाईम्सशी खास बातचीत करताना रोहित दत्ता म्हणाले की,

“मी आता स्वस्थ आहे, मला आता करोनाचा संसर्ग नाही. माझ्यासाठी ही गोष्ट खूप आनंद आणि समाधान देणारी आहे. रोहितने लोकांना सांगितले की करोनाला घाबरू नका,

उलट त्यास धीराने तोंड देण्याची गरज आहे. करोनाशी  लढण्यासाठी आपण स्वच्छतेची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे.”

रोहित दत्ताच्या उदाहरणावरून असे लक्षात येते की करोना व्हायरसला घाबरून जाण्यापेक्षा त्याला तोंड देणे, योग्य ते उपचार करून त्यातून मुक्त होण्याची गरज आहे.

रोहित दत्ताचे हे उदाहरण सकारात्मक दृष्टी देणारे आहे. लोकांनी घाबरून हात-पाय गाळण्यापेक्षा धीराने घ्यावे त्यामुळे शरीर आणि मनही उपचारांना योग्य तो प्रतिसाद देऊन लवकरात लवकर रोगमुक्त होण्यास मदत होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version