' रोजच्या खाण्याचा कंटाळा आलाय? नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी खाऊगल्ल्यांची सफर… – InMarathi

रोजच्या खाण्याचा कंटाळा आलाय? नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी खाऊगल्ल्यांची सफर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीयांनी आहारशास्त्रात किंवा पाककलेत प्रभुत्व मिळवले आहे. जर व्यवस्थित खाल्ले नाही तर आपण विचार किंवा कार्य करू शकत नाही. ते म्हणतात ना “आधी पोटोबा मग विठोबा”!

पोट भरलेलं असेल तर सगळी कार्य व्यवस्थित करू शकतो आपण. आजकाल जीवन एकदम फास्ट झालंय, त्यामुळे खाण्याचा वेळ कमी झालाय, भरभर खावे लागते.

त्यासाठी स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूडला प्राधान्य दिले जाते. जे कमी वेळखाऊ असते आणि स्वस्तही असते.

 

fast food inmarathi
readers digest

 

ज्या लोकांना खायला आवडतं आणि जे खाण्यासाठी जगतात त्यांच्यासाठी निःसंशय भारत जणू काही स्वर्गच आहे. गरम आणि मसालेदार स्ट्रीट फूड नक्कीच आनंददायी आहे.

ह्या स्ट्रीट फूड मध्ये नक्कीच काहीतरी दिव्य आहे जे आपल्याला डाएट बाजूला ठेवायला लावते.

अनेकजण एक किंवा दोन दिवसांच्या छोट्या सहलीसाठी जातात. त्यांच्यासाठी हे स्ट्रीट फूड म्हणजे जणू काही एक देणगीच आहे! ज्यांनी ह्याची चव चाखली ते इकडे पुन्हा पुन्हा काहीही कारण नसतानाही फक्त खाण्यासाठी नक्की येतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतभर ह्या खाऊगल्ल्या आहेत जिकडे गेलं की त्या वासानेच खाण्याची इच्छा जागृत होते.

सध्या कोरोनाच्या भितीने आपण घरात अडकलो असलो, तरिही या खाऊगल्ल्यांची व्हर्चुअल सफर बघूनच तुम्ही खुश व्हाल.

त्यातच कोरोनाचं संकट सरल्यानंतर यापैकी एका तरी गल्लीला नक्की भेट द्या.

खाऊ गल्ली, मुंबई :

 

khau galli inmarathi
LBB

 

मुंबईत अनेक ठिकाणी खाऊ गल्ली सापडतील. पण घाटकोपरची खाऊ गल्ली ही त्यापैकी सर्वात खास आहे. पाणीपुरी, वेगळ्या प्रकारचे सँडविचेस्, डॊशाचे प्रकार, कोल्ड्रिंक्स, पावभाजी इथे मिळेल.

ह्यात विशेष आहेत ते म्हणजे  थाउजंड आयलँड डोसा, चीज बस्ट डोसा आणि सर्वात खास आईस्क्रीम डोसा.  यासह विविध प्रकारचे डोसे सापडतील.

वेगवेगळे चाट प्रकारही येथे खवय्यांना आकर्षित करतात.

 

जॉन्सन मार्केट, बेंगलोर :

 

khau galli inmarathi 1
LBB

 

जर बंगळुरुमध्ये असाल तर नक्कीच इथे जा. मांसाहार करणार्‍यांसाठी हे उत्तम स्थान आहे, परंतु शाकाहारी लोकही येथून निराश परत येऊ शकत नाहीत.

येथील जी खासीयत आहे ती म्हणजे सुलेमानी चहा, हरिरा, नारळ आणि फळ नान (coconut & fruit nan) ती देशात इतरत्र क्वचितच आढळतात. जर तुम्हाला कबाब आवडत असतील तर जॉन्सन मार्केट तुमच्यासाठीच आहे.

भुक्कड गल्ली, अहमदाबाद :

 

khau galli inmarathi 2

 

येथील दुकाने संध्याकाळी ६-७ च्या दरम्यान सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालू असतात. येथे मेक्सिकन, थाई, चायनीज, स्पॅनिश आणि लेबिनीज खाद्यपदार्थ भारतीय शैलीत आणि वाजवी दरात मिळू शकेल.

द वन स्लाइस पिझ्झा, तंदूरी, मोमोज, फजिता राईस आणि फलाफल हे इथले खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत.

 

पराठा गल्ली, दिल्ली :

 

khau galli inmarathi 3
dhaba style

 

दिल्लीची पराठा गल्ली जगभर प्रसिद्ध आहे. येथे जवळपास ३५ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे उपलब्ध आहेत. जे पॅनवर कमी तेलात बनविण्यापेक्षा कढईमध्ये जास्त तेलात अक्षरशः तळले जातात.

बटाटे, कोबी, वाटाणे (मटार), टोमॅटो, कांदे, लसूण, मिक्सवेज, चीज यासारख्या अनेक गोष्टींचे पराठे येथे देशी तूपात बनविले जातात. या पराठेबरोबर बटाट्याची भाजी, केळीची चटणी, लस्सी आणि कोशिंबीरी देखील दिली जाते.

४० रुपयांपासून ते ५५ रुपयांपर्यंत या आगळ्यावेगळ्या पराठ्यांचा स्वाद आपण येथे घेऊ शकता.

 

कचोरी गल्ली, वाराणसी :

 

khau galli inmarathi 4
foodaholix

 

कचोरी गल्ली या नावानेच हा परिसर प्रसिद्ध आहे. काशीची प्रसिद्ध कचोरी, जिलेबी यांची दुकाने येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. खरे तर या परिसराचे नाव पूर्वी कुचा अजयब होते.

असे म्हटले जाते की, या वस्तीचे नाव एक श्रीमंत अधिकारी अजयब यांच्या नावाने दिले गेले, जो मुस्लिम शासकांच्या काळातील प्रसिद्ध धनिक होता. आधी या भागात चित्र विचित्र वस्तू विकल्या जात असत.

पण, नंतर येथे मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याची दुकाने सुरू झाली ज्यामुळे या परिसराला कचोरी गल्ल असे नाव पडले. हा परिसर देखील खूप गजबजलेला आणि अरूंद रस्ते असणारा आहे.

येथील इमारती देखील जुन्या शैलीच्या आहेत.

 

चटोरी गल्ली, मध्य प्रदेश

 

khau galli inmarathi 5
outlook india

 

ज्या लोकांना नॉनवेजची आवड आहे त्यांच्यासाठी ही गल्ली म्हणजे मेजवानीच जणू! मांसाहारी लोकं इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मांसाहराची चव घेऊ शकतात.

इथली दुकाने मासे, मटण, कोंबडी इत्यादी पदार्थ येथे मसाल्यांच्या रेलचेलीसह देतात. बरेच मसाले आणि तेलाचा भरपूर वापर ह्यामुळे ह्या डिश आपल्या कॅलरीज् निश्चितच वाढवू शकतात.

जर तुम्ही जास्त व्यायाम करण्यास तयार असाल तर नक्कीच एकदा चटोरी गल्लीला भेट द्या. मॅरीनेट केलेले मांस आणि मासे पाहून तोंडाला पाणी सुटते.

इथले पाव कबाब (हॅम्बर्गर) खूप चवदार आहे, त्याशिवाय चटोरी गली येथील पाया सूप, सीक कबाब आणि रसाळ बीफ कबाब यांना तोड नाही.

 

चटोरी गल्ली, जयपूर :

 

khau galli inmarathi 6

 

जयपूरची चटोरी गली संपूर्ण जगात खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरच्या ह्या रस्त्यावर आणि चौकांमधे मिळणाऱ्या पदार्थांची चवही अशीच आहे, ज्यामुळे येथे येणारे लोक आणि पर्यटक बाकी सर्व काही विसरतात.

यातील एक आहे चटोरी गल्ली. बापूबाजारच्या लिंक रोडच्या अगदी समोर असलेल्या या गल्लीत असलेले डिशेस शॉपिंग करणाऱ्यांचे, विशेषत: महिलांचे आकर्षण केंद्र आहे.

नेहरू बाजारमार्गे बापू बाजारात प्रवेश केल्यावर भूक भागवण्यासाठी गोलगप्पा (पाणीपुरी), दही वडे, छोले भटुरे, टिक्की छोले,फालुदा आणि बऱ्याच प्रकारची शीत पेये (सॉफ्ट ड्रिंक्स) असे इथले प्रसिद्ध पदार्थ आवडीने आणि चवीने खातात.

या प्रकारचे पदार्थ जयपूरच्या प्रत्येक गल्ली बोळात मिळतात, पण चटोरी गल्लीत या डिशेसची चव भन्नाट असते, ज्यामुळे प्रत्येकाला इकडे खाण्यासाठी वारंवार यावंसं वाटते.

लखनऊ चौक – लखनौ

 

khau galli inmarathi 7
now lucknow

 

या चौकातील आलू टिक्की, गलौटी कबाब आणि निहारी-कुल्चा ह्या डिशेस प्रसिद्ध आहेत. खवय्यांसाठी येथे हे पदार्थ म्हणजे जिभेचे चोचले पुरविणारे ठरतात.

 

बोरिंग रोड चौक – पटना

येथील प्रसिद्ध डिश – मराठी मालिकेमुळे घरोघरी माहित झालेले लिट्टी चोखा तसेच लिट्टी कोंबडी, चने की घुघनी आणि समोसा.

 

५६ दुकान – इंदूर

 

khau galli inmarathi 8
the better india

येथील प्रसिद्ध पदार्थ – पोहे, जिलेबी, पाणीपुरी, शिंकाजी, हॉट डॉग, कचोरी.

विशेषत: पोहे हा इथला सर्वत्र मिळणारा पदार्थ आहे. डाळिंबाचे दाणे घालून भरपूर कोथिंबिर आणि शेव घालून येणारे गरमागरम पोह्यांच्या (ज्याला इंदूर मध्ये पोहा म्हणतात) घमघमाटानेच भूक खवळते.

असा हा एव्हग्रीन नाश्त्याच्या पदार्थाची इंदूरला गेल्यावर नक्की चव घेऊन बघा.

 

सिंधी कॉलनी – हैदराबाद

 

khau galli inmarathi 9

 

येथील प्रसिद्ध डिश – अर्थात जगप्रसिद्ध हैदराबादी बिर्याणी, कीमा समोसा, इराणी चहा आणि टुंडे कवाब

तर मग अस्सल खवय्यांनी ह्या खाऊ गल्ल्यांना एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. जिथे फक्त क्षुधाच नाही तर रसनेचीही तृप्ती होते. डाएट बाजूला ठेवून येथील पदार्थांवर ताव मारावा आणि नंतर व्यायाम जास्त करावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?