Site icon InMarathi

सगळ्यांना फसवून चक्क न्यायाधीशांच्या खुर्चीत बसणाऱ्या या हुशार चोराचे प्रताप! वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस हा मेंदू असलेला एकमेव प्राणी या पृथ्वीवर आहे. आपली बुद्धी ही आपल्याला मिळालेले एक मोठे वरदानच म्हणावे लागेल. या बुद्धीमुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. आजपर्यंतच्या माणसाच्या यशाचे हेच तर खरे गमक आहे.

फक्त या बुद्धीचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी होणे जास्त महत्त्वाचे आहे. मेंदूचा वापर जर चांगल्या कामात झाला तरच त्यांची उपयोगिता वाढते. नाहीतर कोणत्याही वाईट कामासाठी केलेला तल्लख बुद्धीचा वापर हा वाईटच.

आजच्या काळात आपण अशी कितीतरी उदाहरणे पाहतो की, जेथे हुशार माणसांनी आपल्या बुद्धीचा कस लाऊन नको त्या गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर बरेच पकडलेले अतिरेकी सुद्धा उच्च शिक्षित होते.

भारतात अनेक अनपेक्षित गोष्टी घडत असतात. त्यातील एक म्हणजे अशाच एका महान माणसाने आपल्या बुद्धीचा नको त्या ठिकाणी वापर केला.

 

 

चोरी…चोरी या गोष्टीला भारतात नव्हे तर जगात एक वेगळेच वलय आहे. बऱ्याचदा चित्रपट म्हटला की त्यात चोरीचा प्रसंग हमखास दाखवलेला असतो. चोरी करताना चोराने वापरलेले डोकं आणि त्याचे कौशल्य या खास उल्लेखनीय असते.

भारतात खरोखर विविध प्रकारच्या चोऱ्या करणारे चोर झालेत, मात्र आज आपण अशा माणसाची ओळख करून घेऊ की ज्याने चोरी सुद्धा केलेली आहे आणि न्यायदान सुद्धा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कदाचित या महान माणसाचे नाव आपण ऐकले सुद्धा असेल. त्याचे नाव धनी राम मित्तल. हा भारतातील सर्वात हुशार चोर मानला जातो. ज्याप्रमाणे वयाच्या २५ व्या वर्षी लोक आपला धंदा किंवा नोकरी सुरू करतात त्याप्रमाणे मित्तल ने चोरी हा आपला धंदा २५ व्या वर्षी चालू केला.

 

 

१९६४ साली तो पहिल्यांदा चोर म्हणून पकडला गेला मात्र सध्या तो कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही.

आजपर्यंत सर्वात जास्त पकडलेल्या चोरांमध्ये मित्तल चे नाव घेतले जाते. २०१६ साली त्याला शेवटची अटक झाली होती, मात्र पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला. गाड्यांचे खोटे कागदपत्र तयार करून गाड्या पळवणे आणि लोकांना चुना लावणे ही त्याची खासियत होती.

आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त गाड्या त्याने चोरल्या आहेत आणि २५ वेळा जेलची वरी सुद्धा केली आहे. त्याची खासियत म्हणजे तो फक्त दिवसाच चोरी करत असे. दिवसा  एवढ्या चोऱ्या करणे हे सुद्धा एक कसबच आहे.

कल्पना करा, एखादा माणूस रस्त्याने चालत आहे आणि चालता चालता अचानक वाटेत दिसणारी गाडी तो माणूस आपल्या जवळच्या चावीने उघडतो आणि गाडी घेऊन पसार होतो, पण ही गोष्ट कल्पनातीत नसून सत्य आहे.

 

मित्तल अशाच प्रकारे चोरी करत असे. एवढंच नव्हे तर चोरी केलेल्या गाड्या विकत असे. फार गजबजाट नसलेल्या भागातल्या गाड्या हेरणे आणि त्या अशा सफाईने पळवणे यात मित्तल माहीर होता.

मित्तलने वकिलीची पदवी घेतली होती तसेच तो हस्ताक्षरतज्ज्ञ सुद्धा होता. याच ज्ञानाचा उपयोग करून तो चोऱ्या करत असे व खोटे कागदपत्र आणि पुरावे देऊन सुटत सुद्धा असे.

सतत चोऱ्या करत असल्यामुळे तो कोर्टात कायमच दिसत असे. एकदा असाच एक खटला सुरू असताना न्यायाधीशांनी त्याला सतत पाहिल्याने रागातच बाहेर निघून जायला सांगितले. त्याप्रमाणे तो बाहेर निघून गेला तेव्हा त्याच्यासोबत २ पोलिस सुद्धा होते, मात्र त्यानंतर तो गायबच झाला.

 

 

जेव्हा पुन्हा त्याच्या साक्षीची वेळ आली तेव्हा पोलिसांना हातावर हात चोळत रहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच राहिला नाही.

एखाद्या माणसाचं नशीब तरी बघा चोर असूनही बरेचसे न्यायाधीश आणि पोलिस त्यांच्या खूप चांगले ओळखीचे होते. खरंतर या लोकांच्या ओळखी होणं हे महाकठीण काम पण याला ते काम सुद्धा आरामात जमलं.थोडक्यात काय तर दैव देत आणि आणि कर्म नेत अशी गत.

आपल्या विद्येचा गैरवापर एखाद्याने किती करावा. तर त्याचे हे एक उदाहरण, मित्तलने हरियाणातील एका कोर्टच्या जजला खोटी नोटीस पाठवली आणि त्याला दोन महिन्यांच्या रजेवर पाठवून मित्तल स्वतः जजच्या खुर्चीत बसला.

या काळात त्याने २०००पेक्षा जास्त गुन्हेगार लोकांना निर्दोष मुक्त केले व निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवले. विशेष म्हणजे २ महिने ही बाब कोणाच्या लक्षातच आली नाही, मात्र लक्षात आल्यावर मित्तलसोबत अनेक निर्दोष सुटलेल्या गुन्हेगारांना ही पुन्हा अटक करण्यात आले.

 

 

या मित्तलने भारतातल्या नव्हे तर जगातल्या अनेक लोकांना कोड्यात पाडले होते आणि अजूनही पाडले आहे. एखादा माणूस एवढ्या कौशल्यपूर्ण चोऱ्या कशा करू शकतो याचा विचार अजूनही खूप लोक करतायत.

खरं तर चोरी ही फार चुकीची गोष्ट आहे. चोरी या गोष्टीचा सगळीकडेच धिक्कार केला जातो आणि गेलाच पाहिजे. जर चोरीच्या ठिकाणी ते डोकं दुसरीकडे कुठे वापरलं गेलं तर स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास होण्यात मदत होईल.

जर काही चोरायचंच असेल तर एखाद्याची चांगली गोष्ट चोरा, एखाद्याचा चांगुलपणा चोरा किंवा एखाद्याचे ज्ञान. मात्र दुसऱ्याच्या कमाईवर स्वतः डल्ला मारणे अतिशय वाईट गोष्ट. त्यापेक्षा स्वतः एखादी गोष्ट कमवून जी मजा आणि जे समाधान आहे ते कुठेच नाही.

आपण ज्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही अशी गोष्ट या ‘हुशार ‘ चोराने केली होती, पण उपयोग काय अशा डोक्याचा. शेवटी त्याची चोरी पकडली गेलीच, मात्र तरीही मित्तल आपल्या वेगळेपणाने या गुन्हेगारी जगतावर वेगळा ठसा उमटवून गेला आहे यात वाद नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version