' फिट राहण्यासाठी Ad मधील ज्या गोष्टी तुम्ही खाता, त्या खरंच पौष्टिक आहेत का? – InMarathi

फिट राहण्यासाठी Ad मधील ज्या गोष्टी तुम्ही खाता, त्या खरंच पौष्टिक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपण सगळेच या धकाधकीच्या फास्ट लाईफ मध्ये इतके रगडले जातो  सध्या घरून जरी काम करत असलो तरी कामाच्या नादात आपलं वैयक्तिक आयुष्य आणि आपली तब्येत याकडे दुर्लक्ष होतंच. कधी नकळत होतं तर कधी जाणून बुजून.

पण दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अनहेल्दी लाईफस्टाईल मध्ये काही लोकं असे सुद्धा आहेत की जे खरोखरच स्वतःला फिट ठेवायचा प्रयत्न करत असतात आणि काही लोकं हे फक्त फिट राहण्यासाठी सांगितलेले अत्यंत चुकीचे उपाय करत असतात.

 

 

जसं की सध्या इंटरनेटच्या जगात कित्येक ऑनलाईन साईट्स वर तसेच युट्युब चॅनल च्या माध्यमातून शरीर सदैव फिट ठेवण्यासाठी शेकडो उपाय सांगितले जातात! त्यापैकी अगदी हातावर मोजता येण्याइतकेच उपाय खऱ्या आयुष्यात उपयोगी पडतात.

बाकीचे उपाय आणि त्या उपायांमागच्या गैरमजुती आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.. ! ज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.

या नक्की कसल्या गैरसमजुती आहेत आणि त्यामुळे अन्नातील महत्वाच्या सत्वांपासून सामान्य लोक कसे वंचित राहत आहेत हे समजून घेण्याचा आणि ते गैरसमज दूर करायचा आपण पूर्ण प्रयत्न करूया!

 

१. फॅट फ्री फूड हेच हेल्दी

 

fat free inmarathi
waxner medical centre

 

मार्केट मध्ये येणाऱ्या कित्येक प्रॉडक्टवर अगदी बिनधास्तपणे आजकाल ‘झिरो कॅलरी’,  ‘९९% फॅट फ्री’ अशी बरीच लेबल चिकटवलेली दिसतील, पण या गोष्टीला तुम्ही भुलून जाऊन तीच गोष्ट शरीरासाठी उत्तम असा समज करून घेऊ नका.

तुमच्या शरीराला ज्या व्हिटॅमिन्सची, सत्वांची, फॅट्सची गरज असेल त्या गोष्टीची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थांचं सेवन करा. उगाच या फॅट फ्री सारख्या लेबल्सच्या भपक्यात राहून स्वतःच्या तब्येतीची हेळसांड किंवा दुर्लक्ष करू नका!

 

२. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी मीठ कमी खाणे

 

adding-salt-inmarathi
keluarga.my

 

कोणत्याही गोष्टीच अतिसेवन हे वाईटच ठरतं. तसेच मीठ ही सुद्धा अशी वस्तू आहे, ज्याचं जास्त सेवन कधीही धोकादायकच असतं. फक्त हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनीच मीठ कमी खावं असा नियम नसून त्याचं अतिसेवन कुणालाही धोकादायकच आहे असा नियम आहे!

 

३. फळांचा रस हा फळांइतकाच गुणकारी असतो

 

fruit juice-inmarathi03
naturalsociety.com

 

सध्याच्या युथमध्ये फ्रुट ज्यूस पिणं आणि स्वतःला हेल्थ कोंशियस सांगणं हा एक ट्रेंड चालू आहे. काही लोकांना वाटत फळांचा रस हा सुद्धा तितकाच गुणकारी असतो, पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे.

कारण फळांचा रस जेव्हा काढला जातो तेव्हा त्याची सालं आणि त्यातलं मुख्य फायबर- सत्व बाजूला काढून टाकल्याने त्या फळातला एकही गुण त्या रसात राहत नाही.

 

fruit juice-inmarathi01
looklocalmagazine.com

 

त्यातून त्या ज्यूसमध्ये साखर किंवा बर्फ अशा गोष्टी घातल्याने त्या फळाचा खरा उपयोग होतच नाही आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे त्या टेट्रापॅक मध्ये मिळणारे ज्यूस. त्यात केमिकल्स आणि प्रिझर्व्हेटिव्हसचा इतका भडीमार असतो की त्या ज्यूसने अपायच व्हायची शक्यता असते!

त्यामुळे फळांचा ज्यूससारख्या कृत्रिम प्रकाराप्रेक्षा फळं ही नुसती खाल्लेली कधीही चांगली, त्यातून आवश्यक ते पोषण हे मिळतंच!

 

४. ग्लूटेन फ्री फूड कधीही उत्तम

 

gluten fress inmarathi
healthline

 

 

गव्हातील पिष्टमय पदार्थ काढून टाकल्यावर जो एक चिकट द्रव्यासारखा पदार्थ उरतो त्याला ग्लूटेन असं म्हणतात आणि हे ग्लूटेन नसलेले पदार्थ खायचं फॅड हा सध्याचा ट्रेंड आहे. ग्लूटेन मध्ये कसलेही फॅट नसून शरीरासाठी कधीही उत्तमच आहे हे सायन्स ने प्रुव्ह केलं आहे!

 

५. स्निकर्ससारखे चॉकलेट बार हे अत्यंत गुणकारी

 

snickers inmarathi

 

सर्वात मोठा गैरसमज या स्निकर्स सारख्या जाहिरातींतून पसरवला जातो. जेव्हा भूक लागते आणि आसपास काही नसेल तर स्निकर्स जवळ ठेवा आणि ते खा, ही अत्यंत चुकीची समजूत लोकांमध्ये रूढ केली जातीये आणि या सगळ्यांना Nutrition Bar हे असं गोंडस नाव दिलेलं आहे.

पण खरंतर, त्यात चॉकलेटचं प्रमाण जास्त असून त्यातुन अजिबात पोषक तत्व मिळत नाही एवढं मात्र नक्की!

त्यामुळे या अशा जाहिरातींना बळी पडून ते चॉकलेट घेऊ नका. त्यापेक्षा दोन केळी किंवा एखाद सफरचंद जवळ बाळगा.  त्याने तुमचं पोटसुद्धा भरेल आणि आवश्यक ती पोषकसत्व सुद्धा तुमच्या शरीराला मिळतील!

 

६. शुद्ध शाकाहारी अन्नात प्रोटिन्स आणि इतर सत्वांची कमी असते

 

veg inmarathi
healthline

 

आजवरचा सर्वात मोठा गैरसमज कोणता असेल तर तो हाच की शाकाहारी अन्नात पोषण तत्वांची उणीव असते! उलट कित्येक रिसर्च मधून हे सिद्ध झालंय की शाकाहारी डाएटच तुम्हाला तुमचं आयुष्य आणखीन हेल्दी करायला आणि आयुष्य वाढवायला मदत करू शकते.

तसेच कित्येक फळभाज्या, पालेभाज्या, कंदमुळं, कडधान्ये यातून मिळणारी पोषकतत्व आणि प्रोटिन्स ची तुलना इतर पदार्थांबरोबर होऊच शकत नाही कारण योग्य शाकाहारी अन्न योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी सेवन केल्याने कोणाच्याच शरीराला अपाय होत नाही हे आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहून ठेवल आहे!

 

७. बिसलेरीचं पाणी हे सर्वात शुद्ध पाणी

 

bisleri inmarathi
sentinel assam

 

प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे पाणी. म्हणजे एकवेळ अन्न नसेल तरी माणूस फक्त पाण्यावर सुद्धा काही काळ जगू शकतं इतकं ते आवश्यक आहे, पण या पाण्याच्या सेवनाबद्दल सुद्धा बऱ्याच समजुती पसरल्या आहेत.

जसं की, नळाचं पाणी पिण्यापेक्षा बिसलेरीची बाटली कधीही उत्तम, खरंतर बिसलेरी किंवा तत्सम बॉटल वॉटर हे सुरक्षितच आहे असा कोणत्याही वैज्ञानिक संस्थेने दावा आजवर केलेला नाही त्यामुळे ते बिसलेरी सुद्धा कितपत योग्य आज यावर सुद्धा शंका उपस्थित केली जाऊच शकते.

त्यामुळे बिसलेरीच पाणी चांगलं हा सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि भारतासारख्या जगाच्या यादीत लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशात तरी बिसलेरीमध्ये शुद्ध पाणी मिळणं हे खूप कठीण आहे!

 

८. रेग्युलर व्यायाम करत असाल तर तुम्ही काहीही खाऊ शकता

 

Exercise Inmarathi

 

 

आपल्याइथे शेवटची आणि अत्यंत हास्यास्पद गैरसमजूत म्हणजे जर तुम्ही फिटनेस फ्रिक आहात किंवा नियमित चालणे, धावणे, जिमला जाणे अशा सवयी तुम्हाला आहेत तर तुम्ही कोणत्याही पदार्थाचे सेवन करू शकता!

हा समज अत्यंत चुकीचा आहे, कारण तुमचं फिट असणं हे ८०% तुमच्या खाण्याच्या सवयीवर आणि २०% तुमच्या शारीरिक व्यायामावर अवलंबून असत! तुम्ही नियमित व्यायाम करता म्हणजे कोणत्याही गोष्टी खायचा आणि त्या पचवायचा परवाना तुमचं शरीर तुम्हाला कधीच देत नाही.

तेलकट, तुपकट, जास्त मीठ किंवा गोड खाणे किंवा वेळी अवेळी नीट जेवण न घेता फास्टफूड खाणे, कोल्ड्रिंक्सचे किंवा मद्याचे जेवणाच्या वेळेस सेवन करणे अशा गोष्टी तुमच्या शरीरासाठी घातकच आहेतच.

या गैरसमजुती तुम्ही फॉलो करत असाल तर आजच या सवयी बदला.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?