Site icon InMarathi

मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय ? मग या गोष्टी कधीच करु नका …

dear zindagi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जीम, डाएट यांनी शरीर मजबूत होत असलं तरी, मन, बुद्धी सक्षम करणं अधिक कठीण असतं. शरीरात मन नावाचा अवयवचं नाही, असं म्हणणा-यांची संख्या मोठी असली, तरी आपला प्रत्येक विचार, कृती, सवयी या सगळ्या नियंत्रित करण्याची जबाबदारी मनावर असल्याचेही  मान्य केलं जातं.

 

 

अशावेळी वैज्ञानिकदृष्ट्या ही क्रिया आपल्या मेंदुशी निगडित असल्याची बाब समोर आली आहे. आपलं सबकॉन्शन माईंड कार्यरत ठेवणं, त्याला अधिक जागृक, तल्लख ठेवणं आणि मेंदुव्दारे येणा-या नकारात्मकता, वाईट सवयींना आळा घालणं सर्वात महत्वाचं आहे.

तुम्हालाही वैयक्तिक आयुष्यात तसंच करिअरमध्ये यशस्वी व्हायचंय ? मग त्यासाठी तुम्ही शरीराप्रमाणेच मानसिकदृष्ट्या खंबीर असणं गरजेचं आहे. येणारी संकट, आव्हानं पेलून ती यशस्वीरित्या परतवून लावण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे.

तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असाल तर खाली दिलेल्या गोष्टींंपासून कायम दूर रहा.

…….

न्यूनगंड नको 

आपण सतत का चुकतो ? एखादी वाईट घटना आपल्यामुळेच घडली ? एखादी गोष्ट आपल्याला जमतचं नाही… यांसारखे विचार तुमच्या मनात येतात ? मग सर्वात आधी असा विचार करण जाणीवपूर्वक टाळा.

 

demandgen.com

 

स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणं, आत्मविश्वासाची कमतरता, न येणा-या एखाद्या गोष्टीबाबत भिती, अथवा लाज याला न्युनगंड म्हणतात. मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे न्यूनगंड असा न्यूनगंड असलेली व्यक्ती हा इतरांसाठी नेहमीच चेष्टाचा विषय ठरते,

………..

आत्मविश्वासाला तडा नको

जो स्वतःवर विश्वास ठेवु शकत नाही, त्याच्यावर जगं कसं भरवसा ठेवणार ? त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर, कर्तृत्वावर विश्वास ठेवलात, तर तुमच्या आसपासच्या व्यक्तींनाही तुमच्याविषयी विश्वास वाटेल

जगातील प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी लोकांची उदाहरणे तपासली तर त्या सर्वांमध्ये आत्मविश्वास ही सामान्य बाब आढळून येईल.

 

youtube.com

 

आपली बुद्धीमत्ता, क्षमता, निर्णय या सर्वांबाबत तुम्ही आत्मविश्वास बाळगणं गरजेचं आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याचं हे महत्वाचं लक्षण आहे. आत्मविश्वासाने केलेलं कोणतंही काम यशस्वी होतं, मात्र मानसिकदृष्ट्या सक्षम लोक आत्मविश्वास बाळगताना तो अतिआत्मविश्वास अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स ठरणार नाही याकडेही लक्ष देतात.

………

बदलाची भीती नको

बदल ही एकच बाब शाश्वत आहे. जगात कोणतीही गोष्ट दिर्घ काळ टिकणारी नाही, मात्र बदल त्याला अपवाद आहे. मानसिकदृष्ट्या खंबीर असणारी माणसं या बदलांना कधीही घाबरत नाहीत. आपल्या आयुष्यातील काही बदल आपल्याला हवेहवेसे असले, तरी अनेक गोष्टी, घटना, माणसं, परिस्थिती यांत होणारे बदल आपल्याला आवडत नाहीत.

नकोसे असतानाही ऑफिसच्या कामात होणारा बदल असो वा इच्छा नसतानाही कामासाठी परदेशात स्थायिक होण्याची स्थिती, यांपैकी प्रत्येक घटनेत संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात मोठे बदल होतात,

cartoondealer.com

 

मात्र अशा बदलांना घाबरण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जाणं, दरम्यान एखादं आव्हान आल्यास त्यातून मार्ग काढणं , हे साध्य करणारी व्यक्तीचं आयुष्यात यशस्वी होऊ शकते.

……….

अतिरिक्त विचार टाळा

ओव्हरथिकिंग अथवा अतिरिक्त विचार हा मानसिक आजार बनत असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. लोकंं काय म्हणतील या प्रश्नाचा सर्वाधिक विचार करणा-यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वात जास्त असते त्यामुळे अनावश्यक गोष्टींचा विचार करण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालविणं योग्य नाही.

 

 

youtube.com

 

वेळेचंं महत्व ओळखून आपला वेळ हा सत्कारणी लावणं गरजेचं आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है केहना, याप्रमाणे समाजातील प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियेचा विचार करत स्वतःवर त्याचा विपरित परिणाम करून घेणे योग्य नाही,

………….

ज्यावर  अंकुश नाही, त्याचा अतिरेकी विचार टाळा

परिस्थिती बदलता येत नसेल, तर मनस्थिती बदलावी, या उक्तीप्रमाणे जी घटना आपल्याला बदलता येत नाही, त्यामुळे स्वतःला त्रास करु घेऊ नका

 

dailystoic.com

 

मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी हा महत्वाचा धडा आहे. काही वेळा आपल्या आयुष्यात घडणा-या घटना या अटळ असतात, त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसते, अशा परिस्थिती आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी, घटना, दुःख आपण टाळू शकत नाही.

नेमक्या याच वेळी बहुतांश लोकांचा संयम सुटतो, त्यातून येणारी निेराशा, ताण यांमधून थेट आत्महत्येसारखे पाऊल उचललं जातं, मात्र तुम्ही स्वतःला खंबीर करण्याचा प्रयत्न करत असाल, तर बदलता न येणा-या घटनांच्या वेळीही स्वतःची मानसिकता बदला.

……….

रिस्क घेण्यास घाबरु नका

मानसिकरित्या दुर्बल लोकं निर्णय घेण्यासाठी घाबरताना दिसतात. निर्णय घेण्यापुर्वीचं त्यानंतरचे परिणाम, निर्णय चुकल्यास होणारा तोटा, लोकांकडून विचारले जाणारे प्रश्न अशा शंकांचं वलय तयार केलं जातं.

 

pakwired.com

 

मात्र रिस्क घेण्याची तयारी दाखवून आपला निर्णय योग्य सिद्ध करण्याची धमक मानसिकरित्या सक्षम लोकांच्यात अंगी बाणवली जाते. आपल्या बुद्धधीवर विश्वा ठेवून न डगमगता निर्णय घेण्याची तयारी ठेवा.

……….

पुन्हा-पुन्हा त्याच चुका टाळा 

गेल्या आठवड्यात केलेली चुक पुन्हा केल्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का ? उत्तर हो असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या फारसे सक्षम नाही. कारण त्याच त्याच चुका पुन्हा करणे हे मानसिकदृष्ट्या गोंधळलेल्या व्यक्तीचं लक्षणं आहे.

 

 

चुका करणं ही माणसाची सवय असली, तरी त्याची पुर्नरावृत्ती होऊ नये याची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. निष्काळजीपणा अथवा नसलेले गांभिर्य यांमुळे पुन्हा त्याच चुका झाल्या, की इतरांकडून दोष दिले जातात, आणि त्यानंतर पश्चताप करण्याची वेळ येते.

……..

अपयशाला घाबरु नका

सायकलवरून पडल्यानंतर, मी सायकल चालवणारंच नाही हा कांगावा किंवा शाळेच्या परिक्षेत एकदा नापास झाल्यानंतर पुन्हा परिक्षेची वाटणारी भिती…तुम्हाला अशी भिती कधी वाटलीय का ?अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हा सुविचार शाळेत आपण अनेकदा ऐकलेलं असलं, तरी याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना याचा हमखास विसर पडतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात अपयशाचे क्षण येतात, कितीही मेहनत केली तरी अनेकदा पहिल्या प्रयत्नांमध्ये यश मिळत नाही.

 

lifehack.org

 

लहानपणापासून असे अपयश येत असले, तरी जे प्रयत्न करणं सोडत नाहीत, तेच अखेरिस यशस्वी होतात. मानसिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक अशा अपयशांना कधीच घाबरत नाहीत, अपय़श आल्यानंतर, झालेल्या प्रसंगातून धडा घेत पुढे जाण्याचा त्यांचा गुण त्यांना यशस्वी ठरवतो.

……….

एकटेपणाची भीती नाही

 

bollywoodlife.com

 

बहुतांश लोकांना हल्ली एकटेपणाची भिती वाटते. काही काळ घरात एकटं राहण्याची वेळ आली तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, मानसिकरित्या खंबीर लोक अशा एकटेपणाला कधीच घाबरतं नाही. किंबहुना, अशा वेळेचा ते स्वतःसाठी केवळ सकारात्मक उपयोग करतातं.

एकटं असताना घाबरण्यापेक्षा, त्यावेळेत नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला जाणं महत्वाचं आहे.

…….

संयम हवा

“पी हळद नी हो गोरी”, यांप्रमाणे प्रयत्न केला की लगेच फळाची अपेक्षा करणं योग्य नाही. एखादी गोष्टी पुर्ण होण्यासाठी ठराविक काळं देणं आणि मुख्यतः प्रत्येक बाबतीत संयम ठेवणं हे खंबीरतेचं आणखी एक मुख्य लक्षण आहे.

 

 

सुख असो वा दुःख, प्रत्येक घटनेत तुम्ही स्वतःवर कसा संयम ठेवता, स्वतःसह इतरांनाही संंयम ठेवण्यास शिकविता का ? यांवर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम आहात की नाहीत हे अवलंबून असतं.

…………

वेळेचे नियोजन

वेळ ही माणसाची खरी संपत्ती असते, सध्याच्या धकाधकीच्या जगात इतर सर्व गोष्टींच्या खरेदीसाठी रक्कम मोजता येत असली तरी वेळ मात्र खरेदी करता येत नाही.

 

 

त्यामुळे वेळेचं नियोजन करणं सर्वात महत्वाचं आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक मिनीटाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे.

……….

शारिरीकदृष्ट्या सक्षम असाल, तरी मानसिकदृष्ट्या खंबीर असालंच असं नाही. मानसिकरित्या सक्षम असणं हा मनगटाचा नव्हे तर बुद्धीचा कस असतो.

सध्याच्या आव्हानात्मक आयुष्यात दररोज नवी संकटं, नव्या कसोट्या येत असताना, त्यात टिकून रहायचं असेल, इतरांचं नेतृत्व करायचं असेल, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असणं महत्वाचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version