शिवरायांच्या मावळ्यांच्या “या” तंत्रामुळे जगातील मोठ्या कंपनीज अमाप यश मिळवतायत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : दीपक पाटील
===
मी getabstract.com या साईटचा सभासद आहे.
(कंपनीतर्फे मिळालेली मोफत सुविधा) या साईटवर १७,००० गाजलेली बिझनेस पुस्तके, लेख, व्हिडियो talks यांचा १० मिनिटांचा सारांश उपलब्ध आहे. पूर्ण पुस्तक वाचण्यात वेळ न दवडता त्याचा १० मिनिटांचा अर्क वाचून विषयाची बऱ्यापैकी कल्पना येते (नंतर वाटलंच तर पूर्ण पुस्तक वाचू शकतोच).
माझ्यासारखे आळशी स्वतःहून या साईटवर फेरफटका मारायला जात नाहीत हे त्यांना चांगले माहीत असल्याने ते स्वतःहून दर आठवड्याला एक मेल पाठवतात ज्यात एका पुस्तकाचा सारांश PDF स्वरूपात दिलेला असतो.
एकदा माझ्या मेलबॉक्स मध्ये स्टिफन डॅनिंग लिखीत द एज ऑफ अजाइ्ल या पुस्तकाचा सारांश झळकला आणि अजाइ्ल कार्यप्रणालीचा नवा पैलु समोर आला.
अजााइ्ल ही एखादा प्रकल्प राबविण्याची यशस्वी पद्धत आहे. कोणत्याही इंडस्ट्रीत एखादा प्रकल्प राबवताना आतापर्यंत वॉटरफॉल ही पद्धत अवलंबवली जायची. मात्र झपाट्याने बदलणा-या जगातील आणखी एक वेगवान बदल म्हणजे वॉटरफॉल पद्धतीची जागा आता अजाइ्ल पद्धतीने घेतली आहे. अर्थात अजाई्लचा शब्दशः अर्थ चपळ असा आहे.
या पुस्तकात अमेरिकेच्या २००३ च्या इराक युद्धाचे उदाहरण दिलं आहे. अमेरिकेच्या बलाढ्य आणि आधुनिक शस्त्रांनी युक्त सेनेला इराकच्या काही मोजक्या अतिरेकी युद्धखोरांनी अपुऱ्या शस्त्रांनी जेरीस आणलं होतं. तेव्हा कमांडर जनरल Stanley McChrystal ला पाचारण करण्यात आलं.
हे ही वाचा –
- छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!
- बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा
ज्याप्रमाणे फडणवीस यांच्या अभ्यासप्रणालीनुुसार त्यांनी अभ्यास, निरिक्षण केलं. आणि त्याच्या असं लक्षात आलं की अमेरिकी सैन्य बलाढ्य असलं वेगवान हालचालींची वानवा आणि निर्णयातील दिरंगाई या दोन्ही बाबी त्यांच्यासाठी धोक्याच्या ठरत आहेत.
दुसऱ्या बाजूला इराकी सैन्य छोट्या छोट्या तुकड्यात विभागले गेलं असून त्वरित हालचाल करतं. अमेरिकेच्या सैन्याला आदेशासाठी हेडक्वार्टरच्या निर्णयाची वाट बघावी लागते, त्यांना काही बाबतीत स्वातंत्र्य नाही, तर इराकी सैन्याची ती ती तुकडी जे हवं ते करायला मोकळी असते.
सगळ्यांचं अंतिम ध्येय तेच असते पण मैदानात तत्काळ निर्णय घेऊन लगेच अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य त्यांना होतं. थोडक्यात इराकी सैन्य हे अजाई्ल अर्थात चपळ होतं.
माझ्या मते, अजाई्ल हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून आपल्यासाठी त्यात नाविण्य असे काहीचं नाही. पण अमेरिका-इराकचं उदाहरण वाचत असताना मला शिवरायांच्या मावळ्यांची आठवण आली. गनिमी कावा किंवा मावळ्यांची लढायची पद्धत ही अजाई्ल प्रणालीचे प्रतिक आहे.
प्रत्येक तुकडीचा म्होरक्या कोणी खूप मोठा अधिकारी असायचा असं नाही. त्या त्या तुकडीला त्वरित निर्णय घेऊन अमंलबजावणी करण्याचा अधिकार होता. मग ते पन्हाळा किल्ल्यावर पावनखिंडीत, “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मारायला नको!” असे म्हणणारे बाजीप्रभू असो कि “तुमचा बाप येथे मरून पडला आहे, कोठे पळता? किल्ल्याचा दोर कापला आहे!” असे म्हणणारे सुर्याजी असो.
जिथे मुघल सैन्य हत्तीवरून अवजड तोफा वाहात दिल्लीच्या आदेशाची वाट पाहात संथगतीने चाल करत तिथे मावळे घोड्यांवरून क्षणात इथे तर क्षणात तिथे असे चपळगतीने छोट्या छोट्या शस्त्रांचा वापर करून शत्रूला जेरीस आणत.
– अजाई्ल मध्ये डेव्हेलपर्स आणि बिझनेस यांना एकत्र काम करावं लागतं. शिवरायांनी स्वराजाच्या मंत्र दिला होता, तेंव्हा सैन्यासोबतच प्रजाही त्यात जोडली गेली होती.
हे ही वाचा –
- जेव्हा स्त्री सैन्य शिवरायांच्या मावळ्यांना भिडतं, इतिहासातील एक अपरिचित लढाई
- “किल्ल्यावर भगवा फडकवल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही”, बापलेकांची अशीही प्रतिज्ञा
– अजाई्ल मध्ये परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात, आधी घेतलेले निर्णय लगेच बदलावेही लागतात, नदीच्या प्रवाहाप्रमाणे रहावं लागतं. शिवरायांनाही असे निर्णय वेळोवेळी घेतले आहेत, तह केले, तशी मुस्कटदाबीही केली आहे.
– अजाई्ल मध्ये छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करत पुढील टप्पा गाठला जातो. एकाचवेळी मोठा घास घेतला जात नाही, राजांनीही छोटे छोटे किल्ले सर करत स्वराज्याची मेढ रोवण्यास सुरुवात केली.
अजाई्लमध्ये छोट्या गटांमध्ये विभागणी करत संबंधित टिम्सना कामासाठी प्रोत्साहन देणारं वातावरण आणि कामाचं पुर्ण स्वातंत्र्य दिलं जातं.
अजाईलमध्ये ज्या गोष्टी ग्राहकांसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या आधी पुरवण्यावर भर असतो. जसं कि मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये हजारो गोष्टी आहेत, पण सामान्य माणूस त्यातल्या २०% गोष्टीही वापरात नाही.
तीच गोष्ट आपल्या मोबाईलची, मोबाईलमध्ये असलेल्या फीचर्सपैकी २०% गोष्टीही आपण नित्यनियमाने वापरत नाही. त्यामुळे एखादा प्रोजेक्ट करताना त्यात सगळ्यात महत्वाच्या ज्या २०% गोष्टी आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.
शिवरायांचे किल्ले बघा, त्यात किल्ले मजबूत असण्यावर भर दिलेला आढळेल, कुठेही अनावश्यक नक्षीकाम किंवा कोरीवकाम आढळणार नाही. विनाकारण संगमरवराची फरशी लावून ठेवलेली दिसणार नाही. स्वराज्य उभारणीसाठी हवा असलेला पैसा हा अनावश्यक अथवा दिखाऊ सोहळ्यांंमध्ये वाया घालविण्यात आलेला नाही.
मी शिवचरित्राचा अभ्यासक नाही, वा अन्य कोणीही अधिकारी व्यक्ती नाही, पण मला वाटतं शिवरायांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावरून नक्कीच म्हणू शकतो कि मावळ्यांची टीम अजाई्ल होती.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.