' ISRO, DRDO या नामांकित सरकारी संस्थांमध्ये जॉब करायचाय? वाचा संपूर्ण प्रक्रिया, मित्रांनाही सांगा – InMarathi

ISRO, DRDO या नामांकित सरकारी संस्थांमध्ये जॉब करायचाय? वाचा संपूर्ण प्रक्रिया, मित्रांनाही सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

इसरो किंवा डीआरडीओ या संस्थांमध्ये काम करायला मिळणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. आपल्या हुशारीचा आणि टॅलेंटचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करणे हे अनेकांचे ध्येय असते. इसरो व डीआरडीओ ह्या संस्थांमध्ये निवड होणे ही देखील अभिमानास्पद गोष्ट असते कारण या संस्थांमध्ये फक्त त्यालाच काम करण्याची संधी मिळते जो पूर्णपणे पात्र आहे.

उमेदवारांना अत्यंत तावून सुलाखून घेऊनच या ठिकाणी  प्रवेश दिला जातो. हुशार आणि कर्तबगार तरुणांची देशाला गरज आहे कारण हेच लोक देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतात. म्हणूनच तुम्ही देशासाठी काम करू इच्छित असाल  तर इसरो आणि डीआरडीओमध्ये काम करू शकता. त्यासाठी तुम्हाला अकरावीला विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन मग बारावीनंतर इंजिनियरिंगची डिग्री मिळवणे आवश्यक आहे.

 

isro-inmarathi

 

तुमच्याकडे इंजिनयरिंगची डिग्री असल्यावर तुम्ही इसरो आणि डीआरडीओची वेबसाईट चेक करू शकता.त्यांच्या वेबसाईटवर किंवा पेपरमध्ये त्यांच्या प्रवेश परीक्षांबद्दल जाहिरात आणि माहिती दिलेली असते. ती माहिती वाचून मग त्याप्रमाणे प्रवेश परीक्षेसाठी तयारी करावी लागते.

ही परीक्षा अत्यंत कठीण लेव्हलची असते. तुमच्याकडून १०० टक्के प्रयत्न करून या संधीचे सोने करा.  साधारणपणे  जानेवारी ते मार्चच्या दरम्यान इसरोच्या प्रवेश परीक्षेची माहिती येते.

इसरोच्या प्रवेश परीक्षेची www.isro.org  ह्या वेबसाईटवर माहिती मिळेल तर डीआरडीओच्या प्रवेश परीक्षेची rac.drdo.in या वेबसाईटवर माहिती मिळेल. डीआरडीओच्या परीक्षेची माहिती साधारणपणे एप्रिल-मे च्या सुमारास वेबसाईटवर येते.

 

degree engineering inmarathi
Er – dr

 

ही प्रवेश परीक्षा Gate च्या तुलनेत सोपी असते. त्यामुळे भरपूर अभ्यास करून या परीक्षेत उत्तीर्ण होता येते. ME या विभागात दर वर्षी इसरोमध्ये पदभरती होते. डीआरडीओचा पर्सनल इंटरव्ह्यू इसरोपेक्षा तुलनेने  सोपा असतो. इंटरव्यू पॅनलमध्ये पाच ते सहा सदस्य असतात. त्यातील दोन हे डीआरडीओचे अधिकारी, आणि बाकीचे लोक आयआयटी किंवा इतर तत्सम मोठ्या विद्यापीठातील लोक असतात.

 

जर तुम्ही फ्रेशर नसाल तर इंटरव्ह्यू पॅनल मधील माणसे तुम्हाला तुमचे आवडीचे दोन विषय विचारतील. ज्या विषयाचे तुम्हाला अगदी व्यवस्थित ज्ञान आहे त्याच विषयांची नावे घ्या. कारण पॅनेलची माणसे त्याच विषयावर तुम्हाला प्रश्ने विचारतील. तुमचे त्या विषयांचे निदान बेसिक ज्ञान असायलाच हवे.

 

isrosciences_7778
The Hans India

दर वर्षी BARC आणि ISRO मध्ये ग्रॅज्युएट ट्रेनीसाठी पदे भरली जातात. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला एक ट्रेनिंग प्रोग्रॅम अटेंड करावा लागतो. तिथे तुम्हाला प्रोग्रॅम अटेंड केल्याबद्दल स्टायपेंड सुद्धा मिळतो. तुम्ही प्रोग्रॅम यशस्वीपणे पूर्ण केला तर तुम्हाला सायंटिफिक स्टाफ म्हणून घेतले जाते.

तुम्हाला जर सायंटिस्ट म्हणून इस्रोमध्ये काम करायचे असेल तर बी टेक ग्रॅज्युएट होऊन तुम्हाला सायंटिफिक एलिजिबिलिटी टेस्ट द्यावी लागते. SET उत्तीर्ण केल्यावर पर्सनल इंटरव्ह्यू होतो. तो उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला सायंटिस्ट बी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

SET मध्ये उत्तीर्ण झाल्यावर क्लास वन ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळते. ह्याला ग्रुप ए सर्व्हिस असेही म्हणतात. त्यासाठी तुम्हाला बीइ किंवा बीटेक मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुमची बीइ किंवा बीटेक ची डिग्री ही केमिकल, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनियरिंग ची असायला हवी.

DRDO SET ही ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम असून ती तर वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी घेतली जाते. ही तीन तासांची परीक्षा असते आणि जून महिन्यात ह्या परीक्षेचे फॉर्म येतात.

 

ISRO Chandrayaan 2.Inmarathi
Chandrayaan 2

 

तसेच सायंटिस्ट बी या पदासाठी कॅम्पस मधून सिलेक्शन होते. बीई/ बीटेक/ बीएस्सी इंजिनिअरींग फायनल इयर किंवा थर्ड इयरचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. पण त्यासाठी त्यांचे सगळे विषय क्लिअर असायला हवेत आणि आधीच्या वर्षांत प्रथम श्रेणी किंवा समतुल्य सीजीपीए स्कोअर मिळवायला हवा. म्हणजेच कमीत कमी ६५% किंवा ७. २५ सीजीपीए इतका स्कोअर असायला हवा.

कॅम्पस सिलेक्शन कमिटी ही आयआयटी, आयआयएससी, एनआयटी, केंद्रीय विद्यापीठे ह्या ठिकाणी व इतर महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांची निवड करते. ज्यांची निवड होते त्यांना तिथल्या तिथे सिलेक्शन लेटर्स मिळतात.

ROSSA (रजिस्ट्रेशन ऑफ स्टुडन्ट्स विथ स्कोलॅस्टिक ऍप्टिट्यूड द्वारे सायंटिस्ट सी ची निवड केली जाते.  त्यासाठी ज्यांचे नुकतेच पीएचडी पूर्ण झाले आहे आणि ज्यांनी पदवी इंजिनियरिंग किंवा मेडिकल मध्ये मिळवली आहे, किंवा ज्यांनी विज्ञान, मानसशास्त्र, गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यात प्रथम श्रेणी मिळवली आहे त्या लोकांची यात निवड होऊ शकते.

ज्यांना यासाठी अप्लाय करायचे आहे, त्यांच्यासाठी शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर असते आणि ज्यांचा थिसीस १ जानेवारी तर ३० जून मध्ये पूर्ण झाला आहे ते लोक यासाठी अप्लाय करू शकतात.

 

NRI inmarathi
networkworld.com

 

याशिवाय जे अनिवासी भारतीय लोक ह्या संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव घेऊ इच्छितात त्यांची टॅलेंट सर्च स्कीम मधून निवड होते. वेगवेगळ्या विभागांत विविध पदांसाठी थोड्या कालावधीसाठी (Ad-hoc appointment ) त्यांची निवड होऊ शकते.

अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ जे भारतात कुठेही नोकरी करत नसतील, आणि किमान सहा महिने भारतात वास्तव्याला असतील ते ह्याठिकाणी अप्लाय करू शकतात. किंवा जे भारतात कायमचे परत येऊ इच्छित असतील आणि ज्यांच्याकडे एमएस किंवा पीएचडी अशी उच्च पात्रता असेल असे अनिवासी भारतीय या संस्थांमध्ये अप्लाय करू शकतात. Ad-hoc appointment ही शक्यतोवर केवळ एकाच वर्षापुरती असते आणि तिचा कालावधी वाढवला जात नाही.

लॅटरल एंट्री स्कीम मधून सायंटिस्ट सी ते सायंटिस्ट जी यांची निवड केली जाते. DRDO च्या काही विशिष्ट पदांसाठी पदभरती केली जाते त्यांनाही अभियांत्रिकीचे किंवा तत्सम उच्चशिक्षण किंवा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एरोनॉटिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड फेलोशिप ह्याद्वारे सायंटिस्ट बी पदे भरली जातात. त्यासाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांतून एरोनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये बीई ,बीटेक, एमई ,एमटेक केलेले विद्यार्थी पात्र असतात.

 

raju 3 idiots rastogi interview file closing inmarathi

 

रिक्रुटमेंट अँड असेसमेंट सेल (RAC ) द्वारे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. पदवी पूर्ण केलेल्यांना ३००० रुपये महिना स्टायपेन्ड मिळतो तर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेल्यांना सहा हजार रुपये महिना इतका स्टायपेंड मिळतो.

DRDO साठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन द्वारे शास्त्रज्ञ किंवा इंजिनिअर या पदंडातही सेंट्रलाइज्ड भरती होते. तसेच पीएचडी केलेल्यांना लाईव्ह रजिस्टर मध्ये नाव नोंदवता येते. जेव्हा जशी व्हॅकन्सी असते तसे तसे त्यांना गृहीत धरले जाते.

तर यापैकी कुठल्याही मार्गाने तुम्ही इसरो किंवा DRDO  मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. तिथे प्रवेश मिळवताना तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो.पण जर तुम्ही सर्व प्रकारे पात्र असाल तर देशाच्या प्रगती आणि संरक्षणासाठी  महत्वाचे कार्य करण्यात तुमचाही हातभार नक्कीच लागू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?