“सुखी माणसाचा सदरा” मिळणं अशक्य, पण या १० सवयी जीवन सुखी करतील..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“सगळे काही फक्त सुखासाठी”… माणूस सुखाच्याच शोधात फिरत असतो. त्याचे सगळे प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी असतात. सुखी माणसाचा सदरा मिळवण्यासाठी माणूस जगभर फिरतो, जंग जंग पछाडतो.
अखेरीस आयुष्याच्या शेवटी त्याला कळते की समाधानी माणूस हाच खरा सुखी माणूस असतो. त्यामुळे सुखी माणसाचा सदरा तर काही मिळू शकत नाही.
पण सुखी व्यक्ती आयुष्यात काय करतात आणि त्या कष्ट करून किंवा आहे त्या परिस्थितीत सुद्धा कशी काय सुखी राहू शकतात ह्याचे सिक्रेट मात्र आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो. जी माणसे आयुष्यात सुखी असतात त्यांना काही विशिष्ट सवयी असतात.
त्या सवयी आपण सुद्धा आत्मसात केल्या तर आपण देखील आयुष्य सुखाने जगू शकतो. सुखी माणसे ह्यातील अनेक गोष्टी अगदी नकळत करत असतात. त्या आपण देखील पाळल्या तर आपल्याला सुखी राहण्यावाचून कुणीही अडवू शकत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१. ज्ञानदान
“जे जे आपणासी ठावे, ते ते सकळांसी सांगावे… शहाणे करुनी सोडावे अवघे जन!” असे आपल्याला शिकवले जाते. आपल्याला असलेले ज्ञान दुसऱ्याला वाटण्याने ते अधिक उजळते. ज्ञान दिल्याने वाढते. त्यासारखे दुसरे सुख नाही.
आपण एखाद्याला बहुमोल ज्ञान दिले तर आपण त्या व्यक्तीच्या आदरास पात्र तर होतोच शिवाय आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. ज्ञान वाटण्यासाठी शिक्षकच व्हायला हवे असे नाही. एखाद्या मित्राला, नातेवाईकांना, सहकार्याला, मुलांना आपण आपल्याकडील असलेले ज्ञान वाटू शकतो.
२. रोजचा प्राधान्यक्रम ठरवणे
एकाच चाकोरीत दिवस ढकलले की हळूहळू आयुष्य नीरस होऊ लागते. मग नीरस आयुष्यात आनंद सुद्धा सापडणे कठीण होते. म्हणून रोजच्या दिवसाचा वेगळा प्राधान्यक्रम ठरवा. फार लांबची चिंता करत बसलो तर आजचा दिवस सुद्धा त्रासात आणि तणावात जातो.
त्यामुळे रोजचे काम ठरवून ते पूर्ण केले की दिवस सार्थकी लागतो. ह्याने अनेक गोष्टी सोप्या होतात आणि निरर्थक टेन्शन आणि चिंतांमध्ये आपले मन अडकत नाही.
–
- जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी “या” गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका..
- तुझ्याकडे सुख फार झाले का? मग आता देवापाशी दुःख माग : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २९
–
३. व्यायाम करणे
व्यायाम केल्याने तणाव दूर होतो हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. व्यायाम केला की शरीरात एन्डॉर्फिन नावाचे हॉर्मोन स्रवले जाते. ह्या हॉर्मोनमुळे वेदना कमी होतात. आपल्याला ताजेतवाने वाटते आणि आपण सकारात्मक विचार करू लागतो.
एन्डॉर्फिन हे मॉर्फीन प्रमाणेच काम करते. त्यातल्या त्यात पुश अप्स हा व्यायाम तर सर्वोत्तम आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्या उपकरणांची सुद्धा गरज नाही. कमी जागेत, कुठल्याही उपकरणांशिवाय अगदी काहीच मिनिटांत हा व्यायाम होऊ शकतो.
पुश अप्सचे सुद्धा वाईड आर्म, डायमंड, नॅरो आर्म, वन आर्म, आर्चर्स, लेग एलिव्हेटेड पुश अप्स विविध प्रकार आहेत. त्यामुळे एकाच प्रकारचा व्यायाम करून कंटाळा सुद्धा येणार नाही.
४. कृतज्ञतेचा सराव करणे
कृतज्ञता ही खूप सुंदर भावना आहे. पण ह्या भावनेचा अभ्यास आणि सरावच करावा लागतो. माणसाने मनात कायम कृतज्ञता ठेवली तर त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. तसेच आपल्या आयुष्यात जे आहे ते चांगले आहे हा विचार माणूस करू लागतो. त्यामुळे नैराश्य चार हात लांब राहते.
शास्त्रज्ञांनी काही लोकांच्या आरोग्य, संबंध, दीर्घायुष्य, शाळेचे ग्रेड, पदोन्नती मिळण्याची शक्यता, फिटनेस परफॉरमन्स, बँक खात्यातील शिल्लक ह्या सर्व बाबींचा अभ्यास केला आणि त्यांना असे लक्षात आले की ज्या लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता त्यांनी आयुष्यात अधिक प्रगती केलेली आढळली.
५. चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे
चांगली पुस्तके आपल्या आयुष्यात खूप चांगला आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आपले विचार सुधारतात, विचारांना चांगली दिशा मिळते. पुस्तके वाचली नाहीत तर आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे नैराश्य येते.
हे होऊ द्यायचे नसेल तर आपली विचारांची बैठक पक्की हवी. ती बैठक पक्की करण्यात चांगली पुस्तके मोठा हातभार लावतात. त्यामुळे तुम्ही जे काही साहित्य ऐकता, वाचता, बघता ते चांगले आणि सकारात्मक असण्यावर भर देणे आवश्यक आहे.
६. सोशल मीडियावर चांगले साहित्य शेअर करणे
काही शास्त्रज्ञांनी रिसर्च करून असा निष्कर्ष काढला आहे की छान छान कथा, निसर्गाचे, लहान बाळांचे सुंदर फोटो, लहानश्या क्युट प्राण्यांचे, पक्ष्यांचे व्हिडीओ हे सगळे बघून आपला मूड छान होतो.
एखादा फोटो बघून आपला मूड छान होत असेल तर तो फोटो शेअर करून आपण दुसऱ्याचा मूड देखील छान करण्यात हातभार लावू शकतो.
७. रोज वाचन करणे
एक पान का होईना, पण रोज काहीतरी वाचन केलेच पाहिजे हा दंडक घालून घेतला तर रोज आपल्या ज्ञानात काही ना काही भर पडते. नियमीत वाचन केल्याने आपल्या माहितीत तर भर पडतेच, शिवाय आपल्या विचारांना चालना मिळते.
अगदी कथा, कादंबरी वाचली तरी आपल्या डोक्याची चक्र सुरु राहतात आणि शब्दसंग्रहात सुद्धा भर पडते. म्हणून रोज वाचन केले पाहिजे. वाचनाने माणसाला खूप स्थैर्य मिळते.
८. झोपेकडे लक्ष द्या.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शांत झोप मिळणे दुरापास्त झाले आहे. आपल्याला इतका ताण असतो की एक तर झोप लागत नाही. लागली तरी ती शांत झोप नसते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर सुद्धा ताजेतवाने वाटत नाही.
त्यामुळे सगळेच चक्र बिघडते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच झोपेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रोज किमान सात ते आठ तासांची चांगली झोप घेतली पाहिजे. रात्री आपल्याला शांत झोप मिळाली तर आपल्याला दिवसभर काम करण्याचा उत्साह वाटतो. आपलं मन शांत राहतं.
९. ध्यान करणे
ध्यानधारणा करण्याचे फायदे आज संपूर्ण जगाने मान्य केले आहेत आणि जगातली अनेक प्रसिद्ध माणसे आज ध्यानाच्या मार्गाला लागलेली आहेत. ध्यान केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच आपली एकाग्रता वाढते. तणाव कमी होतो. अनेक मानसिक रोग लांब राहतात.
मनःशांती वाढते. ध्यान करण्यासाठी फार काही लागत नाही. सुरुवात थोड्याने करून नंतर हळूहळू ध्यानाची वेळ वाढवत नेता येते. ह्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आणि माणूस सुखी राहतो.
१०. प्रार्थना करणे
प्रार्थना केल्याने मनात नकारात्मक विचार येणे कमी होते. एखाद्या शक्तीवर श्रद्धा ठेवून प्रार्थना केली की मनात आशा जागृत राहते. दुःखी मनाला सुद्धा प्रार्थना केल्याने उभारी मिळते. सुखी माणसे दुःख नसले तरी रोज एका शक्तीची प्रार्थना करून ते त्या शक्तीचे आभार मानतात. कृतज्ञता व्यक्त करतात.
या सगळ्या नंतर देखील एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, सुख आणि आनंद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जस सुखाचा विरुद्ध अर्थी शब्द हा दुःख आहे पण आनंद या शब्दाचा विरुद्ध अर्थ नाही. म्हणुन सुख मिळवाच पण मुख्यतः आनंद मिळवण्यामागे धावा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.