श्रीमंत होण्याचा खात्रीशीर मार्ग: इतर श्रीमंत लोक वागतात तसे वागा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या यशा मागचं नेमकं रहस्य काय असतं? इतरांपेक्षा ते कोणत्या वेगळ्या गोष्टी करतात? किंवा कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात –
हे माहित आहे का तुम्हाला?
छोट्या छोट्या गोष्टीतील बदल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलल्यास तुम्ही ही आयुष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकता.
श्रीमंत लोकं आयुष्यात कोणत्या चुका करत नाहीत ते जाणून घ्या आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा.
१. एका ठिकाणी कधीच समाधानी रहात नाहीत –
तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत आत्ता ज्या ठिकाणी आहात त्यावर कधीच समाधानी राहू नका. तुम्ही सतत उच्च ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा.
व्यवसाय करायचा असेल तर, एक एक टप्पा पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
सध्या तुमचा व्यवसाय लाखाचा असेल तर, तो कोटींचा कसा होईल यावर लक्ष केंद्रित करा. कोटीचा झालयावर दहा कोटींचा कसा होईल यावर लक्ष केंद्रीत करा.
अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तुमचे लक्ष्य वाढवत नेल्यास तुम्ही एक उत्तम उद्योजक म्हणून इतरांसमोर आदर्श निर्माण कराल.
“अनेक जण व्यवसाय कसा वाढेल याचा विचारच करत नाहीत. आहेत त्याच ठिकाणी समाधानी राहतात.”
असं सांगून, रेयन स्टीवमन, हार्डकोर क्लोजर चे सीइओ पुढे म्हणतात –
“व्यवसायात नेहमी आपण वरची उंची गाठण्याचा प्रयत्न करायला हवा.”
२. कंजुषी करत नाहीत –
जे. के. रोलिंग, पहिल्या अब्जाधीश लेखिका, यांच्याबद्दल माहिती असेलच, यांना देणगी द्यायला आवडते.
२०११ मध्ये त्यांनी आपल्या संपत्तीच्या १६% रक्कम, म्हणजे, १६० दशलक्ष डॉलर इतकी रक्कम एका चॅरीटीला दान दिली. कारण, गरीब असण्यातील दुःख काय असतं ते त्यांना चांगलं माहितेय.
कंजुषी करण्याने तुमचे काही पैसे वाचू शकतील, पण त्यामुळे तुमच्या संपत्तीत कोणतीही भर पडणार नाही. म्हणून श्रीमंत व्यक्ती कधीही कंजूष नसतात.
३. सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेणे –
हो, लखपती माणूस हा यशस्वी उद्योजक असतो, कारण त्यांच्या अवतीभवती चांगला सल्ला देणाऱ्या आणि चांगल्या कल्पना मांडणाऱ्या माणसांचा नेहमी गराडा असतो.
कोणतीही मोठी अचिव्हमेंट ते एकट्याने साध्य करू शकत नाहीत हे त्यांना चांगलं माहित असतं.
त्यांच्या यशामागे एक टीम असते जी त्यांच्या यशस्वी उद्योगासाठी काम करत असते, त्यांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होत असते.
उलट, ९३% श्रीमंत लोकांच्या मते, त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करणारा गुरु असतोच, असं सांगतात.
–
हे ही वाचा – उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!
–
४. आवडणाऱ्या सर्व गोष्टीना वेळ देतात –
महत्वाकांशी असणं आणि स्वार्थी असणं यात थोडासाच फरक आहे. फक्त पैश्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही श्रीमंत जरूर व्हाल.
पण, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेलच असं नाही.
यशस्वी होण्याचा खरा मंत्र आहे, तुम्हाला ज्या कामात आवड आहे तेच करा.
जिम रॉन या उद्योजकांच्या मते,
“एका बापाकडे पैसा आहे, पण आनंद नाही, हे पाहायला आपल्याला आवडेल का? नाही ना!”
५. आपल्या कामाचा कधीही कंटाळा करत नाहीत –
यशस्वी लोकांच्या यशाचं एकमेव रहस्य म्हणजे, ते त्यांना मनापासून आवडेल तेच काम करतात. त्यामुळेच ते श्रीमंत होतात.
व्यवसाय यशस्वीपणे चालवणारे लोक कोट्यवधी रुपये कमावतातच. पण जे लोकं आपल्या व्यवसायावर प्रेम करतात, ते इतरांपेक्षा दुप्पट संपत्ती सहज कमावतात.
६. कधीही नशिबावर विश्वास ठेवत नाहीत –
लॉटरी जिंकणारे लोक त्यांच्या नशिबावर विश्वास नक्कीच ठेवत असतील. पण जे लोकं कष्ट करून श्रीमंत होतात, त्यांचा विश्वास स्वतःवर आणि स्वतःतील क्षमतेवर असतो.
ते नशिबाच्या हवाली राहून कधीच काम करत नाहीत.
उलट, ९०% गरीब लोकांचा मात्र नशीबावर खूप विश्वास असतो.
७. टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवत नाहीत –
सोफ्यावर बसून तुम्ही तासनतास टीव्ही बघण्यात वेळ वाया घालवणार असाल तर, तुम्ही कधीही श्रीमंत बनू शकणार नाही.
म्हणूनच ६७% श्रीमंत लोकं टीव्हीसाठी अगदी मोजकाच वेळ काढून ठेवतात.
यापेक्षा ते त्यांचा वेळ त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील अधिकाधिक ज्ञान मिळवून त्या क्षेत्रातील तज्ञ कसे होता येईल यावर फोकस करतात.
८. कामाची यादी –
तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर जाल किंवा भरकटाल अशा कित्येक गोष्टी तुम्हाला खुणावत असतात. त्यामुळे श्रीमंत व्यक्ती दिवसाच्या सुरुवातीला दिवसभरात करायच्या कामाची यादी करून ठेवतात.
ठरवलेली कामं वेळेवर होतायेत की नाही त्यावर लक्ष ठेवतात आणि कामाचा पाठपुरावा करतात.
९. ध्येय ठरवण्यात टाळाटाळ करत नाहीत –
श्रीमंत लोकाकडे दैनंदिन कामाची जशी यादी असते, तसेच त्यांनी दीर्घ कालावधीत ठराविक ध्येय गाठण्याचे देखील पक्के केलेले असते. यामुळे त्यांना सतत काम करत राहण्याची प्रेरणा मिळते.
७०% श्रीमंत लोकं एका वर्षात एक तरी महत्वपूर्ण ध्येय साध्य करतात.
कारण मोठे ध्येय नसेल तर, सगळ्याच गोष्टी हातातून निसटून जातील. ज्यामुळे श्रीमंत बनण्याचं तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
१०. कशाची भीती बाळगत नाहीत –
भीती हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे, हे वाक्य कोणत्या ना कोणत्या वक्त्याकडून तुम्ही ऐकलं असेलच. भीतीमुळे आपण आयुष्यातील आनंदी क्षण आपण जगू शकत नाही.
त्यामुळे आपण श्रीमंत देखील होऊ शकत नाही.
“जोखीम घेतल्यानेच आयुष्यात यश मिळते,” उंबेर्टो मिलेट्टी म्हणतात,
“अशा जोखीम घेतल्यानेच आपल्याला आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी देखील साध्य करता येतील.”
११. भावनांच्या आहारी जात नाहीत –थॉमस कार्ली यांनी असं लिहून ठेवलंय की,
“जेव्हा तुम्ही भावनेच्या आहारी जाता, तेव्हा तुमचा अक्षरशः अर्धा मेंदू काम करणे बंद करतो.
म्हणूनच जेंव्हा व्यवसायात एखाद्यावेळी जोराचा फाटका बसतो, तेंव्हा या खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेऊन, तुमच्या मेंदूने निर्णय घेतला पाहिजे.”
१२. आत्ममग्न रहात नाहीत –
तुम्ही जर एकट्यानेच सर्व गोष्टी करतो म्हणालात तर, ते कधीच शक्य नाही. व्यवसायाच्या बाबतीतही हे अगदी खरं आहे.
म्हणून, यशस्वी व्यक्ती या नेहमी योग्य व्यक्तींच्या सान्निध्यात राहतात. स्वतःत गुंतून पडत नाहीत.
त्यांच्यासारख्याच यशस्वी होण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने योग्य आहे असे वाटते तेंव्हा त्याच्याशी नातेसंबंध दृढ करण्यासाठी ते पुरेसा वेळ देतात.
१३. व्यायाम चुकवत नाहीत –
व्यायाम केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते हे खरं आहे. त्याचप्रमाणे शरीरीला सतत कार्यमग्न ठेवल्याने देखील, आपल्या मिळकतीवर चांगला परिणाम होतो.
सतत कार्यक्षम असणार्या किंवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींची मिळकत ही व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या मिळकती पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
१४. कधीही नवनवीन गोष्टी करण्यास विसरत नाहीत –
अनेक व्यक्तींना नेहमीच मोठा विचार करण्याची सवय असते आणि ते त्यावर काम देखील करतात.
बिल गेट्स आणि रिचर्ड ब्रॅनसन हे दोघेही दिवसातील काही वेळ नवीन कल्पनांवर विचार करण्यास देत असत हे तर सर्वांनाच माहिती आहे.
तसेच ते स्व-विकासावर देखील जास्त भर देत. सृजनात्मक विचार ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, या कल्पना सत्यात (पैशाच्या रुपात) उतरवण्याची धमक तुमच्यात असायला हवी.
१५. वाचनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत –
आजूबाजूला होणारे बदल किंवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर, वाचनाद्वारे स्वतःला अपडेट ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
–
हे ही वाचा – श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात
–
वाचनातून मिळालेल्या ज्ञानातून नव्या कल्पना किंवा नवे उपाय सापडू शकतात. ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची वृद्धी होऊ शकते. महिन्यातून किमान एक नॉन-फिक्शन वाचून झालंच पाहिजे असा त्यांचा दंडक असतो.
तर मित्र मैत्रिणींनो, हे आहेत श्रीमंत लोकांचे, यशस्वी उद्योजकांचे “टाळलेले” गुण!
तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं? आम्हाला नक्की कळवा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
.