' Amway चा घोटाळा उघडकीस आला खरा मात्र या संकटापासून वेळीच रहा दूर!! – InMarathi

Amway चा घोटाळा उघडकीस आला खरा मात्र या संकटापासून वेळीच रहा दूर!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नेत्यांच्या पाठोपाठ ईडीने  व्यवसायिकांवर  टाकण्यास  सुरवात केली आहे. नुकतंच ईडीने डायरेक्ट सेलिंग प्रकारात अग्रेसर असणाऱ्या amway कंपनीच्या विरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. ईडीने  कंपनीची ७५० करोडच्या आसपासची मालमत्ता जप्त केली आहे. ग्राहकांची फसवणूक होत आहे हे लक्षात येताच ही कारवाई केली गेली आहे.

आजकाल वाढत्या डिजिटल जमान्यात  जितक्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत तितक्याच आपल्यासाठी धोकादायक बनल्या आहेत. अनेकवेळा ऑनलाईन व्यवहारांमध्ये लोकांची फसवणूक होताना दिसून येते. त्यामुळे आपल्यावरही अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल, तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

 

amway 1

 

पूर्वीपेक्षा आता पैसे हाताळणे, आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. पूर्वी सुट्टी असेल आणि बँक बंद असली तर पैसे काढता येत नसत. पण एटीएम, डेबिट -क्रेडिट कार्ड आल्यापासून आर्थिक व्यवहार करणे अधिक सोयीचे झाले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फोन बँकिंग, नेट बँकिंग आल्यापासून तर एका मिनिटात पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात. घरबसल्या सगळे व्यवहार होऊ शकतात. जशी जशी आपली तंत्रज्ञानात प्रगती होते आहे तसे तसे आर्थिक व्यवहार करणे अधिक सुकर आणि सोपे होऊ लागले आहे.

 

mobile banking inmarathi
paisabazaar.com

 

पण नाण्याची ही फक्त एकच बाजू झाली. ह्याची दुसरी बाजू अशीही आहे की ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट -डेबिट कार्ड तसेच फोन बँकिंग वगैरे आल्यापासून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे.

हे व्यवहार करताना जर तुम्ही आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही तर फसवणारी माणसे तुमच्या चहूबाजूला तुमच्या अकाउंट आणि व्यवहारांवर लक्ष ठेवून तुम्हाला गंडा घालायला बसलेलीच आहेत.

त्यामुळे बँकांनी कितीही काळजी घेतली तरी तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर तुमचे आर्थिक नुकसान होणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषांची गरज नाही.

फ्रॅंक ऍबेग्नेल ह्या मनुष्याने त्याच्या पूर्वायुष्यात अनेक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करून अमेरिकेच्या नाकात दम आणला होता. आपल्या लिओनार्दो दि कॅप्रिओचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट “कॅच मी इफ यु कॅन” ह्या चित्रपटाची प्रेरणा स्टीव्हन स्पीलबर्ग ह्यांनी ह्या फ्रॅंक ऍबेग्नेलवरूनच घेतली होती.

 

catch me if u can inmarathi
nflxso.net

 

आता मात्र हा मनुष्य गेली अनेक वर्षे अमेरिकन सिक्युरिटी कन्सल्टन्ट म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात मदत करतो आहे. सध्या ते एफबीआय अकॅडमी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत आहेत.

स्वतःला सगळ्या पळवाटा आणि चोरवाटा माहिती असल्याने आणि त्यांचा चांगलाच अनुभव असल्याने फ्रॅंक ऍबेग्नेल आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घ्यावी हे अगदीच चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतात.

ऑनलाईन व्यवहार करताना फसवणुकीला बळी पडावे लागू नये म्हणून काय करावे आणि काय करू नये हे त्यांच्याच शब्दांत समजावून घ्या.

फ्रॅंक ऍबेग्नेल म्हणतात की,

“आत्ताच्या आधुनिक काळात आर्थिक गुन्हे करणे हे आधीपेक्षा चार हजार पट सोपे झाले आहे. मोठं मोठ्या कंपन्यांच्या सीआयओ आणि सीईओ यांनी त्यांच्या कंपनीतील सगळ्याच कर्मचाऱ्यांना सायबर सिक्युरिटीविषयी माहिती दिली पाहिजे.

तसेच त्यांनी त्यांच्याजवळ असलेला सगळंच डेटा सुरक्षित कसा राहील ह्याची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे.

क्लाएंट तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांचा महत्वाचा डेटा त्यांना देतात त्यामुळे त्यांचा अत्यंत महत्वाचा डेटा संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कंपनीची असते.

पण दुर्दैवाने कंपनीत कर्मचाऱ्यांना हे आवश्यक ते ट्रेनिंग मिळत नाही आणि ते अश्या फिशिंग स्कॅम्सना बळी पडतात. किंवा फेक फोन कॉल्सना बळी पडतात. ते सोशल इंजिनियरिंग स्कॅम्समध्ये फसले जातात आणि फोनवर नको ती सगळी माहिती अगदी तपशिलात देतात.

 

fake calls inmarathi
portcitydaily.com

 

बहुसंख्य लोक हे प्रामाणिक असतात. त्यामुळे त्यांना फक्त प्रामाणिकपणेच विचार करता येतो. त्यांना हे छक्केपंजे कळत नाही किंबहुना त्या दिशेने विचार करणे जमत नाही आणि याचाच फायदा हे फसवणूक करणारी माणसे घेतात.

अगदी अधिकृत दिसणारा फसवा ईमेल हे फ्रॉड लोक तयार करतात आणि सर्वसामान्य लोक इथे फसतात.

त्यांना तो इमेल खरा वाटतो आणि ते त्या ईमेलला उत्तर देतात आणि फसवे लोक त्यांचा सगळा महत्वाचा डेटा मिळवून आपला कार्यभाग उरकतात.

आज तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की फसवणूक करणे अधिकाधिक सोपे होत चालले आहे. कुठलाही गुन्हा किंवा फसवणूक घडते कारण कुणीतरी कुठेतरी महत्वाची माहिती किंवा जास्त तपशीलवार माहिती नको त्या माणसाला दिलेली असते.

एक लक्षात घ्या. हॅकर्स फसवणूक करत नसून त्यांची मदत घेऊन इतर लोक फ्रॉड करतात.

हॅकर्स लोकांचे काम इतकेच असते की वीक पॉईंट शोधून काढणे आणि माहिती फ्रॉड करणाऱ्यांना देणे. त्या माहितीचा उपयोग करून मग आर्थिक फसवणूक होते.

 

hackers inmarathi
industryweek.com

 

मी साऊथ कॅरोलायनामध्ये राहतो. कुणीतरी आमच्या राज्यातील टॅक्स रेव्हेन्यू ऑफिसची साईट चार वर्षांपूर्वी हॅक केली आणि साऊथ कॅरोलायनाच्या नागरिकांचे टॅक्स रिटर्नचे ३.८ दशलक्ष पळवले.

चौकशीअंती असे लक्षात आले की, तेथील एका कर्मचाऱ्याने कंपनीचा लॅपटॉप एकदा घरी नेला आणि असुरक्षित सर्व्हरवर तो वापरला आणि हॅकर्सना आत शिरण्यासाठी दार उघडले गेले.

आर्थिक गुन्हे हे असे घडतात. म्हणूनच सर्वच कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण आणि माहिती दिलीच पाहिजे.

तीच गोष्ट पासवर्डबाबतीत आहे!

पासवर्डचे तंत्रज्ञान आता कालबाह्य झाले आहे तरीही आपण पासवर्ड अतिशय सुरक्षित तंत्रज्ञान म्हणून वापरतो आहोत. मालवेअर, रॅनसमवेअर आणि इतर सगळ्या आर्थिक गुन्ह्यांसाठी पासवर्डच जबाबदार आहेत.

आपण कितीही सुरक्षित सर्व्हर आणि पासवर्ड बनवले तरी सोशल इंजिनिअरिंग मधून घडणारे आर्थिक गुन्हे आपण थांबवू शकत नाही. कारण त्यासाठी लोकांनीच सजग राहणे आवश्यक आहे.

आपली खाजगी माहिती अगदी बँकेला सुद्धा फोनवरून सांगू नये हे जोवर लोकांना कळत नाही ,फसव्या स्कीम्स आणि बक्षिसांना भुलून जोवर लोक स्पॅमच्या जाळ्यात अडकत राहतील तोवर आर्थिक गुन्हे हे घडतच राहतील.

 

spams inmarathi
pixert.com

 

लोक तर इतके हुशार झालेत की ते फोन कंपन्यांना तुमच्या नावाने फोन करून तुमच्या नंबरचे सीम मिळवू शकतात.

आणि मग तुमचे सगळे कॉन्टॅक्ट,अगदी ओटीपी आणि बँक अकाउंटची माहिती सुद्धा अगदी सहज त्यांच्या कडे जाते.

तसेच तुमच्या सिक्युरिटी प्रश्नाचे उत्तर शोधणे सुद्धा फ्रॉड लोकांना अगदी सहज शक्य आहे.

तुमचा सोशल सिक्युरीटी नंबर, किंवा तुमच्या आईचे नाव शोधून काढणे सोशल मीडियाच्या काळात फसवणाऱ्या लोकांच्या अगदी डाव्या हातचा मळ आहे.

म्हणूनच स्वतःला फसवे फोन कॉल्स, इ मेल्स, बक्षिसे, ऑफर्स ह्यांच्या जाळ्यात न अडकू देणे हाच सुरक्षित राहण्याचा मार्ग आहे. आपली खाजगी माहिती कुणालाही न देणे हा नियम कसोशीने पाळला गेलाच पाहिजे.

तसेच एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की जी माहिती तुम्ही क्लाउडमध्ये पाठवता ती क्लाउडमध्ये साठवली जाते. तुम्हाला असे वाटत असेल की फेसबुकवर टाकलेली माहिती तुम्ही डिलीट केली की ती कायमसाठी डिलीट होते तर तसे नाही.

ती माहिती कायम परत मिळवता येते. अगदी तुम्ही तुमचे अकाउंट डिलीट केले तरी ती माहिती मिळवता येते. म्हणजेच क्लाऊडमधून कुठलीही माहिती मिळवता येऊ शकते.”

त्यामुळे तुमची आयडेंटिटी सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

आयडेंटिटी थेफ्ट ह्या प्रकारामुळे मोठे मोठे फसवणुकीचे गुन्हे घडतात. सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही साठवलेला तुमचा कष्टाचा पैसा क्षणात दुसऱ्याला मिळतो.

 

identity theft inmarathi
thoughtco.com

 

फ्रॅंक ऍबेग्नेल ह्यांनी डेबिट कार्ड वापरण्याचे धोके सुद्धा सांगितले आहेत. ते म्हणतात की,

“जर तुम्हाला आयडेंटिटी थेफ्ट पासून सुरक्षित राहायचे असेल तर डेबिट कार्ड कधीही वापरू नका. मी स्वतः डेबिट कार्ड वापरत नाही. आणि कधीही वापरणार नाही. मी माझ्या कुटुंबियांना, मित्रांना आणि नातेवाईकांना देखील डेबिट कार्ड वापरू नका हेच सांगतो.

आर्थिक व्यवहारासाठी डेबिट कार्ड हे सर्वात वाईट साधन आहे. का? कारण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करत असता तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचे बँक खाते आणि पैसे धोक्यात घालत असता.

डेबिट कार्ड वापरण्या ऐवजी क्रेडिट कार्ड वापरणे अधिक सुरक्षित आहे. क्रेडिट कार्डला एक लिमिट असते आणि त्यापलीकडे तुमचे कार्ड कोणी वापरू शकत नाही.

त्यामुळे ते चोरीला गेले तरी एका मर्यादेपलीकडे त्या कार्डचा वापर कुणी करू शकत नाही.

उलट डेबिट कार्ड मधून मात्र तुमच्या अकाउंट मध्ये असलेला सगळा पैसा एका क्षणात गायब होऊ शकतो आणि तो परत मिळवणे हे अत्यंत कठीण आणि वेळखाऊ काम आहे.

 

debit card inmarathi
rd.com

 

तसेच चेकचे व्यवहार सुद्धा अगदी कमीत कमी करा. आणि तुमचे बँक स्टेटमेंट नेहेमी तपासत चला.

कुठल्याही आकर्षक स्कीमच्या मागे स्कॅम असण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्या स्कीम्स पासून लांब राहिलेलेच चांगले. आपली गुप्त माहिती कधीही कुठल्याही परिस्थितीत कुणाला देऊ नका.

फोनवर तर कुठलीच माहिती समोरच्याला देऊ नका.”

ऑनलाईन व्यवहार करताना किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार करताना अशी काळजी घेतली तर तुमचा पैसा सुरक्षित राहू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?