“बाळासाहेब म्हणाले,” दिल्लीत स्वाभिमान जिवंत असलेला मराठी माणूस, हाच तो!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘महाराष्ट्र’ किती अभिमानाने आणि त्याचबरोबर आपुलकीने आपल्या राष्ट्राचे नाव घेतो ना? महाराष्ट्र म्हणजे निधड्या देशभक्तांचं राष्ट्र, संतांची भूमी, कलाकारांचं राष्ट्र, समृद्ध राष्ट्र अशी अनेक विशेषणं या महाराष्ट्राला आहेत.
भारताच्या दक्षिणेच्या मध्यावर हे राष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शब्द संस्कृतमधील ज्या दोन शब्दांनी बनला आहे महा म्हणजे महान असे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र! महाराष्ट्रातील संतांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नाव मिळालं आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई. जे भारताचे सर्वांत मोठं शहर आणि देशाची आर्थिक राजधानी आहे.
या भागात मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते म्हणून मराठी बोलणार्यांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र अशी याची ओळख व्हावी यासाठी मोठी चळवळ झाली.
१९४८ सालापासून ही चळवळ सुरू होती शेवटी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र हे राष्ट्र अस्तित्वात आलं. म्हणूनच आपण १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो.
यामध्ये मुंबई, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, अंबड-जलना, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, ठाणे, शिर्डी-अहमदनगर, सोलापूर, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती आणि नांदेड ही प्रमुख शहरे येतात.
पण मंडळी या महाराष्ट्रात आपण आता मुंबई हे नाव घेतोय, पण मुंबई महाराष्ट्रात येऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले विशेषत: काँग्रेसने, पण त्यावेळी भारताचे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावरील होणार्या अन्यायाविरुद्धच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला.
या राजीनाम्यामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी असे उद्गार काढले की, ‘‘दिल्लीत स्वाभिमान जिवंत असलेला मराठी माणूस एकच, सी. डी. देशमुख!’’ पाहुया त्याबद्दल थोडी माहिती.
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता.
लोकमान्य टिळक यांचेही म्हणणे असेच होते की, भाषेप्रमाणे प्रांतरचना व्हावी. काँग्रेसने पण ते त्या वेळी मान्य केले होते, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र काँग्रेस पक्षाला विशेषत: नेहरूंना संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेत धोका आहे असे वाटू लागले.
मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडकडून विरोध होता.
१९४८ साली प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती.
मुंबई महाराष्ट्रास देण्यास जे.वी.पी. कमिटीने कडाडून विरोध केला होता. मुंबईच्या अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचं, उद्योगधंद्याचं शहर आहे असे अहवालात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नेहरूंनी त्रिराज्य योजना जाहीर केली.
सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई. महाराष्ट्रापासून मुंबई तोडल्यामुळे अन्यायाची भावना मराठी लोकांच्या मनात पसरली. त्यांची अस्मिता दुखावली गेली.
मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं. महाराष्ट्रातील जे नेते काँग्रेस पक्षाच्या बाजूने होते त्यांनी काँग्रेस पक्षासमोर आपली मान झुकवली.
महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसमध्ये नसलेल्या इतर सर्व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला.
सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील आणि महाराष्ट्रासाठी नेहमीच महत्त्वाचे ठरलेले प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले.
१९५५ साली जाहीर सभा झाली. ‘पाच हजार वर्षांनीसुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही’, ‘काँग्रेस असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही’ अशी विधानं केली गेली. जाने-फेब्रु. १९५६साली मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर झाला.
लोकांनी हरताळ, सत्याग्रह केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून सरकारने गोळीबार केला. यात ८० लोकांना मारले. संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीत एकूण १०५ लोकांनी आपले प्राण गमावले.
चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळं नेहरूंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई.
बाकी सर्व काँग्रेस पक्षातील लोक आपल्या पदासाठी, आपल्या हितासाठी पक्षाच्या विरोधात बोलायला तयार नसताना एकच असा निधड्या छातीचा वाघ होता की ज्यांनी महाराष्ट्रावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला मिळालेल्या पदाचा राजीनामा दिला.
ते होते सी.डी. देशमुख तेव्हा ते भारताचे अर्थमंत्री होते.. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या चळवळीला अधिक बळ मिळाले. संयुक्त चळवळीत त्यांच्या या पाठिंब्याला फार महत्त्व आहे.
म्हणूनच बाळासाहेब ठाकरे म्हणाले,
‘‘दिल्लीत स्वाभिमान जिवंत असणारा एकच माणूस आहे तो म्हणजे सी. डी. देशमुख’’
सी. डी देशमुख म्हणजे चिंतामणी द्वारकानाथ देशमुख. १४ जानेवारी १८९६ हा त्यांचा जन्म दिवस तर २ ऑक्टोंबर १९८२ ला त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण रोहा जिल्ह्यात गेले. त्यांचे कुटुंब खूप श्रीमंत होते. कौटुंबिक पार्श्वभूमी देशसेवेची असल्यामुळे तेही या परंपरेशी जोडले गेले. त्यांनी उत्तम शिक्षण घेतले.
ते रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते.१९४३ मध्ये ब्रिटिशांद्वारे त्यांची नेमणूक केली गेली होती आणि ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काही वर्षांमध्ये एक प्रशासकीय सेवक म्हणून खूप चांगल्या गोष्टी केल्या.
भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा युरोपियन परंपरा व संस्कृती याचा पगडा सेंट्रल बँकेवर कायम असावा हा शासनाचा उद्देश होता. पण जेव्हा देशमुखांची इंडिपेंडंट रेग्युलेटरी बॉडीवर नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी आपल्या देशाच्या हिताचेच निर्णय घेतले.
त्यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तिसरे गव्हर्नर बनले. देशमुख यांची बँकेच्या बोर्डावर शासकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर राज्यपाल होण्यापूर्वी सचिव व नायब अशी नेमणूक झाली.
त्यांनी १७ वर्षं त्यांनी सेंट्रल बँकेत फायनान्स मिनिस्टर म्हणून काम पाहिले. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात भारताचे तिसरे अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले. तर असे होते सी. डी. देशमुख.
त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीतर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ हा पुरस्कार १९५७ साली मिळाला.
रेमॉन मॅग्सेसे पुरस्कार १९५९ मध्ये मिळाला आणि १९७५ मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. अशी लोकं महाराष्ट्रात होती म्हणूनच आपण आज अभिमानाने म्हणू शकतो, ‘गरजा महाराष्ट्र माझा’!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.