' एका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय! – InMarathi

एका मराठी माणसाने थेट ऑस्करच्या रेड कार्पेटवर मराठी झेंडा फडकावलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : मिहीर कुलकर्णी

===

२०१४ चा काळ , एका रविवारच्या संध्याकाळी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्करांमध्ये अनेक पुरस्कार दिले गेले. हे पूरस्कार दिले गेले , संध्याकाळी आणलेल्या मटणावर ताव मारत अनेकांनी ते बघितले आणि विसरून ही गेले.

अभ्युदयनगर च्या लोकांनीही असंच केलं असावं. पण दोन दिवसात अभ्युदय नगर मध्ये काही बॅनर लागले आणि त्या बॅनर नी सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. त्या बॅनर वर लिहिलं होतं,

“एक प्रवास यशाचा .. अभ्युदयनगर ते हॉलिवूड”

यातल्या हॉलिवूड शब्दाने अनेकांच लक्ष वेधून घेतलं. या बॅनरच्या डाव्या कोपऱ्यात एका लांब केस असलेल्या तरुणाचा फोटो होता, त्या खाली त्या तरुणाच नाव लिहिलेलं होतं आणि ते नाव होतं..”शेखर रहाटे”

 

shekhar rahate inmarathi
youtube.com

कोण होता हा शेखर रहाटे? आणि हॉलिवूड चा आणि त्याचा काय संबंध? आम्ही ना याला कोणत्या मार्व्हल च्या सिनेमात पाहिलंय ना गेम ऑफ थ्रोन्स च्या कुठल्या एपिसोड मध्ये..ना इतर कोणत्या जॉन विक सारख्या सिनेमा सिरीज मध्ये!

मग तरी हॉलिवूड वगैरे म्हणजे? अश्या गोष्टी तिथल्या आजूबाजूच्या कट्ट्यावर कुजबुजल्या ही गेल्या असतील.

तर शेखर रहाटे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते ऑस्कर रेड कार्पेटमुळे. ऑस्कर सोहळ्याविषयी अनेक गोष्टी दरवर्षी चर्चिल्या जातात.

मग ते पुरस्कार मिळणाऱ्या फिल्म्स असोत किंवा वर्णभेद यासारख्या असंख्य गोष्टी या पुरस्कार सोहळ्याबाबत चर्चिल्या जातात. या सोहळ्यात पुरस्कार कोणाला मिळणार ही जशी चर्चा असते.

तशी अजून एक चर्चा असते ती म्हणजे रेड कार्पेटची. रेड कार्पेटवर कोणाचा ड्रेस कसा असेल? कोण भाव खाऊन जाईल?

 

oscars inmarathi
house.com

ऑस्करच्या रेड कार्पेटमध्ये सेलिब्रिटीज कोणत्या ब्रँडला पसंती देतात याची दरवर्षी चर्चा केली जाते.

अशा या रेड कार्पेटवर शेखरने डिझाइन केलेले ड्रेसेस एक दोन नाही तर तब्बल ५० पेक्षा जास्त सेलिब्रिटीज ने परिधान केले होते हा एकप्रकारचा विक्रमच होता आणि या मुळे शेखर रहाटे हा प्रकाशझोतात आला.

तर शेखर रहाटे चा अभ्युदयनगर ते हॉलिवूड हा प्रवास कसा झाला?

शेखर चा जन्म आणि शालेय शिक्षण अभ्युदयनगरमध्येच झालं. त्यानंतर फोटोग्राफी मध्ये आणि त्यातही विशेषतः फॅशन फोटोग्राफी मध्ये असणारी आवड म्हणून त्याने मुंबई मधील अत्यंत नावाजलेल्या अश्या जे. जे स्कूल ऑफ आर्टस् मधून फॅशन फोटोग्राफीचा डिप्लोमा केला आणि फॅशन फोटोग्राफी क्षेत्रात पाऊल ठेवलं.

 

jj school inmarathi
Collegedunia

दुबई मध्ये अनेक नावाजलेल्या ब्रॅण्डस सोबत फॅशन फोटोग्राफर म्हणून काम करत असतानाच, त्याला मॉडेलिंगचीही आवड निर्माण झाली आणि तिथूनच त्याचा या क्षेत्राशी संबंध आणि आवड वाढली.

फोटोग्राफी आणि मॉडेलिंग याव्यतिरिक्त देखील आपण फॅशनच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याने दुबई मधल्या “Beams International School of Fashion Designing ” मधून फॅशन डिझायनिंग च शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर फॅशन डिझायनर म्हणून सुरु झालेली त्याची कारकीर्द आजही दिमाखात सुरुये.

जवळसपास एका दशकाहून अधिक काळ शेखर फॅशन डिझायनर म्हणून काम करतोय. त्याचा “Shekhar Rahate’s Haute courture” हा एक नावाजलेला ब्रँड झालेला आहे.

या ब्रँडखाली काम करत असताना त्याने अनेक मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस एशिया पॅसिफिक आणि जगभरात होणारे इतर अनेक शोज साठी डिझायनर म्हणून काम केलंय.

“Four weddings and shadi ” नावाच्या एका चित्रपटासाठी पण त्याने डिझायनर म्हणून काम केलंय.

 

design inmarathi
twitter.com

शेखरच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर तो युनायटेड नेशन्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये डिझायनर कलेक्शन प्रेझेंट करणारा एकमेव फॅशन डिझायनर आहे.

हा त्याला मिळालेला बहुमान त्याच्यासाठी खूप मोठा आहे असं तो नेहमी सांगतो.

तुझ्यावर कोणत्या एका स्पेसिफिक कल्चर चा प्रभाव असतो का डिझाइन करताना? या प्रश्नाचं उत्तर शेखर नेहमी असं देतो,

“मी सगळ्या प्रकारचं फॅब्रिक वापरतो, माझ्यावर कोणत्याही एका कल्चर चा प्रभाव नाही, मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स बनवतो जे वेगवेगळ्या कल्चर ला धरून असतात.”

शेखर ला भारतातूनच नाही तर अमेरिकेत सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये

१) लॉस अँजेलीस स्टेट चा “Fashion Couturier of the year ” , २०१२

२) कॅलिफोर्निया स्टेट असेंब्ली चा “Certificate of Appreciation” , २०१२

३) मटा सन्मान, २०१४

यासारख्या अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

 

awards shekhar inmarathi
india.com

आजकाल फॅशन डिझायनिंगकडे लोकांचा कल वाढला आहे. अनेक जण आज फॅशन डिझायनिंग ला करिअर म्हणून बघतायेत.

या लोकांसाठी आणि फॅशन क्षेत्रात काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवायची ज्यांची इच्छा आहे अश्या लोकांसाठी शेखर रहाटे हा नक्कीच एक आदर्श म्हणून काम करेल.

शेखर रहाटेने लवकरच बॉलिवूड मध्येही आपली चमक दाखवावी आणि भारतासाठी भानू अथैया नंतर पुन्हा एकदा ऑस्कर घेऊन यावा, हीच त्याच्या फॅन्सची नक्कीच इच्छा असेल.

तो क्षण भारतीय लोकांसाठी आणि त्यातही खासकरून मराठी लोकांसाठी नक्कीच महत्वाचा आणि अभिमानास्पद क्षण असेल यात तिळमात्र शंका नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?