Site icon InMarathi

‘पुश-अप्स’ करताना ह्या ७ चुका टाळा – दुखापती टाळून, दुप्पट फायदा होईल!

man-doing-push-up IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

व्यायाम करणे हे शरीरासाठी उपयुक्त आहे. आपले शरीर निरामय, रोगमुक्त, तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पद्धती आहेत.

योग, प्राणायम, आसन, विविध स्ट्रेचिंगचे प्रकार, जिममधिल उपकरणांच्या मदतीने केला जाणारा व्यायाम, अश्या कित्येक पद्धतीने शरीर स्वास्थ्य जपण्याचे काम आज वेगवेगळ्या वयोगटातील लोक करत असतात.

तरुणांमध्ये योगसाधना व आसन हे तितके लोकप्रिय नसून त्यांना मॉडर्न पद्धतीचा व्यायाम जसे जिम, झुंबा, इत्यादी करायला आवडतात.

त्यातल्या त्यात ही “पुश अप्स” हा आजच्या तरुणाईचा सर्वात आवडता व्यायाम प्रकार आहे. पुश अप्सला मराठीत जोर बैठका म्हणतात.

 

ndtvfood.com

 

पुश अप्सचा समावेश हा भारतीय व्यायाम प्रकारात पण मोठ्या प्रमाणावर झाला आहे व शरीराच्या बांधणीसाठी “पुश-अप्स” ला सर्वाधिक महत्व आहे.

सूर्यनमस्कारात स्ट्रेचिंग साठी पुशअप्सचा समावेश आहे. 

आजच्या तरुणाईत पुशअप्स ला खूप महत्व असण्याचं कारण आहे की हा व्यायाम करायला सोपा आहे, सोबत हा व्यायाम प्रकार करण्यात जास्त वेळेचा अपव्यय होत नाही.

याचा शरीराला होणारा फायदा पण प्रचंड आहे. शरीराच्या बांधणीसाठी पुश अप्स महत्वाचे असल्याने बॉडी बिल्डिंग साठी तरुणांचा पुश अप्स कडे कल जास्त असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परंतु पुश-अप्स करताना बऱ्याचदा आपल्याकडून काही चुका घडतात ज्यामुळे पुश अप्स सारख्या संपूर्ण व्यायाम प्रकारावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.

 

ndtv.com

 

त्यामुळे अपेक्षित फायदा मिळूही शकत नाही व धोकाही संभवू शकत असतो. पुश अप्स करतांना ह्या ७ चुका टाळा म्हणजे तुम्हाला फायदा होईल.

 

१) कोपरावर जास्त वजन पडणार नाही याची काळजी घ्या

 

times of india

 

पुश अप्स करताना कधीही तुमच्या कोपरावर जास्त वजन पडणार नाही याची काळजी घ्या.

जमल्यास ते अधिक पसरवा पण शरीराला जास्त समांतर ठेवु नका ह्यांमुळे तुमचं कोपराचं हाड विस्थापित होण्याचा धोका उद्भवू शकतो.

 

२) जास्तीत जास्त तणाव निर्माण करायचा प्रयत्न करा

 

yourube.com

 

तुमच्या कमरेला बाहेर काढून, पाठीत जास्तीत जास्त तणाव निर्माण करायचा प्रयत्न करा.

जेव्हा तुम्ही एक पिरॅमिडाप्माणे आपली शरीररचना असणाऱ्यां अवस्थेत पोहचता त्यावेळी जास्तीत जास्त भार हा खालच्या दिशेला देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही छातीत योग्य तो भराव मिळवु शकतात.

 

३) ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा :

 

ndtvfood.com

 

जेव्हा तुम्ही तुमचं वजन संपूर्णत जमिनीच्या दिशेने लावतात तेव्हा अगदी स्वतःला झोकून द्या. स्वतःला अगदी जमिनीवर झोपवून टाका. गुरुत्वाकर्षण प्रत्येक बाबीत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते.

परंतु पुश अप्स करताना तुम्ही सदैव काळजी घ्या कारण तेव्हा तुम्ही गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतात.

त्यामुळे पुश अप्स करताना प्रचंड ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही वेदना टाळू शकतात.

 

४) पाठीचा कणा योग्य आकारात वाकवा

 

health.com

तुमच्या पाठीच्या कण्याला जर तुम्ही आतल्या बाजूला वळवत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराला एक चांगल्या ऐवजी विचित्र आकार येण्याची जास्त संभावना आहे. पुश अप्सचं काम तुमच्या शरीराची बांधणी बनवून ठेवण आहे.

जर तुम्ही तुमचा कणा आतल्या बाजूला वळवत राहिलात तर त्यामुळे तुमचा पाठीमागच्या बाजूवर तणाव निर्माण होत राहील ज्यामुळे कुठलाच सकारात्मक परिणाम दिसून येणार नाही.

 

५) तुम्ही किती पुशअप्स करू शकता ह्याकडे लक्ष न देता त्या कश्या करता ह्याकडे द्या!

 

Thenx.com

 

बऱ्याचदा लोकांचा मनात शंका असते की किती करणं गरजेचं आहे की कसं करणं गरजेचं आहे? मुळात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

पण अर्धवट पुश अप्स करण्याने काहीच उपयोग नाही त्याऐवजी कमी पुश अप्स करा पण पूर्णतः करा जेणेकरून तुमची शरिर बांधणी बनून राहील.

 

६) कधिही पुश अप्स करताना तोंडावाटे श्वास घेणे आणि सोडणे टाळा

 

tnation.com

श्वासोच्छ्वासाचा क्रियेला पुश अप्स मध्ये खूप महत्व आहे. प्रथमतः पुश अप करताना आधी नाकावाटे श्वास आत घ्या आणि पुश डाऊन करताना हळूहळू श्वास बाहेर सोडा.

ह्यामुळे तुमच्या शरीरात रक्ताभिसरण सुरू राहील आणि तुम्हाला तणाव येणार नाही.

 

७) पुश अप्स करण्याचे वेगवेगळे प्रकार उपयोगात आणा

 

istock\

 

जेव्हा तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या व्यायामाला झोकून देता तेव्हा तो व्यायाम करणं हे खूप कठीण नसतं त्यामुळें तो व्यायाम जेवढ्या जास्त वेगवेगळ्या प्रकारे कराल तितका जास्त तो व्यायाम फायदेशीर ठरेल.

त्यामुळे पुश अप्स करताना व्हारीएशनस ट्राय करत रहा तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

आजच्या तणावपूर्ण जीवनात आपल्या शरीराला जपणं हे जास्त गरजेचं आहे त्यासाठी व्यायाम करणं देखील गरजेचं आहे.

तो व्यायाम अधिक उत्तम प्रकारे व योग्यरित्या केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version