भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या ६ कारणे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सामान्य माणूस असो किंवा श्रीमंत माणूस असो प्रत्येकाचं एक लहानपणापासून स्वप्न असतं की खूप कमवायचं आणि मस्त अशी कार घ्यायची. लहानपणापासून भरपूर चारचाकी गाड्यासोबत खेळलेलो असतो.
काहींना मारूती ,नँनो सारखी छोटी गाडी आवडत असते तर काहींना बी.एम.ड्ब्यू ,फरारी अशा कार्स आवडत असतात.
काहींना तर ट्रक, टमटम, मोठेमोठे कन्टेंनर आवडतात. असं सगळ्यांनाच गाड्यांच्या दुनियेत जगायला आवडतं.
सध्या तर तरूणाईमध्ये चारचाकी गाड्यांची भलतीच क्रेझ आली आहे. मुलींमध्ये देखील ही क्रेझ निर्माण होऊ लागली आहे. चारचाकी गाडी म्हटली की काहींच ते स्वप्न असतं तर काहींच उपजीविकेचे वाहन असतं तर काहीचं फिरण्यासाठीचं स्पेशल वाहन असतं.
एकूणच काय तर कार्स हा सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य भागच बनला आहे असे म्हणता येईल .
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
हे ही वाचा – “रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत ? जाणून घ्या काय खास आहे या गाडीत
–
आता नवीन कार खरेदी करायला गेल्यावर कोणत्या रंगाच्या कारची चलती आहे हे आपण आधी पाहतो. एवढे कारचे रंग आहेत की नेमकी कोणती बेस्ट आहे हेच आपल्याला कळत नाही.
त्यामुळे त्यातल्यात्यात सध्या इन असणाऱ्या कारचा रंग आपण निवडतो.
हे तुम्हाला माहीती आहे का की, आपल्या भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री केली जाते? हे वाचून आश्चर्य वाटले असेल आणि प्रश्न पण निर्माण झाले असतील ना?
पण हे खरं आहे की आपल्या भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री केली जाते.
पण पांढऱ्याचं रंगाच्या कार्स का जास्त घेत असतील ते आपण पाहूयात…
जे.डी.पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे. भारतीय लोक भडक रंगाऐवजी फिक्या रंगाला पसंती देत असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.
देशातील एक चतृतांश विक्री झालेल्या कार या सिल्वर किंवा ग्रे रंगाच्या होत्या. तर उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाला पसंती देत आहेत.
दक्षिण भारतातील लोक ३४% पांढऱ्या कार वापरतात तर उत्तर भारतातील लोक ६६% लोक पांढऱ्या कार वापरतात.
२०१३च्या कारच्या विक्रीमध्ये ११% रंगाच्या कारची विक्री झाली आहे तर ४% काळ्या रंगाच्या कारची विक्री झाली आहे. मध्यंतरी तरूणाईमध्ये अशा भडक रंगाच्या कारची जास्त क्रेझ दिसून येत होती पण आता फिक्या रंगाला भारतीय लोकांची जास्त पसंती मिळाली आहे.
एवढेच नाहीतर पेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी BASF च्या अहवालानुसार, २०१८ मध्ये ४३ टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली. भारतीयांची सर्वाधिक पसंती पांढऱ्या रंगाच्या छोट्या कारला असते असं याही अहवालातून दिसतयं.
भारतातील उष्णता हे यामागील कारण असू शकतं. पांढरा रंग लवकर गरम होत नाही त्यामुळे भारतीयांचा कल पांढऱ्या रंगाकडे असू शकतो’ असं बीएएसएफचे अधिकारी चिहारु मतसुहारा यांनी सांगितलं होतं.
या अहवालानुसार इतर रंगाची पसंती देखील जाणून घेऊयात. भारतीयांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती ग्रे रंगाला आहे. तर तिसरा क्रमांकावर सिल्व्हर कलर आहे.
याशिवाय लाल रंगाच्या कार ९ टक्के जणांना, निळ्या रंगाच्या कार ७ टक्के तर काळ्या रंगाच्या कारला केवळ तीन टक्के लाोकांना आवडतात.
भारतातील लोक पांढऱ्या रंगावरच का फिदा झाले असतील बरं… यामागची कारणे पाहूयात…
१) आपल्या भारतातील वातावरणात उष्णता आणि गरमीचे प्रमाण अधिक आहे. तसं पाहिलं तर बाराही महिन्यात एकच समस्या आपल्याला भेडसावते ती म्हणजे उष्णता.
भडक रंगाची कार घेतली तर ती लवकर तापू शकते. त्यामुळे पांढरा रंग लोकांनी अधिक पसंत केला असावा.
२) पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे.
नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग आहे.नवीन गाडी केल्यावर एक सुख अनुभवता याव म्हणून देखील पांढरा रंग निवडतात.
३) गाडी धुतल्यावर स्वच्छ चकाचक अशी एकाच रंगाची गाडी पाहायला मिळते .ती म्हणजे पांढऱ्या. स्वच्छतेचे प्रतिक असल्याने पसंतीस पडत असावी.
–
हे ही वाचा – कुठे राईट हॅन्ड तर कुठे लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह… याचं रहस्य चक्क इतिहासात दडलंय…!!
–
४) सध्या पारंपरिक पध्दती असो की कोणतेही गोष्ट असो नव्याने तरूणाईमध्ये पारंपरिक गोष्टीची क्रेझ पाहायला मिळत आहे. पूर्वी सर्व चारचाकी गाड्या या शुभ्र पांढऱ्या रंगात असायच्या त्यामुळे ते देखील लोक ट्रेड म्हणून फाँलो करत असावी.
५) पांढऱ्या रंगाची गाडी ही इतर रंगाच्या गाड्यांपेक्षा अधिक उठून दिसते.
६)उन्हाळ्यात काळ्या रंगाची कार गरम होते व लवकर खराब होते, असाही भारतीय लोकांचा समज आहे. पांढरा रंग पाहण्यासाठी चांगला आहे. तसेच तो शुभ मानला जातो.
यामुळेच भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री झाली असावी. सध्या दिवसेंदिवस चारचाकी वाहने मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहेत.
प्रत्येकाच्या घरात एक तरी चारचाकी गाडी असते नाहीतर स्वप्न तरी पक्क असतं. त्यामुळे यंदाच्या वर्षे पण २०१९ मध्ये पांढऱ्या रंगाच्या गाड्यासोबत इतर रंगाची गाडी घ्यायला हरकत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.