' अठराव्या शतकात स्वत: विधवाविवाह करून धर्मसत्तेला हादरवून टाकणाऱ्या न्या. रानडे यांचा कार्य वेध – InMarathi

अठराव्या शतकात स्वत: विधवाविवाह करून धर्मसत्तेला हादरवून टाकणाऱ्या न्या. रानडे यांचा कार्य वेध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ ला झाला. त्यांचा जन्म निफाड जिल्हा नाशिक येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव गोपिकाबाई होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सखुबाई आणि दुसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई रानडे असे होते.

त्यांचं प्राथमिक शिक्षण येथे कोल्हापूरला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील एलफिस्टन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी १८६३ साली बी.ए. चं शिक्षण पुर्ण केलं.

१८६४ मध्ये त्यांनी M. A. पुर्ण केले आणि १८६६ मध्ये त्यांनी LLB ही कायदे विषयक पदवी संपादन केली. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले पदवीधर म्हणून ते ख्यातनाम आहेत.

इंदुप्रकाश या लोकहितवादींच्या साप्ताहिकामधुन त्यांनी प्रबोधनपर लेखनही केलेल आहे, त्यामधून त्यांनी इंग्रजीमध्ये लेखन सुद्धा केले.

 

Ranade
India.com

त्यांचे सामाजिक कार्य बघता ते अनेक सभेंचे सदस्य राहिले आहेत. बऱ्याच सभेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. १८६५ मध्ये स्थापन झालेल्या विधवा विवाह उत्तेजक मंडळाचे सदस्य होते.

त्याचबरोबर प्रार्थना समाजाची स्थापना ब्राह्मो समाज आदर्श समजून पुढे झाली होती. त्या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांच्या कार्यामध्ये सुद्धा रानडे यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.

एलफिस्टनमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा नोकरी केलेली आहे. त्यावेळी इंग्लिश आणि इतिहास हे दोन विषय शिकवायचे.

१८७० ला ज्या सार्वजनिक सभेची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये सुद्धा रानडे यांचा मोलाचा वाटा होता. दोघांनी मिळून सार्वजनिक सभेची स्थापना केली.

 

ranade2-inmarathi
beaninspirer.com

१८७१ ला भारतीय अर्थशास्त्र या विषयावर त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला होता. भारतातील पहिले अर्थतज्ञ म्हणून न्यायमूर्ती रानडे ओळखले जातात.

प्रगतशील विचारांचे असल्यामुळे मुलींनी शिक्षण घ्यायला पाहिजे या गोष्टीची गरज ओळखून १८८२ मध्ये हुजूर पागा येथे त्यांनी मुलींची शाळा सुद्धा सुरू केली.

१८८५ मध्ये राष्ट्रीय सभेचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच काँग्रेसचे अधिवेशन संपल्यानंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून सामाजिक परिषद भरवण्याची सुद्धा त्यांनी परंपरा सुरू केली. त्यामुळे त्यांना सामाजिक परिषदेचे जनक असेही संबोधले जाते.

राष्ट्रीय सभेची घटना तयार करण्याचा मान सुद्धा रानडेंना मिळाला. असं म्हटलं जातं की इंडियन नॅशनल युनियनला इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव सुद्धा रानडे यांनी सुचवलं होतं.

भारत सरकारच्या अर्थ समितीचे ते सदस्य होते. त्याचबरोबर त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा समावेश व्हावा म्हणून प्रस्ताव मांडला होता.

१८७३ मध्ये जेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झालं त्यावेळी त्यांचं वय ३२ वर्षे होतं. अकरा वर्षीय रमाबाईंशी त्यांनी सातारा येथे लग्न केल्यामुळे त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या  विचार प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्यावेळी धर्मसंस्थेला हे सर्व मान्य नसतानाही त्यांनी या प्रकारचा विवाह केला आणि समाजप्रबोधनाचे शिरोमणी झाले. संत कबीर म्हणतात,

“साधू ऐसा चाहिये जैसा सुभा, सार सार को नही रहे जोड”.

कबीरांच्या ऊक्तीप्रमाणेच रानडे यांचा पुर्ण जीवनक्रम आहे.

आपल्यापेक्षा २१ वर्षांनी लहान मुलीशी वडिलांच्या आग्रहास्तव मी विवाह केल्याचे कारण रानडे यांनी दिले होते. परंतु त्याच्यावरती सुद्धा अतिशय टीका झाली होती.

त्यांनी द राईज ऑफ मराठा पावर हे पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये मराठी सत्तेचा उदय उत्कर्ष इतिहास त्यांनी प्रस्तुत केला आहे.

 

ranade4-inmarathi
abebooks.com

इतिहासकारांनी मराठ्यांचा जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये काही चुका आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी रानडे यांनी हा ग्रंथ लिहिला होता.

त्याचबरोबर इतिहास, शास्त्र, चरित्र यांच्या अभ्यासासाठी त्यांनी मराठी ग्रंथ्योत्तजक मंडळाची स्थापना केली होती.

मराठा साम्राज्यातील नाणी व चलन यावर सुद्धा त्यांनी निबंध लिहिले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी आणि इंग्रज राज्यपद्धती यांच्यावर तुलनात्मक निबंध सुद्धा त्यांनी लिहिला होता.

प्रार्थना समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी, लोकांना पद्धती कळावी, तंत्रे कळावेत, विधी कळावे याकरता त्यांनी अजून महत्त्वाचा ग्रंथ लिहिला होता. त्याचं नाव आहे ईश्वरनिष्ठांची कैफीयत.

रानडेंच्या संबंधित काही संस्था पुढीलप्रमाणे

१. वसंत व्याख्यानमाला,

२. वक्तृत्वोत्तेजक सभा ,

३. औद्योगिक परिषद,

४. नेटिव्ह जनरल लायब्ररी,

५. सार्वजनिक सभा,

६. सामाजिक परिषद ,

७. राष्ट्रीय सभा,

८. असोसिएशन ऑफ इंडिया या सर्व संस्थांच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता.

रानडे यांची लेखन संपदा पण त्यांची खूप चांगली होती. गांधींचे राजकीय गुरू गोपाळ गोखले हे रानडे यांना आपला गुरू मानत असत.

“थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला प्रबोधनाची ऊब देऊन सजीव करणारे पहिले समाज सुधारक” असे गौरवउद्गार लोकमान्य टिळक यांनी रानडेंसाठी वापरले होते.

“सर्व बाजुंनी खुंट्या मारत जाऊन जागा व्यापली पाहिजे सर्वव्यापक असं रानडे यांचं काम होतं आणि हा धडा महाराष्ट्राला देऊन सचेतन स्फूर्ती न्यामुर्ती रानडे दिली” असं साने गुरुजींनी म्हटलं आहे.

त्याच बरोबर हिंदू लोकांच्या बुद्धिमत्तेचं प्रतिक म्हणून सुद्धा त्यामुळे रानडे यांना ओळखलं जायचं. कारण वाढती लोकसंख्या हे भारतीय दारिद्र्याचे खरे कारण ठरेल असे मत मांडणारे पहिले भारतीय न्यायमूर्ती रानडे होते.

 

ranade3-inmarathi
omilights.com

प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया सुद्धा भारतात घातला आहे. आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी संरक्षक जकात होण्याचाही त्यांनी पुरस्कार केला.

अशा प्रकारे रानडे यांनी भरपूर मोठे कार्य आपल्या राजकीय वाटचालीमध्ये केलेल आहे. त्यांचे काही छान मंत्र होते की,

१. जातीयता नष्ट करून त्याची जागा साम्यवादाने घेतली पाहिजे.

२. वैचारिक स्वातंत्र्याचा आपण प्राधान्य दिले पाहिजे .

३. कर्म या कल्पनेचा त्याग केला पाहिजे.

आणि जीवन माया आहे हा विचार सोडून मानवी जीवनात उदात्त भवितव्य आहे हा विचार आपण आंगीकारला पाहीजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?