हिंदू कोड बिल : नेहरू आणि राजेंद्रप्रसाद, ह्यांच्यामधील वादाचा लपवला गेलेला इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दोन्ही नेते काँग्रेसच्या मुशीत वाढलेले. भारत स्वातंत्र्य झाल्यावर भारतीय गणराज्याला आकार देण्याचं कार्य ह्या दोन विभूतींनी केलं.
पण हे सर्व घडत असतानाच्या काळात एक वेळ अशी आली की या दोन नेत्यांमधले संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
त्यांच्यातील तणावाचा मुद्दा होता भारतीय राज्य घटनेतील “हिंदू कोड बिल” आणि धर्माचे समाजातील महत्व!
नेहरू हे पाश्चात्य देशात शिक्षण घेतलेले, आधुनिक समाजवादी विचार असलेले नेते होते. त्यांचा मनात धार्मिकता मुळीच नव्हती. त्यांना धार्मिकता भारतातील बहुतांश समस्याची जननी वाटायची.
त्यांचं स्पष्ट मत होतं की धर्म बाजूला ठेवत प्रत्येक भारतीयाने आता वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. त्यांचा दृष्टीने धर्म ही देशाची दुय्यम गरज असून विकास ही प्राथमिक गरज होती. देशात उद्योग, विकसित शहरं, अत्याधुनिक इस्पितळ यांची देवळापेक्षा जास्त गरज होती.
नेहरूंचा अगदी उलट स्वभाव, विचार आणि दृष्टी, डॉ. राजेंद्रप्रसाद यांची होती, त्यांना भारतीय संस्कृतीवर व तिच्या गौरवशाली परंपरेवर प्रचंड विश्वास होता. त्यांचा मनात लोकांच्या श्रद्धेप्रती आदरभाव होता.
तसेच ते अत्यंत पापभिरू आणि धार्मिक वृत्तीचे होते. जे नेहरूंच्या मुक्त स्वभावाचा प्रचंड विरोधाभासी होतं.
नेहरू आणि राजेंद्रप्रसाद ह्या दोन्ही नेत्यांचा विचार परंपरेच्या अगदी मध्यस्थानी होते सरदार वल्लभभाई पटेल, त्यांचा मनात धर्मनिष्ठा ही होती सोबत आधुनिक कल्पनांना/विचारानाही त्यांनी वाव दिला. त्यामुळे बऱ्याचदा पटेल समन्वयाची भूमिका जोपासत असत.
–
हे ही वाचा – नेहरूंचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन : भाबडा की डोळस
–
डॉ. राजेंद्र प्रसाद आणि नेहरू यांच्यातील वादाची ठिणगी पडली ती “हिंदू कोड बिला”च्या मुद्द्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा ऑक्टोबर १९४७ रोजी संविधान सभे समोर ठेवला, त्या मसुद्याला नेहरूंनी पाठिंबा दिला.
त्यात असलेल्या हिंदू कोड बिलाला देखील नेहरूंनी समर्थन दिलं.
परंतु संविधानसभेचं अध्यक्ष पद भूषवणाऱ्या डॉ राजेंद्र प्रसाद यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. त्यांनी सुचवलं की हिंदू कोड बिलावर जनमत जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी प्रतिवाद करतांना म्हटलं की परंपरा ह्या समाजात रुजलेल्या आहेत, अश्यावेळी हिंदू कोड बिलाला जनतेत स्वीकृती मिळावी यासाठी लोकांनी ते बिल स्वीकृत केलं पाहिजे.
ही चर्चा जशी बाहेर वाऱ्यासारखी पसरली तेव्हा लगेचच परंपरावादी लोकांनी आणि समाजसेवकांनी हिंदू कोड बिलाला विरोध करायला सुरुवात केली. नेहरूंना हिंदू कोड बिलावर निर्माण झालेला वादंग माहिती होता.
परंतु नेहरूंनी त्यावर खंबीरपणे भूमिका घेत हिंदू कोड बिल संसदेत पास व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यासाठी ते सर्व दोष स्वतःच्या माथी मारून घेण्यास देखील तयार झाले.
नेहरूंचा अश्या वागणुकीला चिडलेल्या राजेंद्रप्रसादांनी त्यांना एक पत्र लिहले. त्या पत्रात त्यांनी नेहरूंना अन्यायी व लोकशाहीविरोधी म्हटलं.
प्रसादांनी ते लेटर नेहरूंना पाठवण्या आधी वल्लभभाई पटेलांना दाखवले. पटेलांनी लेटर घेतले आणि राजेंद्रप्रसादाना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांना या ऐवजी बैठकीत त्याविरोधात बोलण्यास सांगितले.
खरंतर पटेलांनी घेतलेली ही भूमिका प्रचंड सामंजस्याची होती. कारण तो सप्टेंबर १९४७ हा महिना होता, तेव्हा संविधानच तयार होणार नव्हतं तर त्यांनंतर लगेचच राष्ट्रपती पदाच्या निवडणूका होत्या. पटेलांची इच्छा होती की राजेंद्रप्रसादांनी भारताचे राष्ट्रपती व्हावं. याउलट नेहरूंना गव्हर्नर राजगोपालचारी ह्या पदासाठी हवे होते.
पटेल आणि प्रसादांचा संघटनेवर चांगला ताबा होता. अगदी नेहरूंपेक्षा जास्त, पण पटेलांना नेहरूंसोबत इलेक्शनआधीच विवाद मंजुर नव्हता.
कारण नेहरू काँग्रेसचा चेहरा होते आणि जनतेतील सर्वात लोकप्रिय नेते देखील होते. पटेलांचा मुत्सद्दीगिरी यशस्वी ठरली आणि राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
२६ जानेवारी १९५० ला राजेंद्रप्रसादांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. संविधान सभा संविधानाच्या पुर्तते बरोबर कामाला लागली. १९५०- ५२ च्या काळात, निवडणूकीआधी हिंदू कोड बिलावर चर्चासत्र सुरूच होते.
या मुद्द्यावरून नेहरू आणि आंबेडकरामध्ये बरेच वाद झाले. हेच नव्हे तर त्या दोघांमध्यें एकमेकांप्रति रागाची भावना निर्माण झाली.
याचं एकटं कारण कोड बिल नव्हतं. डॉ बाबसाहेब आंबेडकर लंडन मधून पीएचडी करून आले होते. संविधान निर्मिती बरोबरच भारताच्या आर्थिक नियोजन समिती मध्ये देखील त्यांना सहभागी व्हायचे होते. परंतू नेहरू त्यांना आर्थिक नियोजन समिती मध्ये सहभागी करण्यास अनुत्सुक होते.
संसदेच्या बाहेर हिंदू कोड बिलावरून वातावरण पेटलं होतं. संत करपत्रीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली धार्मिक गट एकत्र आले होते. त्यांनी हजारो संतासोबत आणि श्रध्दाळूसोबत संसदेवर मोर्चा नेला, पोलिसांनी त्यांना रोखले.
राजेंद्र प्रसादांनी पंतप्रधान नेहरूंना पत्र लिहले आणि संसद देशाला योग्य प्रकारे भूषित करत नाही, असं त्यात म्हटले. पहिल्या निवडणुका झाल्यावर प्रसाद यांनी अजुन एक पत्र लिहून सुचित केलं की जर सरकार हिंदू कोड बिल पास करत असेल तर मग फक्त हिंदूंचा समावेश का ?
प्रत्येक धर्माचा समावेश त्यात करण्यात यावा, सर्वांना समान कायदा आणि समान व्यवस्था असावी. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की डॉ. राजेंद्र प्रसादांना समान नागरी कायदा हवा होता.
परंतु नेहरूंचे यावरील विचार हे धर्मनिरपेक्ष होते. त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याक समुदायाला बहुसंख्यांक हिंदूंच्या तुलनेत काही सुरक्षा अधिकार मिळावे. त्यामुळे त्यांनी राजेंद्र प्रसाद यांचं मत विचारात घेतलं नाही.
प्रसाद यांनी नंतर ह्यात वैयक्तिक सहभाग घेण्याची भूमिका घेतली आणि सांगितलं की जरी हे बिल पास झालं तरी ते त्यावर स्वाक्षरी करणार नाहीत.
ना नेहरू ऐकायला तयार होते, ना राजेंद्रप्रसाद, नेहरूंनी त्यांचा प्रतिक्रिया स्वरूप लिहलेल्या पत्रात म्हटले की बिलाला मोठ्याप्रमाणावर पाठिंबा प्राप्त आहे. ह्या बरोबरच नेहरूंनी संविधान तज्ज्ञांकडून माहिती घेतली. प्रत्येकाने त्यांना सांगितलं की जर संसदेत बहुमताने कोणता ठराव मंजूर होत असेल तर राष्ट्रपती त्याला विरोध करू शकत नाही.
असं असून देखील नेहरूंनी संयमाची भूमिका घेत बिल पास न करता, इलेक्शन संपण्याची वाट बघितली.
हे करण्यामागे नेहरूंचा मुत्सद्दीपणा होता कारण त्यांना काँग्रेसची एकात्मता टिकवायची होती. डॉ आंबेडकरांना नेहरूंनी केलेली ही दिरंगाई पटली नाही. त्यांनी १९५१ साली नेहरूंच्या कॅबिनेटवरून राजीनामा दिला व लोकसभेची तयारी सुरू केली.
त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला ज्याचं नावं होतं “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया”.
–
हे ही वाचा – समाजवादी, साम्यवादी आणि गांधीवादी : नेहरूंनी राजाश्रय देऊन मारलेल्या चळवळी – भाऊ तोरसेकर
–
१९५२ च्या निवडणुकीत, काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं. राजेंद्रप्रसाद पुन्हा एकदा राष्ट्रपती झाले. पहिल्या लोकसभेने १९५५-५६ मध्ये हिंदू कोड बिल पास केलं. त्यात हिंदू विवाह कायदा, हिंदू अल्पसंख्याक कायदा, दत्तक विधान इत्यादी कायद्यांचा समावेश करण्यात आला होता.
डॉ राजेंद्रप्रसाद आणि पंडित नेहरूमधील वितुष्ट संपवण्यात खरा हातभार लावला तो वल्लभभाईच्या सामंजस्याच्या भूमिकेने. त्यांनी जर हा वाद वाढू दिला असता तर याच प्रचंड वाईट परिणाम काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेवर झाला असता.
तसाच परिणाम भारताच्या भविष्यावर पण झाला असता. त्यामुळे पटेलांची भूमिका या वादात महत्वपूर्ण ठरली तसेच नेहरूंनी दाखवलेले धैर्यही उपयोगी पडले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.