चॅटिंग करताना ttyl, IMO, lol – सारखे शॉर्टकट्स वापरा आणि टायपिंगचा त्रास टाळा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आजकालची पिढी सतत मोबाईल मध्ये असते हे तुम्ही आम्ही बरेचदा ऐकतो. ते एका अर्थाने खरेही आहे. कामानिमित्ताने किंवा करमणूक म्हणून सगळेच मोबाईलचा बऱ्यापैकी वापर करतात.
एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी तर मोबाईलचा हमखास वापर होतो. त्यासाठी कॉल, विडीओ कॉल, मेसेज असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. हल्ली सर्रास वापरला जाणारा पर्याय म्हणजे विविध अॅप्स.
व्हाट्स ऍप, इंस्टाग्राम, टेलिग्राम अजून बरेच अॅप्स आहेत ज्यावरून तुम्ही अत्यंत जलद मेसेजेस पाठवू शकता. ते ही मोफत.
जी व्यक्ती हे आधुनिक पर्याय वापरत नाही तिला इतर लोक वेड्यात काढतात. तू काळाच्या मागे आहेस असेही चिडवतात.
त्यामुळे सर्वांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि आपणच मागे पडू नये म्हणूनही जवळपास सगळेच या अॅप्सचा वापर कसा करायचा हे शिकून घेतात.
अगदी आजी आजोबासुद्धा हे सगळे शिकून घेतात. पण कितीही शिकण्याचा प्रयत्न केला, तरीही कधी कधी काही गोष्टी कळत नाहीत. कधीतरी तर समोरचा काय बोलतोय हे ही समजत नाही. आपण या गावाचे नाहीतच अशी भावना होते.
अशी अवस्था बहुदा या अॅप्सवर गप्पा मारताना, मेसेजेस पाठवताना, स्टेटस बघताना सर्वांची होते.
कारण इतके नवनवीन शब्द, त्यांचे शॉर्ट फॉर्म्स वाचायला मिळतात की त्यांचा अर्थ लावणे खूप कठीण होऊन जाते.
काहींचे अर्थ माहिती असतात, काही आपण वापरतो पण त्यांचा लॉन्ग फॉर्म माहिती नसतो आणि काही शब्द तर अगदीच वेगळ्या भाषेतले वाटायला लागतात.
तुमची अशी फजिती होऊ नये म्हणूनच आम्ही काही शब्दांचे अर्थ आणि लॉंग फॉर्म सांगणार आहोत.
- ttyl = Talk To You Later
- lol = Laughing Out Loud
- wtf = What The F**k
- XoXo = Hugs And Kisses
- BTW = By The way
- BRB = Be Right Back
- IDK = I Dont Know
- IMO = In My Opinion
- Rofl = Rolling On Floor Laughing
- PS = Post Script
- 10x = Thanks
- NVM = Never Mind
- OFC = Of Course
आणि …
- J1 Zal Ka = जेवण झालं का?
तुमच्या चॅटिंगच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल अशी आम्हाला खात्री आहे. असेच अजून काही लॉँग फॉर्म्स तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा..
–
- होय! WhatsApp वरचे डिलीट केलेले मेसेज वाचणे सहज शक्य आहे ! कसे? समजून घ्या..
- खिशातला फोन व्हायब्रेट झाल्यासारखं उगाचच वाटतं? सावधान – तुम्हाला “हा” सिन्ड्रोम झालाय!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.