अज्ञात सुबोध भावे: बायकोला रक्ताने लिहिलेलं पत्र ते विदेशी फेस्टिव्हलवर झळकलेलं नाव
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आत्मचरित्रपर चित्रपट असो वा खलनायकाची भुमिका, सुबोध भावे या मराठी कलाकाराची झेप आपण प्रत्येकानीच अनुभवली आहे.
खरंतर गेल्या काही वर्षात सुबोधच्या अभिनय कारकीर्दीने प्रचंड वेग घेतला. नाटक, सिनेमा, मालिका, दिग्दर्शन या सगळ्याच क्षेत्रांत त्याच्या प्रतिभेची प्रचीती प्रेक्षकांना आली आहे.
विनोदी, गंभीर, ऐतिहासिक अशा सर्व भूमिकांमध्ये त्याने आपल्या अभिनय कौशल्याला नेहमीच पणाला लावलेय. त्यामुळेच सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार म्हणून तो ओळखला जातो.
त्याच्यातील बहुगुणी मेहनती कलाकारामुळे त्याच्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसतेय. बालगंधर्व, लोकमान्य-एक युगपुरुष आणि “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” या चित्रपटांमुळे तर सुबोध भावे आणि जीवनपट असे समीकरणच झालेय.
त्याच्या या यशावर सोशल मिडीयावर होणारे विनोद तुम्ही वाचलेच असतील. त्याच्या ‘तुला पाहते रे…’ या मालिकेतील सरांजामेंच्या भूमिकेवर तर तुफान विनोद झाले होते.
तर असा वेगवेगळ्या भूमिकांत पडद्यावर दिसणारा सुबोध भावे आपल्याला माहितीच आहे. पण आज आम्ही त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
१. सुबोध भावे त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला की, त्याच त्याच प्रकारच्या भूमिका करणे मला अतिशय कंटाळवाणे वाटते. कम्फर्ट झोन मधल्या भूमिका करण्याची तर मला खूप भीती वाटते. मला एक कलाकार म्हणून कम्फर्टेबल व्हायला कधीच आवडणार नाही.
मला या क्षेत्रात स्थिर व्हायचे नाहीये. मला इथे सतत शिकत राहायला, आव्हानात्मक भूमिका करत राहायला आवडेल.
२. सुबोध आज जरी यशाच्या शिखरावर असला तरी त्यापूर्वी त्याने अपयशसुद्धा पचवले आहे. सुबोध बारावीत नापास झाला होता.
पण तो म्हणतो की त्यामुळेच त्याची अपयशाबद्दलची भीती मेली. आता आव्हानात्मक गोष्टी करताना अपयशी होण्याची त्याला भिती वाटत नाही.
तो असेही म्हणतो की मी जर तेव्हा पास झालो असतो, तर बीएससी किंवा बीई करून तेच तेच चौकटीतले आयुष्य जगत बसलो असतो. नापास होण्यानेच मला या वेगळ्या मार्गाला आणले.
===
हे ही वाचा – लोकमान्यांची भूमिका करणारे सुबोध भावे घाबरले?! लोकांच्या एकाहून एक तिखट प्रतिक्रिया!
===
३. सुबोधला शाळेत असताना एक मुलगी आवडली होती. तिला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यावर तिनेही सुबोधला होकार दिला. त्यांचे हे प्रेमप्रकरण बरीच वर्षे सुरु राहिले.
त्या काळात सुबोधला सिगारेटचे व्यसन होते. त्याच्या प्रेयसीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसे. असेच एकदा ते भेटले असताना सुबोधने सवयीप्रमाणे सिगारेट पेटवली. हे बघताच त्याची प्रेयसी नाराज होत काहीच न बोलता निघून गेली.
सुबोधला त्याच्या या कृत्याचा खूप पश्चाताप झाला. पुन्हा कधी हे व्यसन करायचे नाही हे त्याने मनाशी पक्के ठरवले. हेच वचन त्याने प्रेयसीलाही दिले. पण अत्यंत फिल्मी स्टाईलने.
त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहून माफी मागितली आणि पुन्हा असे न करण्याचे वचन दिले. सुबोध सांगतो आजही त्याच्या हातावर त्या जखमेच्या खुणा आहेत.
विशेष म्हणजे तीच प्रेयसी त्याची पत्नी सुद्धा आहे. ते अठरा वर्षांपासून आनंदात सोबत आहेत आणि त्यांना दोन गोंडस मुलेही आहेत.
४. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव भरण्यात आला होता. या महोत्सवात सुबोध भावेच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कामाची दखल घेऊन त्याच्या कामाच्या सन्मानार्थ त्याच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग केले गेले.
त्यात बालगंधर्व, लोकमान्य-एक युगपुरुष, कट्यार काळजात घुसली, ती आणि इतर, सविता दामोदर परांजपे या चित्रपटांचा समावेश होता.
५. “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” यातील सुबोधच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरु होती. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सुरुवातीला त्याने या चित्रपटाला नकार दिला होता. तोही एकदम क्षुल्लक कारणावरून.
त्याला पटकथा आवडली होती पण हा जीवनपट असल्याने पात्राचे डोळे वेगळे असणे ही पटकथेची गरज होती. त्यासाठी लेन्सेस वापराव्या लागणार होत्या. पण सुबोधची त्यासाठी अजिबात तयारी नव्हती.
त्याने व्हीएफएएक्स वापरण्याचा सल्ला दिग्दर्शकांना दिला. पण त्या खर्चात अजून दोन नवीन मराठी चित्रपट तयार होऊ शकत होते.
शेवटी काहीच पर्याय नसल्याने बरीच मनधरणी करून, बऱ्याच लोकांच्या सल्ल्यानंतर आणि मदतीनंतर सुबोध हे करायला तयार झाला.
===
हे ही वाचा – सुबोध भावेंच्या सात्विक संतापानंतरही मराठी रंगभूमीवरील परिस्थिती बदलली आहे का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.