देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ ललना, सुंदर पण त्यापेक्षा जास्त खतरनाक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येक देशाची स्वतःची सुसज्ज अशी संरक्षण यंत्रणा असते. जमिनीवरून, पाण्यातून, हवेतून येणाऱ्या कोणत्याही परकीय संकटाचा सामना करण्यासाठी या यंत्रणा कायम तयारीत ठेवल्या जातात. लष्करी सामर्थ्यावर त्या देशाची सुरक्षा अवलंबून असते.
पण सुरक्षा इतकीच मर्यादित नाही. शत्रू देश आपल्या भूमीत कोणत्या कारवाया करण्याच्या तयारीत आहे? शत्रू देशाचे खरे सामर्थ्य किती आहे वगैरे माहिती मिळवणारी यंत्रणा प्रत्येक देशात असते, ती म्हणजे त्या देशाचे गुप्तहेर खाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या खात्याचे महत्व सुरक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे जगातील अनेक देशांच्या गुप्तहेर खात्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. असं का? ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत…
हेरगिरीचं खातं बायकांचंच..!! असं म्हणतात ते काही उगीच नाही बरं, आमच्याकडे मुलाबाळांना लपूनछपून काही करायचं असेल म्हणजे शेजारच्या “काकांची” भीती तशी कधी वाटलीच नसणार.. भीती असते ती शेजारच्या “काकूंची”.
४ बायकांची टोळी कट्ट्यावर असेल तर काय बिशाद कोणी त्यांच्या नजरेतून सुटून जायची.. CCTV च जणू!
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारत नसल्या तरी ओळखीचा माणूस पाहिला की अथपासून इतिपर्यंत माहिती नक्की काढू शकतात. त्यांचे नेटवर्क तर पक्के असतेच असते पण नजर देखील चौफेर असते.
कोण, कधी, कुठे आला, कधी गेला, काय करतो वैगेरे अगदी खडानखडा माहिती बायका सांगू शकतात.
गम्मत अशी की त्यातल्या त्यात बायको चिडलेली असेल तर तिच्यासारखा गुप्तहेर शोधून सापडणार नाही. गळ्यात पडून तुम्हाला प्रश्न विचारून, तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर त्या तुमच्या खरेपणाचा निष्कर्ष काढू शकतात. जोडीदाराच्या अकाउंटचे पासवर्ड माहित असणाऱ्या पण काही कमी नाहीत याहून..
CIA , MOSSAD आणि MI6 च्या मते गुप्तहेर खात्यामध्ये “महिला” या उत्तम गुप्तहेर असतात.
महिला गुप्तहेरांवरील बरेच सिनेमे आपण पहिले असावेत, पण त्यात दाखवतात तसे ‘गुडी गुडी’ सगळं होत नाही. तिथे ती पडद्यावरील नायिका असते पण या गुप्तहेर खऱ्याखुऱ्या आयुष्यातील नायिका असतात.
काळा आणि पांढरा हे दोनच रंग आयुष्यात घेऊन वावरणाऱ्या यांना खाजगी आयुष्य असं काहीच नसतं.
पुरुष हे गॅजेट्स, यंत्र आणि नवीन तंत्रज्ञान वापरून उत्तम हेरगिरी करू शकत असतील पण स्त्रियांकडे आंतरिक संवेदनाग्र असा असतो की त्या सर्वोत्तम हेर म्हणून सिद्ध होतात.
मोठमोठ्या गुप्तहेर संघटनांच्या यादीत खुपश्या महिला गुप्तहेर अश्या आहेत ज्यांनी अतिशय संवेदनशील माहिती जीवाची जोखीम अगदी सहजतेने घेऊन आपापल्या संघटनांना पुरवली आहे.
यात त्या यशस्वी देखील झाल्या आहेत आणि ज्या कोणी पकडल्या गेल्या असतील त्यांनी मरेपर्यंत कोणतीच माहिती फुटू दिली नाही, प्रसंगी खूप हालअपेष्टा सहन केल्या.
जगातील उत्तमोत्तम गुप्तहेर संघटनादेखील अतिशय महत्वाच्या कामगिरीत महिला गुप्तहेरांचा वापर करतात.
महिलांचा ‘खास’ वापर करून एखादी कामगिरी किंवा कारवाई करण्याच्या मिशनला “हनी ट्रॅप” असे म्हणतात. कोळ्यासारखंच जीवघेणं पण मधाळ जाळं टाकून, सावज बरोबर टप्प्यात आल्यावर हवी ती माहिती हस्तगत करून काम फत्ते करण्यात त्यांचा हातखंडा असतो.
स्त्रिया अश्या कामांमध्ये आधीपासून च पारंगत म्हणवल्या जातात. पुरुषांपेक्षा त्या भावनिक नियंत्रणामध्ये खूप भक्कम असतात, त्यांचा कामाचा त्वेष देखील चांगला असून त्या पाहिजे त्या दिशेने अगदी कुठेही बिनबोभाट काम करू शकतात, शेवटी सुपरपॉवर आहे बॉस!
CIA , MOSSAD आणि MI६ यांच्या लिस्टवर देखील महिला गुप्तहेरांचं नाव उल्लेखनीय काम करणाऱ्यांमध्ये वरचढ आहे.
महिला गुप्तहेरांचा इतिहास :
ग्रंथ आणि पुराणांमधील इतिहासामध्येही दाखविले आहे की अप्सरा येऊन मोठमोठ्या ऋषीमुनींचा किंवा राक्षसांचा कावा लक्षात घेऊन त्यांचा डाव उधळून लावत असत. जागतिक इतिहासातही हेरगिरी मधील कामगिरी उल्लेखनीय आहे.
अगदी सुरुवातीपासूनच हेरगिरी यंत्रणांनी कार्यरत राहून बऱ्याच अप्रकट कारवाई करून जगाला वेगवेगळ्या हानींपासून वाचविले आहे.
पण यात आपण बऱ्याचवेळा विसरतो कि या धाडसी योजनांमागे बऱ्याच गुप्तहेर या महिला आहेत. पहिल्या विश्वयुद्धापासून बऱ्याच धाडसी महिला गुप्तहेरांची माहिती आपल्याला वाचायला मिळू शकते, ज्यात त्यांनी केलेली कामगिरी हि त्यांच्या व्यक्तित्वासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडते.
अगदी भारत स्वातंत्र्याच्यावेळी देखील नेताजींच्या महिला बटालियनमधील काही महिला गुप्तहेर म्हणून काम करत होत्या.
–
हे ही वाचा – गुप्तहेर संस्था “रॉ”च्या प्रमुखांचा हा प्रवास सगळ्यांना माहित असायलाच हवा!
–
काही प्रकाशात आलेल्या महिला गुप्तहेर :
तशा तर अनेक महिला गुप्तहेर आहेत आणि होऊन गेल्या आहेत पण काहीवेळा त्यांची ओळख हि कधीच जगासमोर येऊ देत नसल्याने काही ठराविक महिला गुप्तहेरांची माहिती उपलब्ध असते.
१) माता हरी (१८७६-१९१७)
ही एक अतिशय प्रसिद्ध हेर होती जी जन्माने डच असून एक विदेशी नृत्यांगना होती जिचे पडद्यावरील नाव मार्गारिटा होते. अतिशय सुंदर असलेल्या या महिलेचे जागतिक पातळीवरील बड्या लोकांशी ओळख होती. फ्रेंच आणि जर्मन मिलिटरी अधिकारी प्रामुख्याने यात होते.
फ्रांसने तिला १९१७ मध्ये पाठविलेल्या मिशन मध्ये ती पकडली गेली आणि फ्रेंच अधिकाऱ्यांना तिच्या फ्रेंच आणि जर्मन या दुहेरी कामगिरीवर शंका आल्याने तिने जबाब दिल्यानंतरही ती गोळीबारात मारली गेली.
२) नॅन्सी वेक (१९१२-१९४४)
न्यूझीलॅन्ड मध्ये १९१२ मध्ये जन्माला आलेल्या नॅन्सीने तारुण्यात लंडनला भेट दिली आणि नंतर तिने १९३६ मध्ये तिने हेन्री फिओक्का या मार्सेलीस धनाढ्य उद्योगपतीसोबत लग्न केले. जर्मन सैन्याच्या फ्रांसवरील आक्रमणानंतर तिने स्थानिक प्रतिकार गटांच्या सदस्यांना मदत करण्यास सुरुवात केली.
हेर बनलेली नॅन्सी ‘व्हाइट माउस’ म्हणून ओळखली जायची. जेव्हा जर्मन लोकांना याची भनक लागली तेव्हा ती फ्रांसमध्ये निघून गेली.
तिच्यावरती पन्नास लाख फ्रॅंकचं बक्षीस लावले गेले होते. तिच्या या गुप्त अंतर्गत कारकिर्दीत एकदा ती ३०० मैलाचे अंतर सायकलवरती पार करून गेली होती तेही फक्त तिच्या वायरलेस वरील कोड्स बदलण्यासाठी!
एका रेडमध्ये अलार्म वाजविण्यापासून रोखण्यासाठी तिने एस एस सेन्त्रीला स्वतःच्या हातानी यमसदनी धाडले होते. पण तिच्या माघारी तिचा नवरा पकडला जाऊन मारला गेला. नॅन्सीने इंग्लंड मध्ये British Special Operations Executive (SOE) यांना सामील होऊन फ्रेंच प्रतिरोधासाठी कामे करायला सुरुवात केली.
१९४४ ला दुसऱ्या महायुद्धात, पॅराशूटने डी-डेच्या तयारीसाठी नॉरमेंडीवर केलेल्या हल्ल्यात ती ४३० पुरुष आणि ३९ महिलांसोबत सामील होती.
३) नूर इनायत खान (१९१४-१९४४)
१३ सप्टेंबर १९४४ रोजी एक अतिशय सुंदर भारतीय कन्या डच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नाझींकडून मारली गेली. अनन्वित छळून झाल्यानंतर तिच्या डोक्यात गोळी झाडून तिला संपविण्यात आले होते. जर्मन लोक तिला ‘नोरा बेकर’ (ब्रिटिश हेर) या नावानेच ओळखत होते.
पॅरिसमधील पहिली महिला रेडिओ ऑपेरेटर असलेली नूर इनायत ‘डी ग्वेरे’ आणि ‘जॉर्ज क्रॉस’ पुरस्कारांनी सन्मानित झाली. कारकीर्द संपल्यावर पुरस्कार मिळालेल्या फक्त ३ महिलांमधील ती एक आहे.
ब्रिटनमध्ये पुतळा असणारी ती पहिली महिला आणि प्रथम मुस्लिम व्यक्ती आहे. टिपू सुलतानचा वारसा लाभलेल्या तिच्या वडिलांनी म्हणजे हजरत इनायत खान हे एक सुफी उपदेशक आणि संगीतकार होते.
त्यांनी तिला गुप्तहेराचे सर्व शिक्षण दिले, जसे की आत्मरक्षण, हल्ला करणे, नेमबाजी इत्यादी. सर्व प्रशिक्षणानंतर तिला पॅरिसला पाठविण्यात आले. तिथे काम करत असताना तिच्या बाजूच्या बाकी हेरांचे जाळे कमकुवत पडून नष्ट होत होते पण तश्याही परिस्थितीत ती फ्रांस मध्ये ३ महिने राहिली व नंतर पकडली गेली.
तिथे झालेल्या करविला निडरपणे सामोरे जात असताना ती तिच्याबद्दल किंवा कामाबद्दल चकार शब्ददेखील बोलली नाही. तिच्या डोक्यात गोळी झाडत असताना तिने शेवटी फक्त एकच शब्द उच्चारला तो म्हणजे “मुक्ती”.
४) ऍना चॅपमन
अर्थशास्त्रात शिक्षण घेतलेली, १६२ चा IQ असणारी आणि हायक्लास प्रोफाइल मध्ये वावरणारी ही रशियन गुप्तहेर ‘फ्लेम्ड हेयर्ड ब्युटी’ म्हणून ओळखली जाते. २००१ मध्ये ब्रिटिश अॅलेक्स चॅपमनसोबत लग्न करून तिने रशियन-ब्रिटिश पासपोर्ट मिळवला. काही संवेदनशील माहिती ती क्रॅमनिलला पोहचवत असे.
यात २०१० मध्ये तीला FBI कडून अटक झाली. रशियन KGB ऑफिसर असलेल्या वडिलांच्या सांगण्यावर ती पुन्हा परतली.
२०१२ मध्ये असे प्रकाशात आले की तिने हनीट्रॅप ऑपेरेशन मध्ये बराक ओबामांच्या वर्तुळातील कोण्या सदस्याला पकडले होते.
तिला रशियातील सर्वोच्च जासूस म्हणून मेडल देखील प्राप्त आहे.
“एथेल रोसनबर्ग” ही रशियाला आण्विक गुपित पुरविण्याबद्दल युनायटेड स्टेट्स कडून पकडली गेली होती. “जोसेफिन बेकर” या हेर नृत्यांगनेने अदृश्य शाई वापरून तिच्या संगीताच्या पानांवर माहिती चोरून आणली होती.
अशा बऱ्याच धाडसी रणरागिणी आहेत ज्या युध्दात अप्रत्यक्षपणे म्हणजे मैदानावर न उतरता पण शत्रूच्या गोटात घुसून सरळसरळ त्यांचा खात्मा करतात.
ज्या कधीच प्रकाशात आल्या नाहीत किंवा आणल्या गेल्या नाहीत, ज्यांचा पुन्हा कधी पत्ताही लागला नसावा.
काही शत्रूंच्या राष्ट्रांत अडकून पडल्या आणि तिथेच संपल्या. ज्यांना आपल्या देशभक्तीसमोर आपला प्राण अगदीच क्षुल्लक वाटत असावा. आपला सर्वस्व देऊनसुद्द्धा देशाचीच एकनिष्ठ राहणाऱ्या त्यांच्या कर्तुत्वाला आमचा सलाम!
===
हे ही वाचा – देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या रॉ (RAW) बद्दल काही अभिमानास्पद गोष्टी!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.