' मुघलांचा बिर्याणीशी संबंध नाही, याचा शोध लागलाय ‘महाभारत’ काळात, वाचा इतिहास – InMarathi

मुघलांचा बिर्याणीशी संबंध नाही, याचा शोध लागलाय ‘महाभारत’ काळात, वाचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. एखादा छानपैकी लेगपीस असलेली किंवा मटणाचे मऊ लुसलुशीत तुकडे घातलेली बिर्याणी हा अनेक खादाडांचा वीक पॉईंट असतो. मुखावाटे रसनेला तृप्त करत पोटात जाऊन बिर्याणी माणसाला वश करते असं म्हटलं, तरी ते पूर्णपणे चुकीचं ठरणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मुळात मांसाहारी खाद्यपदार्थ असणारी ही बिर्याणी शाकाहारी प्रकारात सुद्धा उपलब्ध होते. शाकाहारी बिर्याणी खाणाऱ्यांची अगदी खिल्ली उडवणारी मंडळी सुद्धा कधी कधी पाहायला मिळतात. “अरे मित्रा ‘व्हेज बिर्याणी’ वगैरे असं काही नसतंच” असं म्हणणारे लोक सुद्धा तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील.

 

difference-between-biryani-pulao-inmarathi02

 

 

बिर्याणीला जोडून एक शब्द अगदी सर्रास ऐकायला मिळतो. तो शब्द म्हणजे ‘मुघल’. ‘बिर्याणी या मुळात मुघलांचा पदार्थ आहे, आणि त्यांच्यामुळेच जगाला बिर्याणीची ओळख झाली आहे’, हेच आपण ऐकलेलं, वाचलेलंअसतं, पण बिर्याणी हा पदार्थ मुघलांचा नसून, तो चक्क एका राजाने शोधून काढलेला आहे. आता या राजाला शेफ म्हणायचं की नाही, किंवा शेफ म्हणायचं असेल तर तो मास्टर शेफ ठरेल की नाही, हे पुढची माहिती वाचून तुम्हीच ठरवा.

बिर्याणी हे खरं नाव नव्हे…

 

biryani and sides inmarathi

 

आज बिर्याणी या नावाने प्रसिद्ध असणारा हा चविष्ट पदार्थ, मुळात वेगळ्याच नावाने ओळखला जात होता. या त्याच्या खऱ्या नावातच, या पदार्थाचा मुघलांशी थेट संबंध नाही, हे स्पष्ट होतं.

बिर्याणीचं मूळ नाव ‘हिंदवी लझीझ’ असं आहे. या शब्दांचा अर्थ शोधायचा झाला, तर तो ‘हिंदवी वारसा’ असा होतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं, तर या खाद्यपदार्थाचा थेट संबंध हिंदुस्थान आणि भारतीयांशी येतो. बिर्याणी हादेखील अरबी किंवा फारसी भाषेतील शब्द नाही.

तांदूळ सुद्धा माहित नव्हता

भारतीय परंपरेत बिर्याणीला मांसोदान असंही म्हटलं जातं. हा पदार्थ मांस, तांदूळ आणि मसाल्यांचा वापर करून बनत असे. थोडं इतिहासात डोकावून पाहिलं, तर पहिला मुघल सम्राट बाबर याच्या संदर्भातील कुठल्याही लिखाणात, कुठेही तांदुळाचा उल्लेखही आढळत नाही.

 

difference-between-biryani-pulao-inmarathi10

 

इतर पिकांबद्दल, धान्यांबद्दल मात्र उल्लेख असल्याचे पुरावे आहेत. मध्य आशियात असणाऱ्या बाबरने तांदुळाचा कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नाही. एवढंच नाही, तर मुघलांची मूळ भूमी असणाऱ्या प्रदेशात. त्याकाळात तांदूळ पिकतही नसे. थोडक्यात काय, तर बिर्याणी या पदार्थाचा मुख्य भाग असणारा तांदूळ आणि मुघल यांचा संबंध सुद्धा तसा नंतरच्या काळातला!

इराणी भाषेतील ‘बिर्णीज’ या शब्दापासून बिर्याणी हा शब्द तयार झाला असल्याचं म्हटलं जातं. ‘बिर्णीज’ हा तांदुळासाठी वापरण्यात येणारा शब्द, प्राचीन इराणी भाषेत मात्र कुठेही आढळून येत नाही. या शब्दाचा जन्म मध्य युगातील इराणी भाषेत झाला असावा, असं पुरावे सांगतात. म्हणजेच बिर्याणी हे नामकरण होण्यासाठी कारणीभूत असलेला शब्द सुद्धा मुघल काळात अस्तित्वात नव्हता.

 

biryani inmarathi

 

पाककलेत कुशल नळ राजा…

महाभारतातील उल्लेखानुसार नळ राजा हा पाककलेत अतिशय निपुण होता. यमाकडून त्याला हे वरदान मिळालं होतं असं म्हटलं जातं. पाकदर्पण या पुस्तकात नळ राजाच्या पाक गुणांचं वर्णन उत्तमरीत्या केलेलं आढळतं. राजा रितुपर्णा याच्याकडे आचारी म्हणून नळाने काम केलं असल्याचं सुद्धा प्राचीन भारतीय साहित्यात लिहून ठेवलेलं आहे.

नळ राजाने लिहिलेल्या पाकदर्पण या पुस्तकात मांसौदन नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे. हेच बिर्याणीचं मूळ रूप ठरतं. तांदूळ उकळून शिजवलेला भात, त्यात चवीसाठी मसाले आणि मांस यांचा समावेश करणं, फुलांच्या मदतीने केलेली उत्तम सजावट असं वर्णन मांसौदन या पदार्थांविषयी केलेलं आहे.

या पदार्थाला उत्तम स्वाद यावा म्हणून कस्तुरी आणि कापूराचा वापर सुद्धा केला गेला असल्याचं नळ राजाने या पाककृतींमध्ये म्हटलं आहे. हा पदार्थ मंद आचेवर शिजत असताना झाकून ठेवण्याचं वर्णन सुद्धा पाहिलं तर एकूणच ही पाककृती म्हणजेच दम बिर्याणी बनवण्याची पद्धत असल्याचं म्हणता येऊ शकतं.

 

 

आता ज्या पाककृतीचं वर्णन नळ राजाने केलं आहे, नळ राजाच्या हस्ते जी पाककृती तयार होत असे, मुघलांचा भारतात प्रवेश होण्याआधीच जी बिर्याणी मांसौदन नावाने मिटक्या मारत खाल्ली जात होती, ती मुघलांची आहे असं म्हणणं कितपत योग्य ठरेल, याविषयी प्रशचिन्ह निर्माण झालं तर ते चुकीचं ठरत नाही? बरोबर ना मंडळी?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?