' वाढत्या वयात “स्मरणशक्ती” शाबूत ठेवायची असेल तर जेवणात या गोष्टींचा समावेश कराच! – InMarathi

वाढत्या वयात “स्मरणशक्ती” शाबूत ठेवायची असेल तर जेवणात या गोष्टींचा समावेश कराच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चांगलं सुदृढ जीवन जगायचं तर तसं चांगलं खायला पण हवे. लहानपणापासूनच जेवताना ताटात वाढलेले सगळे पदार्थ खायची सवय मुलांना लावली तर त्यांच्या आवडी निवडी राहत नाहीत, असं आपण बऱ्याच लोकांकडून आत्तापर्यंत ऐकलंय. पण मोठे होऊन नोकरी किंवा व्यवसाय करायला लागल्यावर आपली लाईफस्टाईल बदलली जाते.

खाण्याच्या लहानपणच्या सवयी बदलून जातात आणि त्याप्रमाणे आपले आरोग्य राखले जाते.

आपले आरोग्य आपण काय खातो कसे खातो, कधी खातो ह्यावर अवलंबून असते. सुरुवातीपासून काळजी घेतली तर वाढणाऱ्या वयात सुद्धा आपण ठणठणीत राहू शकतो.

आता काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं हे समजून घेतले पाहिजे. आपले वय जसजसे वाढत असते त्याप्रमाणे खाण्यापिण्यात थोडे बदल करणे आवश्यक असते.

 

lunch-indi--inmarathi

आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपण आपल्याला वेळ मिळेल तेंव्हा जेवण करतो, कधी जास्त काम असेल त्यावेळी जेवतही नाही. कधी न जेवता काहीतरी किरकोळ खाऊन भूक भागवतो, कधी जेवायच्या ऐवजी फक्त चहाच पितो.

हे सगळं अनिश्चित खाणे पिणे आपल्याला त्रासदायक ठरतं, पण कामाच्या गडबडीत त्याकडे दुर्लक्ष होतं.

म्हणजे ज्यावेळी खायला पाहिजे ते खाल्ले जात नाही, पुरेशी झोप मिळत नाही त्यामुळे ऍसिडिटी, ब्लड प्रेशर सारखे त्रास सुरू होतात पण कामाचा ताण तसाच असतो. ही काळजी आपण घेतली पाहिजे. वेळेवर जेवण, ताण विरहित ८ तास रात्रीची झोप ही घेतलीच पाहिजे.

शरीर अगदी तरुणपणी जेवढे कार्यक्षम असते तेवढे वय वाढत गेल्याने कार्यक्षम राहत नाही. त्याचे कारण ठरते आपली जीवनशैली.

अनेक लोक अनेक कामे एकट्यानेच कमीत कमी वेळात करतात आणि तशी सवय लावून घेतात. अति ताण हा स्मरण शक्तीला मारक ठरतो. इतकी कामे करायची सवय लावून घेतल्याने कधी कधी एकदम मेंदू काही काम करत नाही असे जाणवते. म्हणजे स्मरणशक्ती काही काळापुरती एकदम नाहीशी झाल्यासारखे होते. काहीही आठवतच नाही.

ही स्थिती काही क्षणच असते. पण असे का होते हे कोणी समजून घेत नाही.

 

brain-inmarathi

आपण म्हणतो वय वाढत गेल्याने स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. पण तसं का होतं ह्याच्यावर बरेच संशोधन झाले आहे.

अमेरिकेतल्या शिकागो इथल्या ‘रश मेडिकल कॉलेज च्या न्यूटरिशिन सायन्सच्या प्रोफेसर मार्था क्लेअर मॉरिस यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये आणि संशोधन यामध्ये डिमेनशिया आणि अल्झायमर ह्यावर प्रकाश टाकणाऱ्या फार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या.

ह्या संशोधनात ९६० लोकांचा सहभाग करण्यात आला होता, हा प्रोजेक्ट होता ह्या लोकांच्या स्मरण शक्ती आणि वाढणाऱ्या वयावर.

ह्यातील लोकांचे वय होते ८१ वर्षे आणि ह्यातील एकाही व्यक्तीला डिमेनशिया नव्हता. दर वर्षी ह्या लोकांची एक बॅटरी टेस्ट घेतली जायची त्यांच्या स्मरण शक्तीचे मोजमाप केले जायचे. संशोधक त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयी आणि त्यांची जीवनशैली यांचे रेकॉर्ड ठेवत होते.

सतत ५ वर्षे त्यांच्या ह्या टेस्ट घेतल्या गेल्या, नंतर त्यांचे ५/५ जणांचे गट तयार केले गेले आणि त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सगळया गोष्टींची विभागणी करून तसे गट केले गेले आणि नंतर त्यांच्या स्मरण शक्तीच्या आणि वयामुळे त्यांची शारीरिक क्षमता किती कमी होते आहे ह्याची तपासणी केली गेली.

 

physical-ability-inmarathi

 

आश्चर्य वाटेल असे त्यांचे परिणाम पाहायला मिळाले. जे लोक आपल्या जेवणात भरपूर पालेभाज्या समाविष्ट करत होते त्यांची स्मरणशक्ती अजिबात कमी झाली नाही.

आणि त्या लोकांची शारीरिक क्षमता इतर म्हणजे कधी कधीच किंवा अजिबात पालेभाज्या न खाणाऱ्या लोकांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा चांगली असल्याचे दिसून आले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पालेभाज्या रोज खाणारे लोक तल्लख बुद्धीचे असल्याचे जाणवले. त्यांची शारीरिक क्षमता चांगली राहिली हे त्यांच्या दिवसभर न थकता अनेक कामे सहज करण्यामुळे निश्चित झाले.

भरपूर पालेभाज्या रोज खाण्याने जर आपली स्मरण शक्ती उत्तम राहणार असेल तर निश्चितच अनिश्चित आणि धावपळीची जीवनशैली असलेल्या लोकांनी आपल्या आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे.

त्यामुळे स्मरण शक्तीचा वाढत्या वयात सुद्धा त्रास होणार नाही तसेच कार्यक्षमता सुद्धा तशीच ठेऊन आयुष्य निश्चितच वाढवतात. आणि ह्याच पालेभाज्या आपल्या शरीरातली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात, डोळ्यांचे आजार होत नाहीत.

 

fresh-vegetables-inmarathi

 

मॉरिस ह्या त्यांच्या ओळखीच्या एक व्यक्तीला भेटल्या आणि त्यांनी केलेल्या ह्या संशोधनाच्या निष्कर्षाची हकीकत सांगितली. ती ऐकून त्या ओळखीच्या व्यक्तीनेही रोज एक कप उकडलेल्या किंवा कच्या पालेभाज्या जेवणात वाढ करून खायला सुरुवात केली आणि त्यांनी ही असाच चांगला अनुभव मिळवला.

आज ते पाच कमिटयांचे काम पाहतायत आणि इतके वय असताना देखील एखाद्या तरुणासारखे काम करतात.

म्हणून प्रोफेसर मॉरिस म्हणतात की वाढत्या वयाच्या वेगाला जर नियंत्रित करायचे असेल आणि दीर्घायुषी व्हायचे असेल तर पालेभाज्यांचे प्रमाण आपल्या आहारात वाढवा.

ह्या पालेभाज्या अनेक रोगांना पळवून लावतात आणि हृदय चांगले कार्यरत ठेवतात. अल्झायमर, अथवा डिमेनशिया पासून मुक्तता करतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे . तर मग प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला काय हरकत आहे.

कितीही धावपळ असू द्या, आपल्या जीवनशैलीत लक्षपूर्वक जर आपण बदल केला आणि जर उत्तम स्मरणशक्ती आणि दीर्घ आयुष्य मिळणार असेल तर कोणाला नको आहे?

हिरव्या पालेभाज्या म्हणजे एक वरदानच आहे हे आता आपल्याला खात्रीने कळले आहे. असे सतत संशोधन होत राहो आणि आपले सगळे आजार दूर पळून जावोत अशी प्रार्थना करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?