पोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा! विश्वास बसत नाही? मग हे वाचाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक: मिहीर कुलकर्णी
===
मिड नाइन्टीज म्हणजे साधारणतः १९९५-९६ चा काळ. अमेरिकेतच असणाऱ्या इतर दिवसांसारखाच एक नॉर्मल दिवस. त्या दिवशी सूर्योदय तर झालाच पण त्याच बरोबर अजूनही एका गोष्टीचा उदय झाला, तो नक्की कोणाचा ? याचीच ही कहाणी.
“तुम्ही डीव्हीडी हरवल्यामुळे तुम्हाला फाईन म्हणून ४० डॉलर्स द्यावे लागतील”
आवडता चित्रपट ”अपोलो-१३” या सिनेमाची भाड्याने घेतलेली डीव्हीडी हरवल्यामुळे खिशाला लागलेला चाट एका तरुणाला चांगलाच भारी पडला.
खिशाला पडलेला चाट बरेचदा विचार करायला लावतो. तसा या तरुणाला देखील या गोष्टीने विचार करायला भाग पाडलं. अन त्याने विचारांती एक कल्पना शोधून काढली. ती कल्पना त्याने त्याच्या एका मित्राला ऐकवली.
ती कल्पना होती, पोस्टाने डीव्हीडी रेंटलचा व्यवसाय सुरू करायचा. ज्याला ही कल्पना सुचली त्या तरुणाचं नाव होतं ‘रीड हॅस्टिंग’ आणि त्याने ज्या मित्राला ही कल्पना समजावून सांगितली त्याच नाव होतं ‘मार्क राडोल्फ’.

नॉर्मल डीव्हीडी रेंटलचा व्यवसाय करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करून बघू या कल्पनेने त्यांनी एक डीव्हीडी पोस्टाद्वारे पाठवून बघितली. पोस्टाच्या त्या कव्हर मधून पाठवलेली डीव्हीडी त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचायला जवळपास २४ तासांचा कालावधी लागला.
जेव्हा त्यांनी ते कव्हर उघडून बघितलं तेव्हा ती डीव्हीडी व्यवस्थित होती. अशा तऱ्हेने त्यांनी घेतलेली ट्रायल यशस्वी झाली होती. इथेच उदय झाला होता त्यांच्या “डीव्हीडी रेंटल बाय मेल” या व्यवसायाचा.
स्टोअर्समधून व्यवसाय सुरू करायचा मानस असलेल्या त्यांना त्याकाळी उदयाला येत असलेले इंटरनेट हे माध्यम खुणावू लागलं होतं. त्यामुळे त्यांनी या माध्यमाचाच उपयोग करून व्यवसाय करायचं ठरवलं.
यातूनच २७ ऑगस्ट १९९७ ला जन्म झाला “kibble” या साईटचा. सुरुवातीला प्रत्येक डीव्हीडीसाठी मोजावा लागणारा रेंट असं स्वरूप असणाऱ्या या बिझनेसमध्ये त्यांना काहीतरी बदल करावा असं वाटू लागलं.
–
त्यामुळेच त्यांनी १९९८ पासून “सबस्क्रिप्शन” ची सुरुवात केली आणि यामुळे या साईटला लोकप्रियता तर मिळालीच पण, नंतर याच साईटचं नाव “नेटफ्लिक्स” ठेवण्यात आलं.

पण नेटफ्लिक्सचं आत्ताचं जे रूप आहे ते म्हणजे “व्हिडीओ स्ट्रीमिंग” या बिझनेसमध्ये रूपांतरित व्हायला जवळपास एक दशकाचा काळ लागला. साधारणपणे २००८ पासून नेटफ्लिक्सने व्हिडीओ स्ट्रीमिंग सुरू केलं.
कंपनीचा पूर्वी असलेला बिझनेस म्हणजे डीव्हीडी रेंटल आणि हा व्हिडीओ स्ट्रीमिंग अशा दोन भागात कंपनीच्या व्यवसायाचं विभाजन झालं.
नेटफ्लिक्सला कधीच आर्थिक फटका वगैरे बसलाच नाही असं झालं का?
तर नाही! व्यवसाय म्हणलं की त्यात चढउतार आलेच. नेटफ्लिक्सला असाच चढउतारांचा सामना करावा लागला. कंपनीने डीव्हीडी रेंटल व्यवसायचा व्यवसाय Qwikster नावाच्या दुसऱ्या साईटच्या नावाने सूरु केला अन नवे सबस्क्रिप्शन आणि रेंटल प्लॅन्स लाँच केले.
–
- टीव्ही रिमोटच्या शोधामागची अफलातून आश्चर्यजनक सत्यकथा…!
- टोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो?
–
हा निर्णय कंपनीसाठी चुकीचा ठरला. नेटफ्लिक्सला प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला. कारण लोकांनी या साईटकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. २०१२ पर्यंत जवळपास ८ लाखापेक्षा जास्त लोकांनी सबस्क्रिप्शन पासून पाठ फिरवली.
या गोष्टीतून नेटफ्लिक्सने धडा गिरवत डीव्हीडी रेंटल हा बिझनेस बंद करून, व्हिडीओ स्ट्रीमिंगवर लक्ष केंद्रित केलं.
त्यांनी स्ट्रीमिंगसाठी सर्वसामान्य लोकांना परवडतील असे प्लॅन्स आणून पुन्हा एकदा कंपनीची लोकप्रियता वाढवली. आजही नेटफ्लिक्सचे बेसिक प्लॅन्स हे ८ डॉलर्स पासून सुरू होतात.
हा निर्णय मात्र नेटफ्लिक्सला खूपच फायदेशीर ठरला. तो इतका की, आज कंपनीचे १३० मिलियनपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स आहेत. नेटफ्लिक्स सध्या १९० पेक्षा जास्त देशात त्यांचा व्यवसाय करतेय.
नेटफ्लिक्सने २०१३ पासून एक नवीन गोष्ट सुरू केली. अन ती तुफान लोकप्रिय झाली. ती म्हणजे नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज. २०१३ साली “हाऊस ऑफ कार्ड्स” पासून नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज हा प्रकार सुरू झाला.

अन त्यानंतर नेटफ्लिक्सने ओरिजिनल फिल्म्स हा प्रकार सुद्धा सुरू केला तो ही हळूहळू लोकप्रिय होतोय .
नेटफ्लिक्सच्या या यशामागे कोणत्या गोष्टीचा मोठा भाग असेल तर ती गोष्ट म्हणजे त्यांनी केलेल्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास.
आपल्याला आवडणारी फिल्म किंवा सिरीज आपल्याला घरबसल्या हाय डेफिनेशन क्वालिटी मध्ये मोबाईल किंवा लॅपटॉप आणि आता स्मार्ट टीव्हीवर बघायला मिळत असेल, अन ते ही बऱ्यापैकी कमी दरात तर, लोक पैसे खर्च करायला कचरत नाहीत.
नेमक्या याच मानसिकतेचा अभ्यास करून नेटफ्लिक्स लोकांना काय आवडतं याचा अभ्यास करून ते देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच ते आज एवढया मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकतात.
नेटफ्लिक्स त्यांचे प्लॅन डिझाइन करतानाही एक मजेशीर सायकॉलॉजी वापरते. ती म्हणजे ते कधीच एकदम दर वाढवत नाहीत. ज्या देशात ते व्यवसाय करायला उतरतात ते तिथले दर सुरुवातीचे १६ ते १८ महिने वाढवत नाहीत.
त्यानंतर सुद्धा ते नाममात्र वाढवत जातात. त्यामुळे लोक त्यांना सोडचिठ्ठी देत नाहीत. हे नेटफ्लिक्स त्यांना आलेल्या पूर्वाश्रमीच्या अनुभवातून शिकली असं म्हणायला हरकत नाही.
तर अशा तऱ्हेने नेटफ्लिक्स या डीव्हीडी रेंटल या छोट्याशा व्यवसायातून सुरू झालेल्या साईटचा आज खऱ्या अर्थाने झालेला वटवृक्ष चांगलाच बहरत चाललाय. तो निश्चितच या गोष्टींचं भविष्य असेल यात शंका नाही..
–
- कॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची!
- संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका! मनावर वाईट संस्कार होतील
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.