भारतातून “जात” जात का नाहीये? वाचा ही ८ तर्कनिष्ठ कारणं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगण्याची रीत म्हणजेच धर्म. धर्म ही एक जीवन जगण्याची संकल्पना आहे. आपण कसे असावे, काय करावे, कसे वागावे, काय खावे अशा अनेक गोष्टी आपण धर्माच्या आधारे शिकतो आणि आचरणात आणतो. भारतात वेगवेगळ्या धर्माची माणसे राहतात. म्हणजे आपलं आयुष्य जगण्याची कला त्यांच्या धर्माकडून मिळते.
भारतातील खूप जुना किंबहुना पहिला धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म. सनातन किंवा वैदिक असेही त्यास संबोधले जाते. वेद शास्त्रे, पुराणे, आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेच्या शिकवणी नुसार आचरण करणारे ते हिंदू.
लोकांच्या राहणीमानानुसार आणि कर्मानुसार हिंदू धर्मातील लोकांमध्ये वेगवेगळे समाज बनत गेले आणि जातीत विभागले गेले.
हळू हळू आपापल्या शक्ती आणि अहंभावानुसार जाती पातीत उच्च नीच भेदाभेद सुरू झाले. जातींचे नंतर एवढे अवडंबर माजवले गेले की आपण सगळे एकाच धर्माचे म्हणजेच हिंदू आहोत हेही विस्मरणात गेले.
पुढे खूप क्रांती झाली. नेते, समाज प्रमुख पुढे आले. त्यांनी आपापल्या समाजाला अंधःकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्यास मदत केली. समान हक्क दिले गेले. जाती पातीतील भेद कमी करण्याच्या दृष्टीने सगळ्याच समाजातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी मोठी पाऊले उचलली.
आता २१व्या शतकात रोजच्या जीवनात आपण कोणत्या जातीच्या माणसासोबत आहोत हे देखील आपल्याला कळत नाही किंवा कळून घ्यायची गरज पडत नाही. मित्रपरिवार ‘जात’ बघून बनवला जात नाही. ऑफिस मध्ये धंद्याच्या ठिकाणी व्यवहार जातीविरहित असतात. तरी देखील जाती-जातीतील द्वेष मधून अधून उफाळून येताना आपण पाहतो.
आपापल्या कामात सगळे मग्न असताना अचानक कोणाचा तरी जातीच्या नावाखाली छळ होतो. विरोधी जातीच्या लोकांत भांडणे होतात. विकोपाला जातात आणि एकमेकांचे खून पाडले जातात. अशा बातम्या मनाला विषण्ण करून सोडतात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
सगळं जग जवळ येत असतानाही अजूनही ह्या जाती का बरं जात नाहीत? २००० वर्षांपासून का अजून ही जाती-जातीत द्वेष भावना पाळली जाते? जातींचा उल्लेख टाळणे का गरजेचं वाटू लागलंय? त्याला काही तर्क निष्ठ कारणे आहेत.
१. भारत हा लहान लहान खेडोपाड्यांचा देश आहे. इथे अजूनही खूप माणसे लहान लहान गावांमध्ये वस्तीला आहेत. खेड्यांची शहरे झालेली नाहीत. मोठी शहरे सुद्धा कमीच आहेत. भारताची ६०% जनता ही खेडवळ आहे आणि ३०% च शहरी. चीन सारख्या देशांमध्ये शहरात ६०% लोक राहतात. त्यामुळे त्यांच्याकडे संकुचित विचारधारेला थारा नसतो.
भारतीय शहरांमध्ये ही जाती-पातीची संकल्पना मागे पडू लागली आहे. पण त्यामानाने गावे खूप असल्याने तिथे अजूनही लोक जातींना धरून बसल्याचे दिसते.
‘त्यातून शहरी लोकांची बरोबरी न करणे हे गावातील लोकांच्या स्वाभिमानाची बाब असल्याने शहरी लोकांप्रमाणे जाती-पाती न पाळणे हे अतिशय मूर्ख पणाचे लक्षण मानणारे महाभाग गावांत आढळतात.’
२. अजूनही स्त्रियांना परुषांबरोबरी चा मान न देणे हे दुसरे मुख्य कारण आहे. स्त्रिया जाती-पातीतील अंतर संपवण्याचे मोठे काम करू शकतात. शहरी भागात आपण पाहिले तर स्वतंत्र विचारांच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्रिया जातीची बंधने झुगारून एक माणूस म्हणून जगताना दिसतात. अशा स्त्रिया आंतरजातीय विवाहाला देखिल मान्यता देतात.
खेडोपाडीच्या स्त्रियांना अजूनही उंबरठ्याच्या आत राहण्यास भाग पाडले जाते. चूल आणि मूल इतकंच त्यांचे कार्यक्षेत्र ठरवले जाते. अजूनही स्त्रीशिक्षणास १००% महत्व प्राप्त झालेले नाहीये.
अजूनही त्यांचे विवाह दुसऱ्यां च्या मर्जीनुसार जात पात पाहूनच करवले जातात. अशा वेळी जाती पद्धत आणखीनच दृढ होण्याचा धोका असतो.
३. राहणीमान, संस्कृती आणि खाद्य परंपरा ह्या वरून देखील एखाद्याची जात समजते.
तिखट जहाल पदार्थ, मांसाहार, गुळचट गोड पदार्थ, मत्स्याहार, मसाले, इतर बऱ्याच गोष्टी माणसाची जात दर्शवतात. कोण कसे राहतो, काय बोलतो, त्यांच्या घरात कशा पद्धतीचे राहणीमान असते, कशा पद्धतीचे रीती रिवाज पाळले जातात हे देखील जातिदर्शक आहे.
ह्या मध्ये एखादा सुवर्णमध्य काढला पाहिजे जेणे करून सगळी माणसे समान पद्धतीने परंपरा जोपासतील. किंवा जरी सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील तरी एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांच्या परंपरांचा मान राखतील.
४. सगळ्यात नाजूक विषय म्हणजे आरक्षण.
सध्या हा विषय किती गाजतो आहे आपण अनुभवत आहोत. आरक्षण हे दुर्लक्षित किंवा ज्यांच्या पर्यंत जीवन जगण्याच्या अत्यंत प्राथमिक गरजा देखील पोहोचलेल्या नाहीत ह्यांच्या साठी वरदान ठरते. ‘आरक्षण’ आपल्या लोकांना वर काढून त्यांना समाजातील इतर घटकांच्या समान वागणूक मिळवण्यास कामी येते.
पण आरक्षणाचा लाभ घेऊन नंतर आपणच त्याचे फायदे पिढ्यानपिढ्या घेत राहण्यापेक्षा खरच परिस्थितीने गांजलेल्याना, प्रवाहात आणण्याच्या मार्गी लावणारे किती जण आहेत? आरक्षणाचा फायदा मिळून त्यातील ‘क्रिमी लेयर’ लाच अजूनही फायदा मिळतो आहे आणि खचलेले, गांजलेले अजूनही खोलात जात आहेत.
आरक्षणाचा लाभ घेण्याचा लोभ निर्माण होऊ लागला आहे.
एकाच समाजाला फायदे मिळत राहिल्याने दुसरे समाज वंचित होत चालले आहेत आणि ह्यामुळे अजूनच जाती द्वेष पसरतो आहे. माणुसकी च्या दृष्टीने, आरक्षणातून हतबल लोकांनाच त्याचा फायदा मिळेल असे मार्ग सुनिश्चित करण्यास लोकांनीच स्वखुशीने हातभार लावला पाहीजे.
–
हे ही वाचा – जातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय?
–
५. राजकारणाचा उच्चवर्णीयांना फारसा काही लाभ झालेला नसला तरी दलित बांधवांना सरकारी गोष्टींचा लाभ मिळाला पण त्यातूनही काही दलित नेत्यांनी आपल्याच माणसांना मिळणाऱ्या लाभतील मोठ्ठा वाटा स्वतःच खाऊन टाकला.
जसे मायावतीना मिळालेल्या मायेतून दलित बांधवांसाठी कित्येक उपयुक्त संस्था उभारता आल्या असत्या. पण त्यांनी हत्तीचे पुतळे उभारण्याला महत्व दिले. आणि लोकांना जातीपातीच्या नावाखाली पेटवून लढवून दिले.
अशी बरीच उदाहरणे आहेत. ज्यात जातीय पुढाऱ्यांनी स्वतःच सगळा मेवा खाल्ला आणि आपल्या जातीय बांधवांना उपाशी मारले.
महाराष्ट्रातील शिक्षण संस्था, साखर कारखाने हे देखील त्याचेच उदाहरण आहे. ह्या संस्था आपल्याच जाती बांधवांसाठी खुल्या करण्यात आल्या नाहीत. हे आपण सगळे जाणतच आहोत.
६. इतर देशात काळा गोरा हा वर्णभेद पूर्णपणे झुगारून देत संपुष्टात आणला गेला. त्याच प्रमाणे जात न मानता आपण जातीभेद हद्दपार करू शकतो. पण जनमानसात ही बाब रुजली नाहीये. जात हद्दपार करताना जाती जातीत होणारा भेदाभेद थांबवावा लागतो.
पण इथे अशा कामासाठी कोणीच पुढाकार घेत नाही.
किंबहुना दुसऱ्या जाती बद्दल जुना इतिहास खरवडून काढून, मनामनात द्वेष पेरून, हाताला काम नसणाऱ्या तरुणांना पेटवले जाते आणि जातीय दंगली घडवून आणून जातिनिष्ठेला अजून कुरवाळले जाते.
७. धर्माच्या ही पुढे जातीला ठेवले जाते. हिंदू म्हणून त्याही उप्पर भारतीय म्हणून आपण सगळे एक आहोत ही भावना रुजवण्याची वेळ आलीये. पण लोकांनी आपापल्या जातीचा ठेका घेतल्यामुळे त्याच्या पुढे सगळे दुय्यम ठरवले जात आहे.
८. इतिहास हा बदला घेण्यासाठी नसून धडा घेण्यासाठी असतो.
इतिहासातील काही चुकांमुळे एकाच जातीच्या लोकांना कायम दोषी ठरवून, त्यांना ही वागणूक देऊन, त्यांच्यावर हल्ले करणे कितपत योग्य आहे? आता कोणी तेच इतिहासातले वर्तन करताना दिसते का? २१ व्या शतकात असताना आपण २००० वर्षे मागे जायचे आणि दुसऱ्या जातीतील लोकांची उणीदुणी काढायची ह्यापेक्षा बरीच महत्वाची कामे आहेत.
आणि ती केली गेल्यास आपले आणि पुढील पिढ्यांचे भले होणार आहे हे सुज्ञास सांगणे न लगे..!
–
हे ही वाचा – भारतीय सेनेत जातीनिहाय आरक्षण का दिले जात नाही? जाणून घ्या..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.