डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
समाजव्यवस्थेने ज्यांना नाकारले त्यांना संघटीत करून जगण्याचा नवा मार्ग दाखवणारा महामानव आपल्या भारताच्या नशिबी आला हेच आपले सौभाग्य!
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच आयुष्य आजही जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे विचार आजही लाखो लोकांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवतात.
अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आजही कित्येक लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया, त्यांच्या जीनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना:
घटना १ – १४ एप्रिल १८९१ :
मध्यप्रदेश राज्यातील इंदोर जिल्ह्यामध्ये महू या गावी एका गरीब कुटुंबात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ते १४ वे अपत्य म्हणून जन्माला आले.
घटना २ – १९०१-१९०४ :
हिंदू-महार जातीतील असल्याकारणाने एक अस्पृश्य म्हणून त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला. ते ज्या शाळेत जात तेथील पाणी देखील पिण्यास त्यांना मनाई होती.
त्यांना वर्गात देखील इतर उच्च जातीच्या मुलांबरोबर बसण्याची परवानगी नव्हती. जी वागणूक इतर अस्पृश्यांना मिळायची, तीच वागणूक बाबासाहेब आंबेडकर निमुटपणे सहन करत होते आणि याचवेळेस त्यांच्या मनात विचारांचे युद्ध सुरु झाले.
घटना ३ – ८ जून १९२७ :
विदेशात जाऊन इकोनॉमिक्स मध्ये पी.एच.डी. मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर पहिलेच भारतीय ठरले. त्यांनी न्युयोर्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून ही पदवी प्राप्त केली होती.
घटना ४ – १५ ऑगस्ट १९४७ :
नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने कायदे मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केली.
त्या विनंतीला मान देत भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पद स्वीकारले.
घटना ५ – २९ ऑगस्ट १९४७ :
संविधान निर्मिती समितीचे चेअरमन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यात त्यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले, म्हणून त्यांना ‘भारतीय संविधानाचे पिता’ म्हणून ओळखले जाते.
घटना ६ – १ एप्रिल १९३५ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “The Problem of the Rupee – Its origin and its solution” पुस्तकाच्या आधारावर रिझर्व बँक ऑफ इंडिया उभारण्याची संकल्पना सादर करण्यात आली.
घटना ७ – १४ ऑक्टोंबर १९५६ :
अखेर नागपूर येथे आपल्या पत्नीसमवेत आणि ५,००,००० अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.
घटना ८ – ६ डिसेंबर १९५६ :
आजाराने ग्रस्त असणाऱ्या आंबेडकर यांचा दिल्ली येथे राहत्या घरी झोपेत असताना मृत्य झाला आणि दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इनमराठीतर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.