दारू प्यायल्यानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक का दिसतं? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आधुनिकीकरण जेवढं वाढत चाललं आहे त्यासोबतच लोकांची वागणुक देखील बदलायला लागली आहे. म्हणजे आता विकएंड हे एक नवीन फॅड आलं आहे. म्हणजे शनिवार आणि रविवारची सुट्टी असली की ती पार्टी करण्यातच जाते.
आणि पार्टी म्हटलं की दारू ही आलीच. तशी तर मद्यपान करण्याची ही परंपरा पूर्वापारपासून चालत आली आहे.
ह्याचे अनेक वाईट परिणाम देखील आहेत. पण तरी देखील मद्यपान करणे ही अनेकांची आवड असते.
पण मद्यपान केल्यानंतर डोळ्यांसमोर अंधार हा येतो…?
ह्याचा कधी विचार केला आहे का?
मद्यपानाचा तुमच्या दृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. हा परिणाम काही वेळासाठीही असू शकतो तसेच दीर्घकाळासाठी देखील होऊ शकतो.
रोज खूप जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमची दृष्टी नेहमी करिता जाऊ शकते. तसेच कधी-कधी मद्यपान केल्याने देखील तुमच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
काही काळासाठी होणाऱ्या परिणामांमध्ये अंधुक दिसणे, दुप्पट दिसणे, डोळे सुकणे, डोळे खाजणे, माइग्रेन इत्यादी समस्या उद्भवतात. हे सर्व परिणाम अल्पकालीन असतात. त्यामुळे ते काहीच तासांत निघून जातात. दीर्घकाळासाठी कुठलाही परिणाम होत नाही.
तर खूप मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे, ह्याचा आपल्या दृष्टीवर खूप वाईट तसेच दीर्घकालीन परिणाम होतो. ह्यामुळे वयासंबंधी मॅक्यूलर डीजनरेशन होण्याची शक्यता वाढून जाते.
पण हे जास्तकरून वृद्ध लोकांमध्ये होते. वृद्ध व्यक्ती जर अति प्रमाणात मद्यपान करत असेल तर तिला ह्या समस्येला सामोरे जावे लागते.
मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने मोतीबिंदू आणि ऑप्टिक न्युरोपॅथीचा धोका तसेच दृष्टीहीन होण्याचा धोका संभवतो. ह्यामुळे आपण पुरेश्या प्रमाणात जीवनसत्वे शोषून घेऊ शकत नाही. ज्याचा परिणाम दृष्टीवर होतो.
जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे रातांधळेपण येऊ शकते. तसेच डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा पातळ होत जाणे इत्यादी समस्या सुद्धा संभवू शकतात.
–
एवढंच नाही तर गर्भवती महिला जी मोठ्या प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याचा होणाऱ्या बाळाच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.
जे लोक कधी कधी मद्यपान करतात त्यांना देखील अंधुक दृष्टीच्या समस्येचा सामना करावा लागतो.
बघण्याच्या ह्या प्रक्रियेत डोळे आणि मेंदू ह्यांचा संयोग घातला जातो. म्हणजे आपले डोळे जे बघतात त्याचा एक फोटो मेंदूला पाठवला जातो. त्यानंतर मेंदू आपल्याला त्या संबधीचे संकेत पाठवतो. त्यामुळे आपल्या डोळ्यात आणि मेंदूमध्ये हे संतुलन राखणे खूप गरजेचे असते.
तसेच मद्यपानाचा तुमच्या डोळ्यातील बुबुळांच्या स्नायूंवर देखील वाईट परिणाम होतो.
हे स्नायू आपल्या डोळ्यातील लेन्सच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून असतात, ज्यामुळे आपण एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करून शकतो. पण ह्या स्नायूंवर परिणाम झाल्याने आपल्याला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला अंधुक दिसू लागते.
मद्यपानाचा निव्वळ आपल्या दृष्टीवरच नाही तर संपूर्ण शरीरावर अतिशय विपरीत असा परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान न करणे हेच कधीही चांगले; पण तरी देखील मद्यपान करतच असाल तर, काही मर्यादा ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहेत.
कारण किती प्रमाणात मद्यपान केल्याने आपल्या शरीरावर किती परिणाम होऊ शकतो हे सांगता येत नाही. ते त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
स्त्रियांनी थोड्याफार प्रमाणात केलेल्या मद्यपानाचा देखील खूप परिणाम होऊ शकतो. वयानुसार देखील ह्याचे वेगवेगळे परिणाम बघायला मिळतात.
सामान्य मद्यपानामुळे होणारे परिणाम तसे तर तेवढे काही हानिकारक नाहीत. पण जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ह्याचे अतिशय वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.
कधी काळी मद्यपान करणे हे शरीरासाठी तेवढे नुकसानदायक नसले तरी त्याचे अति सेवन तुमच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे तुमच्या दृष्टीवरच नाही तर शरीराच्या इतर अवयवांवर देखील ह्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान न करणे हे कधीही शहाणपणाचे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.