ही १० ‘हास्यास्पद’ भाकितं कधीच प्रत्यक्षात आली नाहीत, येण्याची शक्यताही नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगात अनेक असे लोक आहेत जे असा दावा करतात की ते भविष्य बघू शकतात, सांगू शकतात. जसे की प्रसिद्ध नास्त्रेदमस. भविष्य भाकिते सांगणे हे आपल्या समाजात आणि जगात पूर्वीपासून चालत आलेले आहे.
आणि आपण डोळे झाकून त्यावर विश्वासही करतो. त्यापैकी काही भविष्य भाकिते खरी देखील ठरतात.
पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भविष्य भाकीत हे खरंच असेल, किंवा तसंच घडेलच.
पण हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा काहीही त्या भविष्य भाकिताप्रमाणे घडत नाही. शेवटी वेळ आली की सर्वांचच पितळ उघड पडतं.
अशीच काही भविष्य भाकिते खूप काळाआधी की महान व्यक्तींकडून करण्यात आली होती जी आजवर खरी ठरलेली नाही.
१. Papal Inquisition to Galileo, १६३३ :
Papal Inquisition to Galileo अशी भविष्यवाणी केली होती की, “पृथ्वी ही जगाचा केंद्र नाही आणि तसेच ती अचल आहे पण ती हलते देखील, तेही एका दैनंदिन गतीसह हे हास्यास्पद आणि तेवढेच दार्शनिक आणि थिओलॉजिकली खोटे आहे.
पृथ्वी हलते हे कधीही सिद्ध होऊ शकणार नाही.” त्यांचे हे भविष्य भाकीत खोटे ठरले होते.
२. १९०७ Nobel Prize winner Albert Abraham Michelson, १८९० :
अल्बर्ट मिचेल्सन ह्यांनी हे भविष्य भाकीत केलं होतं की,
“भौतिक विज्ञानातील सर्वात महत्त्वाचे मूलभूत नियम आणि तथ्य सर्व शोधले गेले आहेत आणि ठामपणे स्थापितही करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कुठलाही नवीन शोध लागणे अशक्य आहे.”
पण ह्यानंतर भौतिक विज्ञानाबाबत अनेक शोध लागले.
३. Astronomer Richard Wooley, १९५६ :
रिचर्ड वूली ह्यांनी असं म्हटलं होतं की, “अंतराळ प्रवास हे केवळ मूर्खपणाचं लक्षण आहे, ते कधीही शक्य होऊ शकत नाही.”
हे भाकीत चुकीच ठरलं आणि आज अंतराळ प्रवासच नाही तर इतर ग्रहांवर जीवन शोधण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
तसंच मंगळावर तर वास्तव्यास राहण्यासाठीची तयारी नासाने सुरु केली आहे.
४. Ernest Rutherford, १९३४ :
अर्नेस्ट रुदरफोर्ड ह्यांनी असं भविष्य भाकीत केलं होतं की, “जो अणूंच्या रूपांतरातून कुठल्याही प्रकारच्या शक्तीच्या स्त्रोताची अपेक्षा करतो तो नक्कीच मूर्ख असेल.”
हे भाकीत अगदी चूक ठरलं. विज्ञानाच्या संशोधनाने या भाकीतावर मात केली, आणि अणुरेणुंच्या प्रयोगांचं सुत्र तर आपल्यालाही माहित आहे.
५. J.B.S.Haldane, १९४३ :
“मेडिकल अप्लिकेशन ऑफ रेडीएशन हे लवकरच प्रोफेशनल्सच्या हातातून काढून घेतल्या जाईल. डॉक्टर्स फक्त प्रीस्क्रीप्शन लिहून देतील त्यानंतर तुम्हाला रेडीओलॉजीस्टकडे जाऊन रेडीएषन ट्रीटमेंट घ्यावी लागेल. कारण रेडिएशन हाच सर्व आजारांवरील अंतिम उपचार असेल.”
हे भाकीतही चुकीचं ठरलं. वैद्यकीय शस्त्रातील होणारी प्रगती लक्षात घेता हे विधान किती चुकीचं आहे हे वेगळं सांगायला नको.
६. Winston Churchill, १९३९ :
“अॅटोमिक एनर्जी ही जरी आजसाठी स्फोटक द्रव्य म्हणून असली तरी यापासून कधीही आणखी काही धोकादायक तयार केले जाऊ शकत नाही.” ही भाकीत किती चुकीची ठरली ह्याचे आपण सर्वच साक्षी आहोत.
७. Heinrich Hertz, १८८७ :
“मी शोधलेल्या रेडिओ वेव्जचा काहीही उपयोग होऊ शकत नाही.” पण आज ह्या रेडीओ वेव्जचा किती आणि कसा उपयोग होतो आहे हे कुणालाही सांगायची गरज नाही.
८. Alfred-Armand-Louis-Marie Velpeau, १८३९ :
“सर्जिकल ऑपरेशनमध्ये वेदनेपासून सुटका होणे ही निव्वळ एक कल्पना आहे. चाकू आणि वेदना ही अशी दोन शब्दे आहेत जी माणसाच्या डोक्यात नेहमी राहतीलच.” हे भाकीतही खोटं ठरलं. आज अॅनेस्थेशियाच्या मदतीने जगात कितीतरी मोठमोठाली सर्जिकल ऑपरेशन होतात.
९. William Thompson, lord Kelvin, १८९५ :
“हे तथाकथित क्ष-किरण केवळ एक मुद्दाम केलेली लबाडी आहे.” पण आज ह्या क्ष-किरणांचे मेडिकल फिल्डमध्ये किती महत्व आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
१०. Charlie Chaplin, १९१६ :
चार्ली चाप्लीन ह्यांनी असे म्हटले होते की,
“सिनेमा हे एका फॅडपेक्षा जरा जास्त आहे. हे कॅन्ड नाटक आहे. खरे पाहता प्रेक्षकांना स्टेजवर निव्वळ देह आणि रक्त पहायचे आहे.”
पण आज सिनेमा काय आहे हे आता कोणाला सांगायची गरज नाही. आणि लोकांना स्टेजवर निव्वळ रक्त आणि देहच नाही तर आणखी बरंच काही बघायला आवडत. त्यामुळे चाप्लीन ह्यांचे हे भविष्य भाकीत देखील कधीच प्रत्यक्ष रूप घेऊ शकलं नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.