' अस्सल ‘भारतीय’ म्हणून ओळखले जाणारे हे ९ पदार्थ आहेत चक्क परदेशी! – InMarathi

अस्सल ‘भारतीय’ म्हणून ओळखले जाणारे हे ९ पदार्थ आहेत चक्क परदेशी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रत्येक देशाची त्याची अशी स्वतःची वेगळी ओळख असते आणि त्यात एक मोठा वाटा हा तिथल्या जेवणाचा असतो. प्रत्येक ठिकाणचा प्रत्येकाचा एक खास पदार्थ असतो, जो त्या ठिकाणाची ओळख बनून जातो. आणि मग तो जगभर प्रसिद्ध होतो. तस काहीसं आहे आपलं भारतीय जेवण.

आपल्या भारतात अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात, प्रत्येक पदार्थाची आपली अशी एक वेगळी ओळख आहे.

आपण कितीही इटालियन, चायनीज खाल्ल तरी देखील आपलं भारतीय जेवण ह्यातच आपल्याला खरा आनंद मिळतो.

 

archana kitchen inmarathi

 

आपण ज्याला भारतीय जेवण, भारतीय पदार्थ म्हणून त्याचे कौतुक करतो, त्यापैकी काही असे पदार्थ देखील आहेत जे भारतीय नाही तर विदेशी आहे.

ह्यात काही अश्या पदार्थांचा देखील समावेश आहे जे आपण रोजच्या जेवणात वापरतो…!

 

मिरची :

 

chilli-inmarathi

 

आपण बाजारात भाजी आणायला गेलो की भाजीवल्याला हटकून थोडीशी मिरची आणि मसाला जास्त द्यायला सांगतो, त्यामुळे आपल्या देशात मिरच्या खाण्याच प्रमाण ठाऊक असेलच!

मिरची ही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपल्याकडील जवळपास सर्वच मुख्य पदार्थांत मिरचीचा वापर केला जातो. आपल्या इकडे तर चायनीज आणि इटालियन पदार्थांत देखील मिरचीचा वापर केला जातो.

मिरचीची फोडणी नसेल तर आपल्या इकडे कुठल्याच पदार्थाला चव येत नाही.

पण आपल्या घरात रोज वापरली जाणारी ही मिरची आपली नाही. मिरची ही पोर्तुगाल येथून भारतात आली होती.

 

बिर्याणी :

 

difference-between-biryani-pulao-inmarathi02

 

बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी.. विचारही केला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पण ही आपलीशी वाटणारी बिर्याणी देखील आपली नही.

सर्वात आधी तुर्की येथून पुलाव हा पदार्थ भारतात आला आणि मुघल साम्राज्यात ह्या पुलावने बिर्याणीचे स्वरूप घेतले.

 

चहा :

 

chai inmarathi

 

आपल्याकडे सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय असेल तर ते चहा, लहानांपासून अगदी थोर मोठ्यांपर्यंत चहा हा प्रत्येकालाच आवडतो, चहाची तल्लफ आली आणि चहा मिळाला नाही तर अस्वस्थ होणारी लोकं सुद्धा बरीच सापडतील!

आपल्याकडे चहा म्हणजे लागतोच. चहाशिवाय आपल्या दिवसाची सुरवातच होत नाही. हिवाळा असो उन्हाळा असो की पावसाळा चहा हा लागतोच.

पण हा चहा देखील आपला नाही तर विदेशी आहे. चहा हा ब्रिटन मधून भारतात आला आहे.

 

जिलेबी :

 

jalebi-inmarathi

 

आजकाल कोणताही समारंभ असला किंवा आणखीन काही आनंदाचा क्षण असला की आपल्याकडे हमखास काहीतरी गोडधोड केलं जातंच! त्यापैकी गुलाबजाम नंतर सर्वात जास्त आवडणारी गोड वस्तु म्हणजे जिलेबि..!

आपल्याइथे काही गुजराती लोकं ब्रेकफास्ट ला सुद्धा त्यांच्या गुजराती फाफडया सोबत जिलेबि खातात!

पण ही आपली गोड गोड जिलेबी देखील आपली नाही. जिलेबी ही पर्शिया येथून भारतात आली. पर्शियात जिलेबि ला ‘जलबिया’ म्हणून ओळखले जायचे.

 

मॅगी :

 

maggi inmarathi

 

सर्व लहान मुलांचा आवडता नाश्ता म्हणजे मॅगी. पण आपलीशी वाटणारी ही मॅगी देखील विदेशी आहे.

१८७२ साली मॅगीचा जन्म जर्मनी येथे झाला. तेथे मॅगीला ज्युलिअस मॅगी असे म्हणतात. आज स्वित्झर्लंडच्या नेल्से कंपनीचा ह्यावर अधिकार आहे.

 

नान :

 

naan-inmarathi

 

 

हॉटेलमध्ये जेवायला गेलं की मसाल्याची भाजी आणि नान ह्याला सर्वांची पहिली असते. त्यामुळे आपल्याला असं वाटत की, ही नान भारतीय आहे. पण तसं नाहीये.

नान ही देखील विदेशी आहे. नान ही आधी इराण आणि पर्शिया येथे खाल्ल्या जायची. त्यानंतर मुघलांच्या माध्यमातून ती भारतात आली.

बटाटा :

 

potato-inmarathi

 

बटाटा हा एक असा भाजीचा प्रकार आहे जो आपण जवळपास दररोज खातो, भाजी कसलीही असो त्याला बटाट्याची जोड असतेच.

पण हा बटाटा आपल्याला कितीही आपलासा वाटत असला तरी तो आपला नाही.

१७व्या शतकात हे बटाटे अमेरिका आणि पेरू येथून भारतात आले.

गुलाबजामुन :

 

Gulab-Jamun-inmarathi

 

गुलाबजामुन हा पदार्थ अनेकांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक. एखादा कार्यक्रम किंवा कुणाचं लग्न असलं आणि जर तिथल्या जेवणात गुलाबजामुन नसेल तर ते जेवणच अपूर्ण राहत.

पण आपल्या सर्वांच्या आवडीचा हा गुलाबजामुन आपला नाही तर पर्शियाचा आहे. तिथेच पहिल्यांदा हा बनविला गेला.

तेथे ह्याला लुकमत-अल-कैदी ह्या नावाने ओळखले जाते.

सामोसा :

 

Aloo-Samosa-inmarathi

 

समोसा हा देखील मुघलांनी भारतात आणला. १४ व्या शतकात सामोस्याला संबुस्क ह्या नावाने ओळखले जायचे, तसेच ह्यात बटाट्याची भाजी नाही मीट असायचे.

भारतात आल्यावर सामोसा हा बटाट्याची भाजी भरून तयार केला जाऊ लागला.

असे हे काही पदार्थ…जे आहेत तर परदेशी, पण भारतीयांच्या इतके अंगवळणी पडलेत, की अगदी “अस्सल भारतीय” वाटतात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?