प्रत्येक पदार्थाचा गोडवा वाढविणारा हा पदार्थ तुमच्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतात गुळ हा सर्वांनाच आवडतो आणि आपल्याकडे तो आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय लाभदायक मानला जातो.
आपल्याकडे मोठ्या चवीने गुळ खाल्ला जातो, इतकंच नव्हे तर आपल्या पदार्थांत देखील गुळ घातला जातो.
गुळपोळी असो वा गुळांबा असे काही खास पदार्थ केवळ गुळाच्या आधारेच तयार केले जातात.
मात्र पदार्थांची चव वाढविणारा हा गुळ शरिरासाठी अत्यंत गरजेचा आहे, हे तुम्हाला माहित आहे का?
तसेच ह्या गुळात काही औषधी गुण देखील आहेत, ज्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. गुळाचे असेच काहीसे चमत्कारिक गुण आज आपण जाणून घेणार आहोत.
सांधेदुखीवर उपायकारक
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यावर गुळ हे एक अतिशय चांगले औषध आहे.
एक ग्लास दुधासोबत गुळ घेतल्याने हाडं मजबूत होतात. तसेच आल्यासोबत गुळचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
त्वचा रोग
कोणताही ऋतु असला, तरी त्वचारोगांची तक्रार काही कमी होत नाही.
त्वचेची जळजळ, पुरळ, किंवा पिंपल्स यांसारख्या अनेक तक्रारी केवळ महिलांकडूनच नव्हे तर पुरुषांकडूनही केल्या जातात.
त्वचा संबंधी रोग असलेल्या लोकांसाठी देखील गुळ खूप लाभदायी असतो.
गुळ शरीरातील नुकसानकारक केमिकल्सन बाहेर काढण्याचं काम करतो. तसेच हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्याचं देखील काम करतो.
जेवण पचविण्यास मदत होते
पोटासंबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो.
गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते.
डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात.
सर्दी-खोकल्यावर उपायकारक
सर्दी-खोकल्यापासून त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुळ खाणे खूप फायद्याचे ठरू शकते, त्यामुळेच हिवाळ्यात लोक गुळ खातात.
गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो.
शरिरात निर्माण होणा-या उष्णतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
वजन कमी करण्यातही होते गुळाची मदत
गुळाचा वजन कमी करण्यात देखील फायदा होतो.
ह्यासाठी रोज गुळाचा चहा घ्यावा. ह्याने वजन कमी होण्यास मदत होते.
मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होण्यास मदत होते
मासिकपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात.
ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो.
संभोगानंतर गुळाचे सेवन करावे
संभोग केल्यानंतर गुळाचे सेवन करावे आणि त्याच्या काही वेळाने पाणी घ्यावे.
असे केल्याने तुमच्या शरीराला थकवा जाणवणार नाही. त्यामुळे संभोग केल्यावर गुळाचे सेवन करणे खूप फायद्याचे ठरते.
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.