' कोरोनासोबत हा साथीचा रोग देखील मोठ्या प्रमाणावर पसरत आहे!! वेळीच घ्या काळजी – InMarathi

कोरोनासोबत हा साथीचा रोग देखील मोठ्या प्रमाणावर पसरत आहे!! वेळीच घ्या काळजी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी अधिक प्रमाणात वाढत असते किंवा कमी होते. ‘ऑक्टबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे’, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

अनेक न्यूज चॅनेलने सणांमध्ये सोशल डिस्टनसिंगचा कसा फज्जा उडाला हेच वारंवार दाखवले, मात्र याच चॅनेलने राजकीय  पक्षांचे मेळावे, सभा इथे झालेल्या गर्दीचे, नियमांना पायदळी तुडवल्याचे दाखवायला बहुदा विसरले.

साथीचा एखादा आजार आला की त्याबरोबरीने इतर आजारदेखील आपसूकच पसरतात. त्यात पावसाळा सुरु आहे, त्यामुळे हवामानात सतत बदल होत असतात. वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकलासारखे आजार पसरत आहेत. दूषित पाण्यामुळे जसे पोटाचे आजार होतात तसेच डासांमुळे देखील मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार पसरतात.

 

corona india

 

सध्या पुण्यात, दिल्लीत चिकनगुनियाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होताना दिसून येत आहे, हजाराच्या वर केसेस गेल्या आहेत. त्यामुळे अशा रोगापासून आपल्याला आपली काळजी घ्यायला हवी.

 

rain safe inmarathi

 

चिकन गुनिया या आजराची उत्पत्ती आफ्रिकेत झाली असे निदर्शनात आले आहे. अनेक आजरांची उत्पत्ती आफ्रिकेसारख्या देशातून झाली आहे. प्रचंड गरिबी, आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा, शिक्षणाचा, आरोग्याचा, स्वच्छतेचा अभाव यामुळे तिकडे रोगराई पसरते. आज फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला या रोगाने विळखा घातला आहे. दरवर्षी हजारो लोक या आजरामुळे मृत्युमुखी पडतात.

हा आजार नक्की कशाने होतो?

कोरोनासारखा हा आजार देखील एका विषाणूमुळे होतो. एडिस या विशिष्ट जातीच्या डासामुळे हा रोग पसरतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते त्यामुळे साहजिकच डासांची तिथे उत्पत्ती होते.

 

chickengunia inmarathi

 

डासांची उत्पत्ती कशी होते?

एडिस पद्धतीचे डास हे उघड्या पाण्यावर, अगदी घरात आपण पक्षांसाठी एखाद्या छोट्या भांड्यात पाणी ठेवतो त्या पाण्यात देखील अशा डासांची उत्पत्ती होऊ शकते. खराब टायर, नारळाच्या करवंट्या, इतरत्र पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आदींमधून देखील या डासांची उत्पत्ती होते.

 

plastic water bottles InMarathi

 

रोगाची लक्षणे :

एडिस जातीचा डास जर चावला तर त्याचे परिणाम लगेच दिसून येत नाही तर १२ तासानंतर या रोगाचे शरीरात परिणाम दिसून येतात. सलग दोन तीन दिवस ताप येणे, डोके दुखणे तसेच अंगावर विशेष करून पाठीवर पोटावर पुरळ येणे आणि महत्वाचे म्हणजे सांधेदुखी. पायांचे घोटे, गुडघे या भागांमध्ये प्रचंड वेदना होतात. आजारातून बरे झाल्यावर देखील काही दिवस सांधेदुखी राहते.

 

joint pain inmarathi

 

उपचार :

कोरोनवर लस तयार करायला जवळजवळ वर्ष गेले मात्र चिकनगुनियावर आजतागायत एकही ठोस औषध तयार झालेले नाही.  वेदना आणि लक्षणे कमी करणे हाच यावरच एकमेव उपाय आहे. डॉक्टर्स भविष्यात असे कोणते आजार शरीरात होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे देतात.

या रोगावर अनेक घरगुती उपाय देखील केले जातात. हा रोग झाल्यावर प्रचंड थकवा येत असल्याने द्रव्य पदार्थ जास्त घ्यावेत. सांधेदुखीमुळे त्रस्त असाल तर तर लसणाची पेस्ट किंवा लवंगांचे तेल, मिरपूड गुडघ्यांना लावल्यास वेदना कमी होतील.अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने, मीठ टाका जेणेकरून रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. आहारात गाजर, नारळाचे पाणी समाविष्ट करा

खबरदारी काय घ्याल :

 

bath featured inmarathi

आपण बघितले की चिकनगुनियाच्या डासांची उत्पत्ती अगदी आपल्या घरात देखील होऊ शकते, त्यामुळे शक्यतो आपले घर स्वच्छ ठेवा. पाणी साठवत असल्यास ते एक दोन दिवसांनी बदला. डासांचे साम्राज्य तुमच्या भागात असल्यास फवारणी करून घ्या. झोपताना मच्छर दाणीचा उपयोग करा. अशा डासांची उत्पत्ती रोखणे हाच एक मार्ग सध्या आपल्या हातात आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?