Site icon InMarathi

करोनाच नव्हे – काही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया तुमच्या दैनंदिन सवयीतून पसरतो!

botulism-bacteria-inmarathi

lpt7.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपूर्ण जगाला सध्या एका मोठ्या समस्येने घेरलं आहे आणि ती म्हणजे कोरोना! कोविद-१९ विषाणूची साथ आता सर्वव्यापी झाली आहे. या संसर्गिक विषाणू पासून आपल्या घराचा बचाव करण्याच्या उपायांकडे सर्वांचं लक्ष आहे.

ह्या विषाणूची इतकी भीती आहे की सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर, जमावर बंदी घातली. बरेचसे कार्यक्रम रद्द करण्यात आले!

आज या सगळ्याला एक वर्ष होऊन गेलं तरीही परिस्थिति अजूनही आटोक्यात आलेली नाही. कोरोनाची दुसरी लाट आली असून पुन्हा लॉकडाउन करण्याची चिन्ह महाराष्ट्रात दिसत आहेत!

 

 

पण आज आपण करोना विषयी नाही तर एका वेगळ्याच व्हायरस विषयी जाणून घेणार आहोत! आणि हा व्हायरस तुमच्या दैनंदिन सवयीतून पसरू शकतो, त्यामुळे काळजी घेणे हे अनिवार्य आहे!

===

हे ही वाचा चेहऱ्यावर मास्क वापरताना या टिप्स फॉलो करायला विसरलात, तर अनेक आजारांशी सामना करावा लागू शकेल

===

वर्ष १९२२, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे स्कॉटलंड येथील एका प्रसिद्ध हॉटेलममध्ये ऑगस्ट महिन्यात ३२ लोकांचा एक ग्रुप सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी गेले होते.

एके दिवशी ते लोक मासे पकडण्यासाठी बाहेर जाणार होते आणि त्यांच्यासोबत हॉटेल मधील १३ कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील जाणार होता. 

ह्यासाठी सर्वांनी तयारी केली आणि हॉटेल स्टाफने पाहुण्यांच्या खाण्याची व्यवस्था करत त्यांच्यासाठी दुपारचे जेवण डब्यांत भरले आणि ते सर्व मासेमारी करिता निघाले.

लंच ब्रेकमध्ये सर्वांनी ते डब्बा बंद पदार्थ खाल्ले.

ह्या नंतर काहीच दिवसांच्या आत ह्या समूहापैकी ८ लोकांना मृत्यूने कवटाळले. त्यांचा मृत्यू फूड पॉइझनिंग मुळे झाला असल्याचं समोर आलं. ह्या घटनेने संपूर्ण स्कॉटलंडला धक्का बसला.

 

ह्यावेळी पाहिल्यांदाच बॉटुलिज्म बॅक्टेरिया जगासमोर आला. आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाज बद्दल ऐकल आणि वाचलं असेल. पण बॉटुलिनस बॅक्टेरिया हे नावच कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल.

बॉटुलिज्म बॅक्टेरिया ह्या नावाने ओळखला जाणारा हा बॅक्टेरिया अतिशय धोकादायक आहे.

हा बॅक्टेरिया जास्तकरून डब्बा बंद पदार्थांत आढळून येतो. हा बॅक्टेरिया असलेल्या पदार्थांना खाल्ल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. हेच स्कॉटलंडच्या त्या लोकांसोबत झालं होतं.

हॉटेलमधील ते जेवण घेतल्यानंतर लगेचच काही लोक आजारी झाले, कुणाला पोटात दुखायला लागले तर कुणाला डोळ्याने दिसेनासे झाले.

ह्या लोकांना बघून डॉक्टरदेखील हैराण होते, त्यांना काय करावे कळलेच नाही. आणि ह्या आजाराने एकानंतर एक असे बळी घ्यायला सुरवात केली.

 

सुरवातीला कुणालाच काही कळाले नाही, हे कसे झाले ह्यावर अनेक तर्क देण्यात आले. हे कुणाचे कटकारस्थान आहे का? कुणी ह्या सर्वांना विष दिले का? असं सर्व तेथील लोकांच्या डोक्यात येत होत.

कुणालाच काहीच कळत नव्हत, अखेर पोलिसांना बोलवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलची तपासणी केली, मालक, कर्मचारी सर्वांची कडक चौकशी करण्यात आली,

पण त्या ८ लोकांच्या मृत्यूमागील कुठलेही कारण समोर येत नव्हते.

 

एका तज्ञांनी सांगितले की, ह्या सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला आहे. तरी देखील ह्या प्रकरणाचा तपास सुरु राहिला.

पोलिसांच्या टीमने हॉटेलच्या कचऱ्याच्या दाब्ब्याची देखील तपासणी केली जिथे मृत्यू झालेल्या लोकांनी खाल्लेले पदार्थांचे डब्बे फेकण्यात आले होते.

त्यातिल पदार्थांच्या तपासणीत हा घातक बॉटुलिनस बॅक्टेरिया आढळून आला.

===

हे ही वाचा कोरोनापेक्षाही भयंकर अशा या १० व्हायरसनी घेतले आहेत जगभरातील लाखो लोकांचे बळी

===

हा बॉटुलिनस बॅक्टेरिया कॅन्ड डक पेस्ट (डकच्या लिव्हरपासून बनलेला एक विशिष्ट पदार्थ) आणि मृत्यू पावलेल्या आठही लोकांनी डकपेस्ट सॅण्डविच खाल्ले होते.

तसे तर इतर लोकांनीदेखील डकपेस्ट सॅण्डविच खाल्ले होते पण डक पेस्टच्या एकाच डब्ब्यात हे बॅक्टेरिया होते.

हा बॅक्टेरिया सर्वात आधी १८ व्या शतकात जर्मनीत समोर आला होता. १९२२ मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या ह्या घटनेनंतर ह्याबाबत रिसर्च सुरु करण्यात आली.

 

जेणेकरून ह्या घातक आजारावर उपचार शोधला जाऊ शकेल. सोबतच होम मेड कॅन्ड फूडसाठी अनेक कायदेशीर मापदंड तयार केले.

कारण ज्या बॉटुलिनस बॅक्टेरिया ने ८ लोकांचा मृत्यू झाला होता त्यांनी खाल्लेलं डक पेस्ट हे होममेड कॅन्डमधील होतं. बॉटुलिज्म हा बॅक्टेरिया अनेक पदार्थांना परत परत गरम केल्याने देखील उत्पन्न होऊ शकतो.

म्हणून नेहमी ताजंच खावं, शिळे अन्न जास्त खाऊ नये तसेच कॅन्ड फूड आणि पॅकेज फूड पासूनदेखील दूर राहावे.

===

हे ही वाचा कोरोनापेक्षाही भयंकर अशा `या’ बिन चेहऱ्याच्या शत्रूने यापुर्वी जगावर आक्रमण केलं होतं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version