बलाढ्य भारतावरील कधीही न पुसला जाणारा ओरखडा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२६ नोव्हेंबर २००८ कधीही न विसरता येणारा दिवस…
एक अशी काळरात्र जिने या शहराच्या सुरक्षेसाठी धडपडणा-या अनेक वीरांना गीळंकृत केलं, कायमच घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई त्या हल्ल्याने काही तास स्तब्ध झाली. आज बारा वर्षांनंतरही त्या दिवसाची शांतता मुंबईकरांच्या मनात घर करून राहिली आहे.
या दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या त्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जग सुन्न झालं. भारतावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला.
कित्येक शूर वीर धारातीर्थी पडले आणि असंख्य निष्पाप जीवांचा हकनाक बळी गेला. आजही तो दिवस आठवला की अंग शहारून जातं.
क्रूरकर्मा कसाब देखील फाशीला लटकवला गेला. त्याला आणि त्याच्या साथीदारांना त्यांनी केलेल्या कृत्यासाठी मृत्यदंड हीच योग्य शिक्षा होती आणि ती त्यांना मिळाली देखील!
त्यानंतर पुन्हा मुंबई सुरु झाली, आपल्याच वेगात धावू लागली मात्र तरिही २६/ ११ हा दिवस उगवला की त्या जुन्या जखमाा ताज्या होतातच.
आज आम्ही तुम्हाला या हल्ल्याशी निगडीत अश्या काही गोष्टी सांगत आहोत ज्या बहुधा तुम्हाला माहित नसतील !
- २१ नोव्हेंबर २००८ मध्ये दहा दहशतवाद्यांनी पाकिस्तान सोडलं आणि ते भारताच्या दिशेने रवाना झाले. २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी भर समुद्रात कुबेर नामक भारतीय बोट हायजॅक केली.
त्यातील ४ मच्छीमारांना मारून टाकले आणि बोटीच्या कप्तानाला मुंबईच्या दिशेने बोट चालवत राहण्याची धमकी दिली.
- २६ नोव्हेंबर रोजी ते मुंबईच्या समुद्रात पोचले. मुंबईचा किनारा अवघा ७ किमी दूर असताना त्यांनी कप्तानाला मारून टाकले आणि स्पीडबोटच्या सहाय्याने ते कुलाब्याच्या दिशेने वळले.
- मच्छीमार नगर डॉक वर उतरल्यावर सहा जण तेथेच राहिले आणि बाकीचे चार जण कफ परेड मधील भदवार पार्क येथे आले.
स्थानिकांनी त्यांना तुम्ही कोण असे विचारताच आपण विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
- या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सुमारे १६४ लोकांचा बळी घेतला आणि ६०० पेक्षा जास्त लोकांना जखमी केले.
- ऐकून विचित्र वाटेल किंवा हसू येईल पण हे खरं आहे की सी.एस.टी. स्टेशनमध्ये विनातिकीट घुसल्याबद्दल रेल्वे पोलिसांनी अजमल कसाबवर केस दाखल केली होती.
- नरीमन हाउसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी कमांडो चॉपर घेऊन पोचले.
परंतु पायलटने नरीमन हाउसवर चॉपर उतरवण्या ऐवजी ते बाजूच्या दुसऱ्याच बिल्डींगवर उतरवले, त्यामुळे काही काळ गोंधळही निर्माण झाला होता.
- अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू देरा इस्माईल खान यांनी सी.एस.टी. स्टेशनमध्ये घुसल्या घुसल्या अंधाधुंद गोळीबार सुरु केला.
त्यांनी अवघ्या १५ मिनिटांमध्ये ५८ लोकांचा बळी घेतला ज्यात २२ जण मुस्लीम होते आणि १०४ लोकांना जखमी केले.
- मुंबईवरील या दहशतवादी हल्ल्याची योजना लष्कर-ए-तयब्बा या दहशतवादी संघटनेने बनवली होती. त्यांनीच कसाब आणि त्याच्या साथीदारांना मुंबईमध्ये पाठवले होते.
- शरीर थकू नये म्हणून या सर्व दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यावेळी ड्रग्जचे (कोकेन आणि एलएसडी) सेवन केले होते.
- अमेरीकीन अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की Inter-Services Intelligence अर्थात आयएसआयच्या कोणा अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तयब्बाला पूर्ण मदत केली होती.
त्याशिवाय हा हल्ला होणे शक्यचं नाही असे त्यांचे म्हणणे !
- या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डस यांनी आखलेल्या मोहिमेला Operation Black Tornado असे नाव देण्यात आले होते.
या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांची आणि या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांची आठवण झाली तरी प्रत्येक भारतीय हळहळतो!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved