आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
संजू हा तुमच्या आवडत्या सिनेपरिक्षकाचे पितळ उघडे पडणार सिनेमा आहे. या एकट्या सिनेमाच्या परिक्षणावरून अहंकार, अभ्यास, रसग्रहण, फक्त काम म्हणून कोण कोण आपले काम करतो हे ठरवता येईल, अशी ही भट्टी आहे. आणि त्याला कारण आहे हिराणी हे नाव, रणबीर कपूर हा जिनियस, संजय दत्त हे पात्र आणि रेव्हिएवर मिरवण्याची हौस.
हिराणी हा सिनेमा बनवणार हे ,संजय जेव्हा येरवड्यातून सुटला आणि राजूने त्या प्रसंगाचे शूट केलें तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे हा सिनेमा बघावा लागतो तो हिराणीचा सिनेमा आणि संजय दत्त वरील सिनेमा ह्या दोन पातळीवर.
शुद्ध हिराणी छाप सिनेमा म्हणजे प्रवाही स्क्रीनप्ले, भावुक प्रसंग, हळुवार खुलत जाणारे प्रसंग आणि संगीताचा माफक प्रयोग ह्यावर.
आणि सोबत हिराणी कुठल्यातरी विषयावर करतो ते भाष्य. इथे हिराणी मीडियावर सैलसर भाष्य करतो आणि त्यासाठी संजय ची कथा हा योगायोग आहे, कारण मूळ विषयाला किंवा कथेला धरून मीडियाचा फार काही कार्यकारणभाव नाही. त्यामुळे इतर हिराणी मापानुसार हा सिनेमा त्याचा “pk” च्या वरचा वाईट सिनेमा म्हणावा.
‘लगे रहो’ ची पातळी आणि कथाभाग गाठण्यासाठी हिराणीला नवा कोरा विषय लागेल . हे असे घडते त्याचे महत्वाचे कारण म्हणजे संजय ह्या विषयाला धरून असलेलं बरेच प्रसंग हिराणीला गाळावे लागले आणि त्यामुळे सिनेमा तुटक झाला.
परिणामी ही ना धड बायोपिक अन धड बाप-लेक-मित्र कथा राहते. सोबत गिल्ट म्हणून की काय हिराणी प्रेक्षकाला न सांगितलेल्या बाबीबद्दल बरेच हिंट देतो पण ते जनरल नौलेज कुणाकडे नसेल तर असले बारकावे प्रेक्षकाला अजून कॉन्फउज करू शकतात.
सयाजी शिंदे-सेना, मांजरेकर-वास्तव, नरसीह राव, जेठमलानी, दावूद, टाइम्स ऑफ इंडिया असले बरेच हिंट हिराणी काय काय सांगू शकला नाही ह्याची चार्जशीट आहे. आणि ती तो स्वतःच आपल्याला देऊन जातो. ह्या सगळ्या खाच खळग्यावरून आपल्याला अलगद प्रवास घडवतो तो रणबीर कपूर.
संजूची नक्कल चवीनुसार वापरून हिराणीने रणबीर च्या भाव/emoting हिराणीला ज्या पातळीवर जाऊन भावना जगवायच्या आहेत तिथे नेऊन नेमक्या वापरल्या आहेत. त्यामुळे सिनला गरज असेल तर रणबीरचा चेहरा आणि शॉटला हवा असेल तेव्हा संजूची लकब ह्याचा बेलालूम वापर हिराणी करतो. आणि रणबीर ते ते प्रसंग खुलवून टाकतो.
रणबीर हा संजूच वाटतो किंवा वाटत नाही असे कुणी म्हणत असेल तर करिकेचरचा किती मोठा धोका ह्या सिनेमाला होता ह्याचा त्याला अंदाज नाहीये आणि सोबत शुद्ध भाव व्यक्त करण्याचा संजय आणि रणबीर ह्यांचा क्षमतेतील फरक सुद्धा.
मुन्नाभाईच्या सीन्स मध्ये तो थेट संजय वाटेल किंवा ड्रग्सच्या सीन्स मध्ये छान कुडकुडेल इतकी अपेक्षा ठेवावी असा रणबीर कपूर आहेच. इथे मात्र तो खुलतो ते सध्या सीन्स मधील त्याचे भन्नाट भाव आणि मुद्राभिनय ह्याच्या जोरावर. त्याचे आई सोबतचे सीन्स किंवा ड्रग्स घेऊन सोनम सोबतचे सगळे अतरंगी सीन्स कमाल आहेत.
विचित्र, विक्षिप्त वागून हिराणी छाप सहानुभूती दोनपाच मिनिटाच्या प्रसंगात मिळवताना रणबीर आपले सोने कसोटीवर सिद्ध करतो. सोबत सगळ्यांना भावतील असे हिस्टोरिक प्रकारचे प्रसंग आहेत ज्यात तो सगळ्यांना अभिनय करतोय म्हणून कळेल ह्याची सोय आहे.
नर्गिसचा आवाज रेकॉर्ड करून बाप, लेक ऐकतात असा एक सिन आहे, साहजिकच, त्यात गुंतून जाऊन रेकॉर्डला खरे समजून सुनील दत्त/परेश रावल हालचाल करतात असे नॅरेशन आहे. हा सिन मुळात परेश रावल ह्यांचा आहे, एखाद सेकंद सोडून कौशल किंवा रणबीर आपल्याला पडद्यावर दिसत देखील नाही पण सिन कनक्लूड करताना रणबीरचा नुसता आवाज “रेकॉर्ड है” ह्या माणसाने किती मेहनत घेतली हे दाखवून जातो.
सिनेमात असे बरेच प्रसंग आहेत जिथे हिराणी रणबीरचे ‘रणबीर असणे’ वापरून घेतो. त्याला रीतसर सगळे अवॉर्ड मिळोच.
सुनील दत्त आणि नर्गिस ह्यांचे नाते हे नर्गिस ह्याच्या awe चे होते हे गॉसिप कॉलम मधील सत्य अगदी मनीषा कोईराला पडद्यावर येते तेव्हा हिराणी सुचवून जातो. नर्गिस ह्या ओल्ड स्कूल अभिनेत्री आणि व्यक्ती. त्यानुसार थोडा भाबडा आणि पल्लेदार वावर मनीषा हीचा आहे. तिने नर्गिसजिचा ग्रेस सांभाळून घेतला, पण मनीषा हीच आता ओल्ड स्कूल समजली जाते की काय ह्यामुळे तिने नर्गिस काळातील अदा, लकबी निभावल्या हे कदाचित सहज लक्षात येणार नाही.
तीच रीत सुनील दत्त, परेश रावल ह्यांची. ज्यांनी श्री दत्त ह्यांना व्यक्ती म्हणून टीव्ही वर बघितले आहे त्यांना त्याचे ६० च्या दशकातील भोळे वाटावे असे आदर्शवादी वागणे लक्षात असावे.
परेश रावल ह्यांनी बारीक हावभावातून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. हाजी मस्तानची कथा सांगताना ते लक्षात येते. तरीही रावल हे दत्त सारखे दिसत नाहीत पण बरी भूमिका केली असे म्हणताना त्याने/तिने रावल ह्यांचे सायलेंट सीन्स आणि क्या यही प्यार है वरील प्यारोडी बघावी. भूमिकेला न्याय देणे म्हणतात ते हेच आहे.
तसा तो न्याय सोनम कपूर पण देते. सोनमचे बाबा मरतात आणि तिथे ड्रग घेतलेला संजू येतो, तिथे हळवेपणा ते कन्फ्युजन ते संताप असे भाव सोनम दोन मिनिटात देते.
तिला अभिनय येत नाही इत्यादी पाहता हिराणीने सोनमला खूप वाव दिलाच आहे. ह्या सिनेमात संधीचे सोने केले असेल कुणी ते विकी कौशलने. अमिताभने दारू पिऊन अरश्यासमोर केले दारुडे सिन, ह्या पठडीतील lifetime सिन त्याला परेश रावल सोबत मिळाले. बाकी इतर सीन्समधील त्याचा अभिनय कधी कधी रणबीरला झाकोळेल असा आहे!
कौशल हा एलिट निर्मात्यांचा राजकुमार राव असणार आहे. ती मेन्स्ट्रीम हिरो म्हणून घेतला जावा असे वाटावे इतकी सहानुभूती विकी कौशल चे पात्र आपल्याकडून घेऊन जाते.
हिराणीचे सिन टेकिंग, बॅकग्राऊंडचा नेटका वापर इत्यादी आपल्याला भेटतात. सिनेमात गाणी कमी प्रमाणात वापरली आहेत नि त्यात रेहमानचे ‘रुबी रुबी’ हे सुंदर psychedelic गीत निसटून जाते. हा सिनेमा ‘संजयचा सिनेमा’ करताना मात्र हिराणी ह्यांची घसरण सुरू होतो. संजू हा ३ इडियटइतका ढिसाळ आणि पसरट नाही. पण काय काय सांगायचे नाहीये ही हिरानीची अडचण आणि आपल्या मित्राची भावुक कथा ह्यात ते फसतात.
त्यामुळे सैराट प्रमाणे हा संजू भाग १ मग इंटरवल नंतर संजू भाग २ असा सिनेमा वाटतो. कथाकथनामध्ये येणारा तुटकपणा हिराणीकडून अपेक्षित नाहीच.
त्यामुळे अनुष्कासारखे काही पात्र का भावुक झालेत किंवा जिम सरभ ला नेमके काय क्यारेक्टर ब्रीफिंग केले असे वाटते. संजू आणि कौशलचे पात्र कमाली हाचे नाते का ताणले हा प्रश्न जिम सरभचे पात्र अनुष्काला सुचवतो इतका मोठा प्लॉट होल हिराणी सोडतात. पण मित्र कणव ह्यापुढे हिराणी तरी काय करणार. रणबीर सिनेमाला तारतो तो इथे.
संजूमध्ये ड्रग्स चे उदात्तीकरण नाही ही पहिली जमेची बाजू. महान पण सध्या आई बापाचा रगेल मुलगा हे लपून ठेवण्याचा प्रयन्त हिराणी करीत नाहीत हा दुसरा. संजय काय काय पराक्रम करतो हे दाखवताना हिराणी ह्युमर वापरतात, सिनेमा डार्क होऊ नये, पक्षी त्याची गत ‘रॉकस्टर’ प्रमाणे होऊ नये ह्यासाठी त्यांनी असे केले असावे.
पण १९९५ नंतरची पिढी ज्यांनी संजू ला मुन्नाभाई म्हणून बघितले आहे आणि ज्यांनी ‘देव डी’ सारखे सिनेमे बघितले आहे त्यांना हा माणूस कधीच सुधारला नाही हे जाणवेल ह्याची खात्री हिराणी ह्यांनी त्या त्या हूमर मद्ये केलेली आहे.
इतर ठिकाणी जसे जेठमलानी ह्याचे सिन किंवा अबू सालेम चे संजू कडे येणे, दुबई चे उल्लेख, संजू नंतर बापाची फार पर्वा करत नाही असे त्रोटक सीन्स इत्यादींच्या, अति मोठे गौप्यस्फोट करू शकत नसल्याची ग्वाही हिराणी देतात.
त्यामुळे संजू हे मुद्दाम केलेले उदात्तिकरण आहे, हा माणूस क्रिमिनल आहे. पोरांवर वाईट प्रभाव पडेल इत्यादी बोंबा १९८६ च्या आधीचे लोक मारत आहेत ह्यातच हिराणीने किती मोजून मापून डाव खेळला आहे ते लक्षात येते. तुम्ही अगदीच विशीतील असाल तर संजय दत्त कधीच सुधारला नाही पण त्याची कथा मात्र रंजक आहे इतकेच तुम्हाला वाटेल.
पण मुन्नाभाईसारखे दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रसंग डोक्यात घोळत इतका संजू प्रभावी नाही. टायगर पट किंवा टॉयलेट पट ह्याच्या स्पर्धेत संजू येत असल्याने त्याचे यश योग्य असेच आहव. पण ह्या सिनेमाचे खरे यश, तो रणबीरला संजू होण्यापासून वाचवनार हे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.