स्त्रियांनी periods चालू असतांना काय करावे, काय टाळावे, ५ महत्वाचे मुद्दे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे. मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुःखी होते. असे मूड स्वींग्स होतच असतात.
आपली अशी वागणूक बघून आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास व्हायला लागतात. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी करण्यापासून वाचले तर कदाचित हे मूड स्वींग्स एवढे त्रासदायक ठरणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मासिक पाळी दरम्यान कुठलाही डिप्रेसिंग चित्रपट किंवा कार्यक्रम बघू नये. ज्यामुळे आपल्या भावना दुखावणार नाही. चित्रपट किंवा कार्यक्रमात दाखविलेले क्षण बघून आपणही भावूक होऊन जातो.
म्हणून होईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी, कार्यक्रम बघा. ह्याने तुमचा मूड पण चांगला राहिलं आणि इतरांना देखील त्रास होणारं नाही.
हे ही वाचा –
- मासिक पाळी बंद होताना नेमकं काय होतं हे समजून घेतल्यास हा काळ सुसह्य होईल
- मासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
अनेक स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पाय आणि कंबरेत खूप दुखणे असते कारण त्यावेळी आपल्या शरीरातील एस्ट्रोजेनची लेव्हल खूप कमी होऊन जाते. मासिक पाळीचा पहिला दिवस हा अतिशय त्रासदायक असतो.
ज्या महिलांना त्या त्रासातून जावे लागते त्यांनाच हे सर्व कळू शकत. त्यामुळे ह्या दरम्यान डेंटिस्ट किंवा डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ नये. तसेच मासिक पाळी दरम्यान वॅक्सिंग देखील करू नये.
पण त्यानंतरच्या आठवड्यात तुम्ही वॅक्सिंग करू शकता, कारण तेव्हा तुमच्या शरीरातील एस्ट्रोजेन लेव्हल नॉर्मल होऊन जाते.
मासिक पाळी दरम्यान फिक्या रंगाचे किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे. तसे तर हे रंग एव्हरग्रीन आहेत त्यामुळे आपल्याला ते आवडतातच, पण मासिक पाळी दरम्यान असे रंग घालणे खूप रिस्की असू शकते.
कारण असे केल्यास डाग लागण्याची भीती असते. जसे आपण सॅनिटरी नॅपकिन्स जाहिरातींमध्ये बघतो की, मुली पांढरे कपडे घातलेल्या दिसून येतात. पण खऱ्या आयुष्यात मासिक पाळी दरम्यान पांढरे किंवा फिक्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.
अनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिमला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. Women Health Magazine नुसार मासिक पाळी दरम्यान थोडाफार व्यायाम करत राहावा.
व्यायाम किंवा योगा केल्याने बॉडीपेन कमी होते तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी होतो. अनेक स्त्रिया सांगतात की, मासिक पाळीमध्ये देखील व्यायाम केल्याने त्यांचा त्रास कमी झाला.
शरीरातील कॅलशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दुध-दही खात असतो. पण मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ खाऊ नये.
मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नये. डॉक्टरांच्या मते मासिक पाळी दरम्यान कॅलशियम घ्यायला हवे पण डेअरी प्रोडक्ट्स खाणे टाळावे.
कारण ह्यामुळे त्रास वाढतो. ह्याचं कारण म्हणजे ह्यात एराकाडोनी अॅसिड आढळत ज्यामुळे त्रास वाढतो.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया ह्या कामाच्या नादात कधीकधी पॅड बदलायचं टाळतात. पण हे खूप घातक असतात. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जर आपण पॅड खूप काळापर्यंत बदलला नाही तर त्यात बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात ज्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून पॅड दर तीन ते चार तासानंतर बदलणे गरजेचे असते. त्यामुळे ते टाळणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
हे ही वाचा –
- जाणून घ्या, मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म!
- मासिक पाळीदरम्यान चिडचिड होतेय? मग हे घ्या नऊ घरगुती उपाय!
मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. त्या दरम्यान शारीरिक संबध ठेवल्यास गर्भधारणा होत नाही हा निव्वळ एक गैरसमज आहे. मासिक पाळी दरम्यानही गर्भधारणा होण्याची शक्यता असते. पण संक्रमण होण्यापासून वाचण्यासाठी ह्या दरम्यान संबंध टाळावे.
मासिक पाळी दरम्यान शरीर कमकुवत झालेलं असतं त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणून ह्या दरम्यान पुरेश्या प्रमाणात खाणे गरजेचे असते. या काळात न खाण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. या दरम्यान जमेल तेवढं पौष्टिक आहार घ्या.
मास्टरबेशन करणे हे तसे आरोग्यासाठी चांगलं असतं त्यात काहीही गैर नाही, पण मासिक पाळी दरम्यान हे करणे जरा घातक ठरू शकते. ह्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान मास्टरबेट न केलेलेच बरे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.