म्हणे, “कैलाश तीर्थ साठवलेली बाटली विक्रीला”! यावर हसावं की रडावं, तुम्हीच सांगा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
इशा फाउंडेशनचे जग्गी वासुदेव ह्यांना आध्यात्मिक गुरु मानल्या जाते. ते नेहेमी अध्यात्मिक मुद्द्यांवर बोलत असतात. पण ह्यावेळी इशा फाउंडेशनने तर एक आश्चर्यकारक वस्तू आणली आहे. खरेतर ती वस्तू नसून तांब्याची बाटली आहे.
आता तुम्ही म्हणालं तांब्याच्या बाटलीत आश्चर्य करण्यासारखी काय गोष्ट आहे? तर तांब्याची बाटली हे आश्चर्य नाही तर त्यातील पाणी हे आश्चर्यकारक आहे…
काही दिवसांपूर्वी इशा फाउंडेशनने एक लिटर पाण्याने भरलेली तांब्याची बाटली लॉन्च केली आहे. ज्याचे फीचर्स चक्रावून सोडणारे आहेत ह्यात दिलेल्या डिस्क्रिप्शन नुसार ह्यात भरलेलं पाणी काही साधसुध पाणी नसून कैलास पर्वताच्या दक्षिण मुखातून घेतलेलं हिमालयाच पाणी आहे. ह्या बाटलीला कैलास तीर्थ असे नावं देण्यात आले आहे. कारण ह्यांच्यानुसार ह्या पाण्यात अजुनही कैलास पर्वतावर असणारी एनर्जी सामावलेली आहे.
पाण्यात मेमरी आणि एनर्जी स्टोर करण्याची क्षमता असते. कैलास पर्वताचा दक्षिण मुख हा अतिशय रहस्यमयी आहे. ह्या कैलास तीर्थात अनेक शक्तिशाली गुण आहेत. ह्याबाबत सांगितल्या गेलं आहे की, कैलास तीर्थ एक अश्याप्रकारच पाणी आहे, ज्यात दिव्यशक्ती आहेत.
हे कैलास तीर्थ एका तांब्याच्या बाटलीत स्टोर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये आतल्या भागात एक सिल्वर लायनिंग आहे. एनर्जी बनवून ठेवण्यासाठी तांबा आणि चांदी हे सर्वात प्रभावी धातू आहेत. ह्यामुळे कैलास तीर्थची शक्ती दीर्घ काळापर्यंत टिकून राहू शकते.
आयुर्वेदात देखील सांगितल्या गेलं आहे की, चांदीच्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या पाण्यात अॅण्टी-बॅक्टेरियल आणि अॅण्टी-कार्सिनजेनिक गुण असतात.
असं ह्या इशा फाउंडेशनचे म्हणणं आहे…
ही बाटली सध्या ऑनलाईन उपलब्ध असून ह्याची किंमत ३,१०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
ह्या बाटलीवर एक क्यूआर कोड दिलेला आहे, जो तुम्ही स्मार्टफोनने स्कॅन केल्यावर त्यावेळी कैलास पर्वत कसं दिसत आहे हे बघू शकता. ह्यासाठी तुम्हाला केवळ क्यूआर कोड स्कॅनिंग अॅपची गरज असेलं.
ह्या बाटलीची किंमत आणि त्यातील गुण बघता लोकांनी ह्याला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी ह्या बाटलीची खिल्ली उडविली तर अनेकांनी ह्या पाण्याचे गुण हास्यास्पद असल्याचं सांगितलं. पण सध्या ही गुणकारी चमत्कारिक कैलास तीर्थ बाटली सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आहे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.