आपल्या या पुरोगामी (?) महाराष्ट्रात, बामनाचं पोर मुख्यमंत्री…??
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – राम सातपुते
===
बऱ्याच दिवसापासून काही जातीयवादी धसकट नीच पद्धतीचं राजकारण करत आहेत …! याच संदर्भात मी राम सातपुते खुले पत्र लिहित आहे!
===
नमस्कार ! माय बाप जनता जनार्दन…
पत्रास कारण की, बऱ्याच दिवसापासून एका विषयात आपल्या सर्वांशी बोलावं असा विचार करत होतो पण विषयाला वाचा फोडता येत नव्हती. थेट बोललो असतो तर मला जातीयवादी म्हणाला असता.
असो, पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि इथे लोकशाही आहे हे सगळं मान्यय.
पण बामणाचं पोरगं मुख्यमंत्री कसं झालं?
हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे.
भाजपा सरकार आल्यापासून जीवाला घोर लागलाय. काल परवाचं खेळकर पोरगं आणि मुख्यमंत्री झालं! धन्य आहे हा पुरोगामी महाराष्ट्र!
हे कालचं पोरगं आमच्या समोर मुख्यमंत्री झालं, आमचे घोटाळे जनतेसमोर उधळले, एवढी हिंमत या छोकऱ्याची? ब्राम्हण म्हणजे आमचं लग्न, सत्यनारायण आणि थेट देवाशी ओळख वगेरे असणारी जात. यांनी तेच करावं ना !
चार मंदिरं वाढवली तर चालेल पण आज राज्यच त्यांच्या हातात दिलंय. बामनाचं पोरगं मुख्यमंत्री झालं हे मला मुळातच पटलेलं नाही.
कसं पटेल तेही सांगा ना.. हा महाराष्ट्र काय भाजपच्या नावावर आहे का? समस्त गोरगरिबांचा राजकीय सातबारा माझ्या नावावर लिहलाय!
ही लोकशाहीसुद्धा ना, थोडा घोळ करते. त्यात लिहीलंय लोकप्रतिनिधी व्हायला तो भारताचा नागरिक असावा. आरं, पण आमचा विचार करायचा ना जरा !
दुःख एवढंच नाही. मात्र हे पोरगं मुख्यमंत्री झालं तेव्हापासून सात कुठं गेले कळेना. अन आमचे बारा वाजवून टाकले या पोरानं.
आमच्या काळात आम्ही विहिरी कागदावर खांदल्या आणि कागदावरच विहिरीला पाणी लागलं. आता हे पोरगं येड लागल्यासारखं खऱ्या विहिरीसाठी अनुदान देतंय. अन तेवढं करून थांबावं नं, या पोरांनं!
विहिरी झाल्या का नाही म्हनून अधिकारी पाठवायला लागलं. या दुध खुळ्या पोराच्या लक्षातच येत नाही. सरकारी योजना कार्यकर्त्याचं खुराक असतात. बसलंय हे विहिरी खांदत.
हे पोरगं काही कामाचं नाही. आम्ही हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या आणि आम्ही त्याच जागेवर पवनचक्की, लवासा असे उद्योग सुरू केले.
शेतकऱ्याच्या खिशात पैसे झाले ना राव, भले कमी किमतीत असतील मात्र आम्ही जमिनी तरी खरेदी केल्या, त्याला लुबाडल्या म्हणतात. जमिनी बळकावल्यासुद्धा…
पण काय करावं हे पोरगं मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांची जमीन सोडा, मातीही नाही भेटत. इतकं व्हाईट कॉलर नसतंय चालत.
आम्ही सत्तेत असताना रस्ते केले आणि सोबत कार्यकर्ते पण मोठे केले. बरीच टक्केवारी असते त्यांना. भले बऱ्याच लोकांचे मणके कामातून गेले पण तेवढे तरी काम केले ना. आम्ही काही ठिकाणी रस्त्यावर बऱ्याचदा पैसे उचलले पण रस्ते केले नाहीत.
===
हे ही वाचा – “मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”
===
लोक मणक्याच्या आजाराने मेले. पण हे पोरगं मुख्यमंत्री झाल्यापासुन एकदा रस्ता खराब झाला की नीटच करतंय! बाकी नंतर…!
आमच्या काळात आम्ही खच्चून शिक्षण संस्था काढल्या. हजारो एकर महाराष्ट्रातील जागा आम्ही त्या संस्था ना फूकट देऊन टाकली. अहो, मोठं मन लागतं त्याला. यांचं काम नाही हे.
आम्ही चण्या – फूटाण्या सारख्या जमिनी आणि सात बारे आमच्या नावावर करून घेतले. आणि हो तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. कारण कुठं कुठं जमिनी आहेत हे आम्हालाच माहित नाही अन तुम्हाला कधी सापडतील?
आमच्या काळात पोलिस स्टेशन आम्ही चालवायचो आपल्या कार्यकर्त्यांना कधीच धाक नाही दाखवला. आता पोलीस चालवतात. खोट्या केस करायला आमचेच कार्यकर्ते अन मिटवायला आमचेच. शेवटी कार्यकर्त्यांची दुकानदारी चालली पाहिजे ना!
आम्ही तर आमच्या काळात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलंय. या पोराला कसं जमेल. हे तर बामनाचं पोरगं अन झालय मुख्यमंत्री.
आम्ही लै धरणं बांधायला काढली लै पैसा खाल्ला. पाण्यासारखा म्हणा हवं तर.
पण राजकारण करायचं म्हटल्यावर, पक्ष चालवायचा म्हटल्यावर, पैसा तर लागतोच की…!
याला काय कळतंय हे गणित अन राजकारण?
काल परवाचं पोरगं. त्याला दक्षिणा माहिती फक्त. या बाकीच्या दक्षिणाची शिकवणी आमच्याकडेच लावावी लागेल….
आताचे बंदिस्त भुजबळ आहेत न त्यांना आम्हीच शिकवलं. नाशिकला तर या जाऊन. ते आमचेच शिष्य आहेत. असे चार – दोन तरी शिष्य दाखवा तूमचे?
कसे असतील?! त्याला मोकळीक सोडावी लागते! जशी आम्ही भूजबळांना सोडली होती…!
राजकारण तुमचं कामच नाही. राजकारण आम्हीच करू जाणं, खाता आलं पाहिजे अन जीरवता पण आलं पाहिजे. तुम्ही खातच नाही तर जिरवनार कसं?
आम्ही आजवर किती तरी सहकारी कारखाने भंगारा सकट विकून खाल्ले पण झालं का आमचं काही? नंतर आम्ही आमच्या खाजगी कारखान्याला जोडून घेतले. पण डेरिंग लागते बॉस.
तुमचं कसं झालंय “ना खाऊँगा, ना खाने दूँगा”, असं कुठं राजकारण होत असतंय? अहो, हा काय समजतो स्वत:ला, मागेल त्याला शेततळे देतोय.
आम्ही शेतकऱ्यांसाठी पण पैसा खर्च केला पण आमच्या कार्यकर्त्यानी चार पैसे कमवले. आता हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकतंय.
आजवर तुम्ही आमची दुक़ानदारी नाही तर पैसे खायचा होलसेल धंदा बंद केलाय. आता तुम्हाला नीट करावं लागेल.
आमचे पैसे खायचे सगळे मार्ग बंद केले या बामनाच्या पोरानं. पूर्वी पेशवे अन आता हे वगेरे वगेरे…!
बस्स झालं….!
विचार करा… मी अजूनही प्रचंड आशावादी आहे.
विकासाचं राजकारण नसतं चालत, पैशाचा मेळ करता आला पाहिजे. चार पैसे वाटून खाता आले पाहिजे. थांबतो.
तुम्ही विचार करा…
पुन्हा महाराष्ट्रवादी…आशावादी होऊया का?
हा सवाल तुमच्यावर सोपवतो…!
धन्यवाद !
===
हे ही वाचा – शरद पवारांनी गळ टाकला आणि छगन भुजबळांनी ठोकला शिवसेनेला रामराम!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.